आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१९ नोव्हेंबर
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १६६१*
छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमारे २००० स्वार जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत असल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यात समजली. म्हणून शाईस्तेखानाने जाधवराव, शेख हमीद, ईस्माईलखान, सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व अंबेगाव परगण्यात रवाना केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १६६५*
पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराज सरनौबत नेताजी पालकरांसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १६६७*
१९ नोव्हेंबर १६६७ ते २२ नोव्हेंबर या काळात छत्रपती शिवप्रभुचे वास्तव्य गोमंतक भूमीत कोलवाळ गावात होते. पोर्तुगिजांचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज दोन हजार घोडदळ ३००० पायदळासमावेत कोलवाळ येथे आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे व पोर्तुगिजांचे युद्ध कोलवाळ किल्ल्याच्या परिसरात झाले. पोर्तुगिजांचा विरोध फार वेळ टिकला नाही. मराठे सैनिक बार्देशमध्ये घुसले. बार्देशस्वारी बाबतची दुसरी बाजू महत्त्वाची आहे. सन १६६७ मध्ये असणारा पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेसेंती याने १६६७ सप्टेंबरमध्ये एक विचित्र जाहीरनामा काढला होता. त्याने बार्देशमधील हिंदू दोन महिन्याच्या आत बार्देश सोडून तरी जावे किंवा धर्मांतर करावे. पोर्तुगिजांचा हा जाहीरनामा गोव्यातील हिंदूंना नवीन नव्हता. पोर्तुगिजांच्या राज्याचे सूत्रसंचालन होते की, राजांचा जो धर्म तोच प्रजेचा धर्म इतर धर्मांना त्यात स्थान नव्हते. गोव्यातील वाचलेले हिंदू
यातून कसा बसा मार्ग काढत किंवा शेवटचा पर्याय म्हणून एकतर धर्मांतर किंवा घरदार सोडून दूरच्या प्रदेशात जायचे. पोर्तुगिजांचे हे धोरण सर्वसामान्य लोकांना होते. पण पोर्तुगिजांच्या आश्रयास राहणाऱ्या देसायांना मात्र पोर्तुगीज चांगली वागणूक देत. अशा वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १६७०*
छत्रपती शिवराय रायगडाहून मुंबई जवळ नागाव येथे आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १६७२*
लंडनमध्ये आलेल्या वर्तमानपत्रातल्या बातमीचा भावार्थ:
इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालचा राजा चौथा जॉन ह्याची मुलगी कॅथरीन ऑफ ब्रीगान्झा ह्यांचे लग्न झाले. ह्या समारंभात पोर्तुगालच्या राजाने त्याच्या जावयाला - दुसऱ्या चार्ल्सला 'मुंबई' आंदण म्हणून दिली.
रॉयल चार्टरच्या द्वारे इंग्लिश राजघराण्याने वार्षिक £१० करारावर मुंबई ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकली. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य वखार सुरतेस होती आणि तिथूनच त्यांचा मुख्य व्यापार चालत असे. शिवाजी महाराजांनी दोनदा सुरत लुटली आणि शिवाजी महाराज सुरत लुटायला पुन्हा येणार आहे अश्या अफवा वारंवार उठत असत. तेथे असलेल्या पोर्तुगीज, फ्रेंच, डच, इंग्रज इत्यादी युरोपिअन व्यापाऱ्यांना ह्या गोष्टीचा त्रास होऊ लागला होता. पण ह्या सगळ्यांमध्ये फक्त इंग्रजच द्रष्टे ठरले. लवकरच सुरतेहून आपली वखार हलवावी लागणार आहे आणि त्यासाठी हाती आलेले मुंबई बेट कामास येऊ शकते हे त्यांनी खूप आधी ओळखले होते.
"दोन दिवसांपूर्वी सुरतच्या इंग्रज प्रेसिडेंटने पाठवलेल्या पत्रात माहिती कळवली आहे की शिवाजी महाराज नावाचे एक बंडखोर आहेत ज्याची त्यांना रोज भीती वाटते. ह्या शिवाजी महाराजांनी मुघलांना अनेक लढायांमध्ये हरवलेले आहे आणि तो स्वतः जवळपास राजा बनलेले आहेत. हा शिवाजी महाराजा सगळ्या युरोपिअन वखारींना पत्र पाठवून भरपूर खंडण्या मागण्याचा धीटपणा दाखवतो आणि वर धमकीही देतो की की ती न मिळाल्यास तो सुरतेस परत येऊन शहर बेचिराख करेल. हीच अपेक्षा तो शहरात राहणाऱ्या नागरिकांकडून करतो आणि ते लोकपण भीतीने खंडण्या देऊन टाकतात. मुघल अधिकारीही लोकांनाच त्रास देतात. ह्या सगळ्या परिस्थितीमुळे लोक शहर सोडून दुसऱ्या भागांमध्ये जाऊ लागलेले आहेत.
(आता इंग्रजांची दूरदृष्टी पहा!) पण ह्या सगळ्यामुळे मुंबई शहराचा भरपूर फायदा होणार आहे कारण सुरत शहरातले सगळे सगळे 'बनिया' त्यांची कुटुंबे आणि भरपूर पैसा-अडका घेऊन तेथे येत आहेत. जर काही इंग्रजांनी मनापासून मेहेनत केली तर मुंबई संपूर्ण भारतातले श्रीमंत आणि भरभराटीला आलेले शहर बनू शकते. इथून आशिया - आफ्रिका - अगदी केप ऑफ गुड होपपर्यंत सगळ्या ठिकाणी व्यापार होऊ शकतो."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९-२० नोव्हेंबर १६८४*
औरंगजेबाने दिनांक १२ नोव्हेंबर १६८४ च्या सुमारास आपल्या काही सरदारांना संभाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेण्याकरता पाठवले. काझी मुहम्मद आणि अब्दुल कादर यांनी फितुरीने कोथळागड जिंकून घेताच अब्दुल कादर आणि त्याचे ३०० बंदूकधारी दिनांक ८ नोव्हेंबर १६८४ रोजी कोथळागडाच्या पायथ्याशी पोचले. मराठ्यांनी या लोकांना मागे हटवले. तरीदेखील काही लोक किल्ल्याच्या मगरकोट दरवाजाजवळ पोहोचले. दरवाजा उघडा म्हणून त्यांनी आरडाओरडा केला. किल्ल्यावरील मराठी सैनिकांना वाटले की, आपलीच माणसे हत्यार नेण्यासाठी आली आहेत. किल्ल्यातील सैनिकांनी किल्ल्याचे दार उघडताच मोगल सैनिक किल्ल्यात शिरले. किल्ल्यांत मराठ्यांची फौजही होती. मराठे व मोगल यांच्यात लढाई झाली. तेवढ्यात अब्दुल कादरही गडावर चढला. झालेल्या चकमकीत मोगलांना यश आले. इ. स. १६८४ च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये मराठे आणि मोगल यांच्यात वारंवार लढाया होऊन अखेरीस कोथळागड मोगलांनी सर केला. मोगलांनी गड घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठ्यांनी किल्ला वेढला. बाणांची व बंदुकीची लढाई झाली. किल्ल्यातील दारूगोळा आगीच्या भक्षस्थानी पडला. गडावर जाणारी सामग्री मराठ्यांनी लुटली असल्याने मोगल सैन्याला किल्ल्यात दारूगोळा व दाणागोटा मिळेना. तेव्हा अब्दुल कादरने बादशहाला लिहून विनंती केली की, “मराठ्यांविरुद्ध किल्ला लढवण्याकरता मदतीची आवश्यकता आहे. माझ्या मदतीसाठी कोणी आले नाही तर मी जगेनसे वाटत नाही. तेव्हा औरंगजेबाने मोगल सेनानी अब्दुल करीम आणि इतर सरदारांना अब्दुल कादरची मदत करण्याकरता पाठविले. १९-२० नोव्हेंबरच्या सुमारास जुन्नरचा किल्लेदार अब्दुल अजिजखान याने आपला मुलगा अब्दुलखान यास सैन्यासह अब्दुल करीमच्या मदतीकरता पाठवले. अब्दुलखान तेथे पोचला तेव्हा मराठ्यांचा सरदार नारोजी त्रिंबक यांनी मोगल सैन्याची वाट अडवण्याकरता तेथील खोरे रोखून धरले होते, म्हणून अब्दुल कादरने हल्ला केला. तलवार, खंजीरानी हातघाईची लढाई झाली. लढाईत नारोजी पकडला गेले. ते व मराठ्यांचे इतर सरदार धारातीर्थी पडले. इहतमाम खानाने नारोजी त्र्यंबकजीचे डोके रस्त्यावर टांगले. ह्या अधम कृत्यात सहभागी झालेला शिकारपूरचा मोगल ठाणेदार माणकोजी याने उदाजी बरोबर ह्या विजयाचा वृत्तांत आणि नारोजी त्र्यंबंकचे शिर औरंगजेबाकडे पाठविले. किल्ला जिंकून घेतला म्हणून गडाची सोन्याची किल्ली औरंगजेबाकडे पाठविली. औरंगजेबाने उदाजीलाही खुश होऊन “खिलत” दिली. इ. स. १६८४ च्या डिसेंबर महिन्यात औरंगजेबाने कोथळागडाचे नाव बदलून “मिपताहुलफतह” असे नाव ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १६९३*
ऑक्टोबर १६९३ मध्ये संताजी घोरपडेंनी भीमा
ओलांडली आणि बादशाही मुलूखांत धामधूम करण्यास सुरुवात केली. हिंमतखानाने त्यांचा पाठलाग केला. इतक्यात ठाणेदार रामदुल्लाखान याने त्यांस लिहून पाठविले की संताजी हा शिवनिहालग भूपाळगड येथे गेला आहे म्हणून त्याने संताजी घोरपडेंचा पाठलाग सुरू केला. संताजी घोरपडे मांडवगडला व त्यांच्या पाठीवर हिंमतखान होता, दोघांची लढाई भूपाळ गडाजवळ झाली त्यात मराठ्यांनी माघार घेतली. पुढे दोघांची गाठ विक्रम हल्ली येथे पडल्यावर युद्धास तोंड लागले तेव्हा संताजी घोरपडे निसटून मळखेड येथे १९ नोव्हेंबरला गेला. त्याचा पाठलाग हिंमतखान बहादूर, हमीदुद्दीन खान ख्वाजाखान यांनी केला. मोठी लढाई झाली असे मोगलांचे बातमीपत्र सांगते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १७१५*
रामचंद्र अमात्यांनी लिहिलेले सुप्रसिद्ध आज्ञापत्र संभाजी महाराजांना उद्देशून लिहिलेले आहे. आज्ञापत्राचा काल १९ नोव्हेंबर सन १७१५ आहे. यात शिवाजी महाराजांची राज्यकारभाराची धोरणे काय होती है सांगून, प्रधान कसे नेमावे, फौजेची, किल्ल्यांची आरमारांची वगैरे व्यवस्था कशी ठेवावी इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत. टोपीकरास व परक्यास आपल्या राज्यात इमारत बांधू देऊ नये. शहराचा उपद्रव चुकवून नेमून देऊन वखारी घालाव्या. कोणासही इनाम अगर कायमची जागा देऊ नये असे त्यात प्रतिपादिले आहे. हे आज्ञापत्र लिहून झाल्यावर थोड्याच दिवसात रामचंद्रपंत दिवंगत झाले असावे. त्यांच्या निर्वाण तिथीचा भक्कम पुरावा इतिहासास सापडत नाही. त्यांची समाधि पन्हाळगडावर श्रीरघुवीराचे देवालयासन्निध सांपडली असून तिजवर “श्रीरामचंद्र नीळकंठ" अशी अक्षरे दगडावर कोरलेली आहेत. संभाजी राजांनी क्रांती घडवून आणून आपली गादी कोल्हापुरास स्थापिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १७८८*
किल्ले पारगडाचे उत्तम जतन व्हावे यासाठी मालुसरेंचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे प्रयत्नशील आहेत.मालुसरे घराण्याचा इतिहास जोडला गेलाय तो सिंहगडाबरोबरच पारगड या किल्ल्याशीही.कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेस असलेल्या चंदगड तालुक्याच्या पार सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर पारगड आहे. १६७५ साली या गडाची वास्तुशांत होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी यांचा सुपुत्र रायबा मालुसरे याची या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून नेमणूक केली. पारगडाची उंची समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट आहे. पारगडाविषयी काही अस्सल पत्रे बाळकृष्ण मालुसरे यांच्या संग्रही आहेत. त्यातील पहिले पत्र आहे १९ नोव्हेंबर १७८८ चे. पारगड किल्ल्याच्या खर्चासाठी व्यवस्था तालुके डिचोली व पेडणे यांच्या उत्पन्नातून पुरातन आहे. त्याप्रमाणे आताही ते चालवावे म्हणून धोंडोकृष्ण नामजाद व कारकून किल्ले पारगड यांनी गोवर्णदोर जंजीरे गोवा यास पाठविले.सदर पत्रात कोल्हापूरमध्ये फौजे तयार होत आहे परंतू मसलत कोणीकडे आहे हे कळत नाही हे देखील वृत्त आहे. हे पत्र गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरला लिहिलेले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ नोव्हेंबर १८२८*
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या पहिल्या म्हणजे १८५७ च्या संग्रामातअनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या सगळ्यामध्ये असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. चिमाजी आप्पांचे व्यवस्थापक मोरोपंत तांबे व
भागिरथीबाई यांच्या पोटी १९ नोव्हेंबर १८२८ ला राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म झाला. मोरोपंतांनी आपल्या कन्येचे नाव 'मनुताई' असे ठेवले. मनुताई लहानपणापासून हुशार व देखणी होती. मनू पाच वर्षांची असतानाच तिच्यावरचे मातृछत्र हरपले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
Comments
Post a Comment