भोजलींग ता. मान जि. सातारा


भोजलिंग - जांभुळनी' हे श्री क्षेत्र  भोजलिंग देवस्थान. देव 'भोजलिंग' हा पावनारा देव आहे.अनेक घरनी कुलदैवत म्हूणन 'भोजलिंग'ची पूजा करतात.

भोजलिंग मंदिराच्या टेकडीवर आहे.'  'भोजलिंग' हे नाव 'काळ भैरवनाथ' हे 'सोनारी', 'सोनारी' वरून 'म्हसावड' आणि नंतर 'डोंगर'वर 'जांभुळणी' येथे आले. अशी जुनी स्थानिक नागरिक सांगतात.

अनेक कथा तेथील स्थानिक नागरिक सांगत असतात.

काळ भैरवनाथ' हे 'सोनारी', 'सोनारी' वरून 'म्हसावड येथे आणि नंतर 'डोंगर'वर 'जांभुळणी' येथे आले.म्हसवड तेथे असुरचा   वध करून काळभैरव म्हणजेच सिद्धनाथ म्हणजेच भोजलिंग  हे येथील डोगरावर आले.देवताना त्यानी भोजन घालून तृप्त केल्यामुळे. सर्व देव देवतांकडून त्यांना आशीर्वाद मिळाला. आणि भोजन घेतले म्हूणन त्यांचं भोजनलिंगम्हूणन प्रसिद्ध पावन असे. वर मिळाले. अशी दंतकथा तेथील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येते.
 भोजलिंग देवाचे सेवकरी रुईबाबाच सुद्धा या ठिकाणी मंदिरात पाहायला मिळत.

'भोजलिंग डोंगर' या नावाने प्रत्येक श्रावण महिन्यात खूप गर्दी दर्शनासाठी असते.

 विसावाजवळच्या एका पायरीवर 'भोजलिंग'च्या डोंगरावर (डोंगर) लिंगांनी मढवलेले अनेक दगड गोल आकारात '7 लिंगे' आहेत.

आयुष्यात एकदा तरी भेट द्या, या दिव्य स्थानाच्या भेटीचा अनुभव विसरू नका. पुढे जाण्यासाठी जवळपास 750 पायऱ्या आहेत आणि 4 चाकी वाहनाने किंवा बाईकने मंदिरापर्यंत जाण्यासाठी 'डोंगर- पायथा' (बस स्टॉपचे नाव) पासून आणखी एक रस्ता आहे.

 भोजलिंग भक्तांनी पैसा आणि श्रमदान देऊन रस्ता बनवला. हवेचा आशीर्वाद देऊन तुम्ही डोंगरावरील हवा अनुभवू शकता.

 भोजलिंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी एकदा तरी देवाचे 'भोजलिंग' दर्शन घ्या. 'भोजलिंग' या देवाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर या ठिकाणी अवश्य भेट द्या.

 नुकतेच 'महाराष्ट्र सरकारने' हे ठिकाण 'पर्यटन' ठिकाण म्हणून घोषित केले आहे.
कसे जाल?
 म्हसवड, जिल्हा मार्गे या.- सातारा (सातारा - पंढरपूर रोड) अंतर 11 किमी आहे, झरे (जि. सांगली) 7 ते 8 किमी 'डोंगर पायथा' बस स्टॉप आणि 'डोंगर पायथा' पासून 1.5 ते 2 किमी आहे.


संकलन :-नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४