Posts

Showing posts from March, 2023

भारतीयांचे पूर्वज.❤️मोहेंजोदारो येथील प्राचीन जीवनमान कसे असेल हे एआय ने रेखाटून बघितले. निकाल असा सुंदर बाहेर पडला.

Image
भारतीयांचे पूर्वज.❤️ मोहेंजोदारो येथील प्राचीन जीवनमान कसे असेल हे एआय ने रेखाटून बघितले. निकाल असा सुंदर बाहेर पडला.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ मार्च १६७०* आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ मार्च १६७०* मराठा फौजेचा माहुली गडावर ताबा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२८ मार्च १७३७* बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.  मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्‍या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्‍या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,* *सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* *"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ मार्च १६६३* शिवतेज दिन - शाईस्तेखानाचा बिमोड... दस्तुरखुदद आलमगीराचा 'मामा' व मुघल सेनेतील  मातब्बर सरदार असलेल्या शाईस्तेखानाची छत्रपती शिवरायांनी "गनिमी कावा" या रणनीतीने पुण्यातील लालमहाल येथे तळ ठोकुन बसलेल्या अंदाजे दिड लाखाच्या सैन्यात घुसुन रातोरात बोटे छाटली. या असल्या गनिमी छाप्याचे दुसरे उदाहरण जगात नाही. खान व त्याच्या कुटुंबाने महाराजांची जबर धास्ती घेतली. पुणे व परीसरातील लुट व गाईंच्या कत्तली सर्व बाहेर पडल्या. त्याची बेगम रात्रीचीच "शिवाजी आला शिवाजी आला" म्हणून ओरडत असे. पुढे औरंगजेबाने बोटे तुटलेल्या मामाला इराणला पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ मार्च १६६६* औरंगजेबाचे राज्यरोहन १६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून

आजचे शिवकालीन दिन

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ मार्च १६६७* औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि 'शहजादा मुअज्जम'ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले. .  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ मार्च १६७५* छत्रपती शिवराय किल्ले रायगडहून कुडाळकडे रवाना. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ मार्च १७३७* चिमाजी अप्पांनी साष्टी जिंकले 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२६ मार्च १७५५* तुळाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. त्

शिवविचार_प्रतिष्ठान**२५ मार्च इ.स.१६७०*

*#शिवविचार_प्रतिष्ठान* *२५ मार्च इ.स.१६७०* छत्रपती शिवरायांची चांदवडवर स्वारी. *२५ मार्च इ.स.१६७५* जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली. नोट: जॉन चाईल्ड हा बॉंबे चा राज्यपाल म्हणून इंग्रजांनी पाठवला होता *२५ मार्च इ.स.१६८९* मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला.  याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांना  रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह छत्रपती राजाराम महाराज यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ मार्च १६७५* 'जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ मार्च १६८९* मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला. याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई, राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२५ मार्च १७०३* सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यू नंतर मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते.   त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला.  व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद

पैठणचे तीर्थखांब

Image
✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻✍🏻 पैठणचे तीर्थखांब शककर्ता शालिवाहन सम्राटांनी दक्षिण भारतावर विजय मिळवल्यानंतर त्या विजयाचे प्रतीक म्हणून तत्कालीन राजधानीचे शहर पैठणनगरीत भव्यदिव्य तीर्थखांब उभा केला होता. आजही ‘शालिवाहन’ इतिहासाची साक्ष देत हा तीर्थखांब (विजयस्तंभ) दिमाखात उभा आहे.  प्राचीन पैठणनगरीच्या गतसंपन्नतेचा साक्षीदार असलेला हा तीर्थस्तंभ पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात. सातवाहन घराण्याच्या मराठी साम्राज्याचा हा दीपस्तंभ संपूर्णपणे दगडात बनविण्यात आला आहे. यादवकालीन शिल्पकलेचा अजोड नमुना असलेले हे शिल्प ४ स्वतंत्र कप्प्यांद्वारे उभारण्यात आलेले आहे. स्वर्ग, नरक व पाताळ, अशी रचना ३ टप्प्यांत कोरलेली आहे. दक्षिण काशीचा मान व एकेकाळी धर्मपीठाचा अधिकार गाजवणाऱ्या पैठण येथील गोदावरी नदीत दशक्रिया विधी करण्याची परंपरा आहे. प्रतिष्ठाननगरी ही मोक्षधाम म्हणूनही ओळखली जाते. अशा पवित्र तीर्थक्षेत्री स्वर्गाचे प्रतीक म्हणून हा स्तंभ उभारण्यात आला असावा, अशीही आख्यायिका आहे. शहराच्या सर्वात उंच असलेल्या भूभागावर स्तंभ उभारला असून, त्याची उंची ५० फूट आहे. दगडी खांब व टोकदार कमानी तत्कालीन शिल्प

आजचे शिव कालीन दिन विशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ मार्च १३०७* देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ मार्च १६७४* रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. इंग्रजांच्या वतीने तहाची बोलणी करायला नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाषा मुंबईहून रायगडाकडे निघाला. २४ मार्च १६७४ रोजी तो न्यायाधीश निराजीपंतांची भेट घेण्यासाठी पाचाडला आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ मार्च १६७७* "दक्षिण दिग्विजय मोहीम" २४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्य मल्लिकार्जुन' येथे मुक्काम. भाग्यनगरपासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,* *सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.* *"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, ज

स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण माहिती*

🙏🙏🙏🙏🙏🙏 *श्री स्वामी समर्थ महाराजांची संपूर्ण माहिती* *स्वामींचे नांव* :- श्री स्वामी समर्थ,चैतन्य,  चंचलभारती,नृसिहसरस्वती,दिगंबर बुवा, नृसिहभान,श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज.   *स्वामींचा प्रगटदिन* :- चैत्र शुद्ध द्वितीया. *महानिर्वान दिन* :- चैत्र वैद्य त्रयोदशी शके १८०० मंगळवार ३० एप्रिल १८७८ रोजी वटवृक्ष मंदिरात देह ठेवला. *आवडते प्राणी* :- गाय,कुत्रा. *नावडता प्राणी* :- मांजर. *अक्कलकोट स्वामींना खालील गोष्टी प्रिय आहेत* :- *मोगऱ्याचा फुलांचा हार,खडीसाखर, पिवळा सोनचाफा,केवड्याचे फुल भगव्या रंगाची फुले. *वृक्षारोपण केलेले फार आवडते. *प्राण्यांना अन्न दिलेले फार आवडते. *पेढे खुप प्रिय आहेत. *नैवेद्या मध्ये* :- पुरणपोळी,वांग्याची भाजी,कडंमबोळी,चपाती,दुधशर्करा,आमटी खिर,कांद्याची भजी,आणी बेसनाचे लाडू. *फळां मध्ये* :- डाळिंब,सिताफळ,सुकेळी काळीद्राक्षे,आंबा,चिकु, टरबूज. *स्वामींना हीना अत्तर खुप प्रिय होते.* *स्वामींच्या स्परशातून पावन झालेली स्थाने* :- वटवृक्ष मंदिर,खासबाग, खंडोबाचे देऊळ, हाक्याचा मारुती,बाळाप्पाचे घर,चोळप्पाचे घर. *अक्कलकोट येथील मठ* :- वटवृक्ष मठ, समाधी मठ,ब

फक्त दारु पिण्याच्या निमित्ताने इंग्रजी नववर्ष साजरे करणारे आपले कांही हिंदू जन जरा हेही वाचा आणि आपला नववर्षाचा दिवस *गुढी पाडवा, शालिवाहन शके १९४५* मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करा.🌹*विचारपुष्प*🌹

फक्त दारु पिण्याच्या निमित्ताने इंग्रजी नववर्ष साजरे करणारे आपले कांही हिंदू जन जरा हेही वाचा आणि आपला नववर्षाचा दिवस *गुढी पाडवा, शालिवाहन शके १९४५* मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करा. 🌹*विचारपुष्प*🌹 🙏 *गुढीपाडवा वर्षारंभ कां ?*🙏 *१) आपण सर्व हिंदू आहोत !* *२) आपला वर्षारंभ शालिवाहन शक प्रमाणे आहे !* *३) आपण तिथी प्रमाण मानतो !* *४) तिथी हे कालक्रमण सत्य माप आहे !* *५) तिथी अनादी काळ दर्शवते !* *६) सृष्टी ही प्रवाहरूप अनादी आहे !*  *७) कालक्रमण हे ब्रह्मदेवापासून आहे !* *८) सध्या ब्रह्मदेव ५३ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत !* *९) ५२ वर्षे, १३ घटका, ४२ पळ, ३ अक्षरं हे त्याचं वय आहे !* *१०) आता आपण वराह कल्पात आहोत !* *११) या कल्पातील ७व्या मन्वंतरात आहोत !* *१२) ७व्या मन्वंतरातील २८व्या युगात आहोत !* *१३) २८व्या युगातील कलियुगात आहोत !* *१४) कलियुगाच्या तिसऱ्या शालिवाहन शकात आहोत !* *१५) शालिवाहनाच्या १९४४ व्या वर्षात आहोत !* *१६) शके १९४४ वर्ष दि. २१.०३.२०२३ ला संपणार आहे !* *१७) गुढीपाडव्याला शके १९४५ वर्ष चालू होणार आहे !* *१८) कालक्रमण हे सृष्टी उत्पत्ती माप आहे .* *१९) हे माप

पैठण येथील तीर्थस्तंभ आणि त्याचा गुढीपाडव्याशी असलेला संबंध

Image
पैठण येथील तीर्थस्तंभ आणि त्याचा गुढीपाडव्याशी असलेला संबंध दक्षिणेले पहिले मोठे राजकुळ असलेल्या महान सातवाहनांनी आपल्या संस्कृतीचा पाया घातला. सर्वात प्रसिद्ध सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने १९४४ वर्षांपूर्वी आक्रमक असलेल्या शकांचे दक्षिणेतून समूळ उच्चाटन केले. नाशिकजवळ त्यांचे खूप मोठे युद्ध झाले. शक राजा नहपान याचा पराभव करून ठार केले. या विजयाची आठवण म्हणून गुढीपाडवा व शालिवाहन शकाचे नववर्ष आपण साजरे करतो. आजपासून शालिवाहन शक १९४५ चालू झाले. शालिवाहन म्हणजेच सातवाहन. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही सातवाहनांची राजधानी. असे म्हणतात की शकांवर मिळविलेल्या या अंतिम विजयाचे प्रतीक म्हणून गौतमीपुत्र सातकर्णीने पैठणला हा विजयस्तंभ उभारला. त्याला तीर्थस्तंभ म्हटले जाते. निरनिराळ्या राजवटींच्या खुणा उमटलेला हा स्तंभ शिल्पशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. गो.नी.दाण्डेकरांनी काढलेला हा फोटो.🚩👌

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशष २१ मार्च

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ मार्च १६५७* छत्रपती शिवरायांनी 'गुंजन मावळ' चे वतनदार 'शिळमकर' यांचा वतनाचा तंटा लाल महाल, पुणे येथे सोडवला. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 *२१ मार्च १६५७* छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून 'नूरखान बेग' यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फर्मान लाल महाल -पुणे येथून दिले. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 *२१ मार्च १६६७* किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..! किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग  आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩 *२१ मार्च १६७०* शिवरायांनी कर्नाळा किल्ला स्वाधीन करून घेताना केलेली गंम्मत व वापरलेली युक्ती मुंबईकर इं

आजचे दिन विशेष 20मार्च

Image
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मार्च १६६६* नेतोजी पालकर मिर्झाराजांच्या विनंतीमुळे विजापूरकरांना सोडून मोगलांना सामील. 🏇🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मार्च १७१९* तीन दशकानंतर मराठ्यांच्या राजमाता येसूबाई कैदेबाहेर पडल्या मातापुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकांस भेटले.  एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे, मराठ्यांचे निशाण नर्मदापार गेलेले पाहण्याचे भाग्य या येसूबाईंना लाभले. छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० मार्च १

महाराणी येसूबाई साहेब यांच्या समाधीचा शोध सातारा

Image
महाराणी येसूबाई साहेब यांच्या समाधीचा शोध सातारा येथील जिज्ञासा संस्थेने लावला असून,त्या संदर्भातील त्यांनी दिलेली प्रेस नोट पुढे दिली आहे. मराठ्यांच्या इतिहासामधील जे काही महत्त्वाचे शोध गेल्या दशकामध्ये नोंदवले गेले. अशा महत्त्वाच्या शोधांमध्ये महाराणी येसूबाई साहेबांच्या समाधीचा शोध हा अव्वल क्रमांकावर नोंदवला जाईल याची मला खात्री आहे. हा समाधीचा शोध घेण्यासाठी सातारा नगरीचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिज्ञासा संस्थेचे निलेश पंडित आणि त्यांच्या सहकार्यानी गेली अनेक वर्ष याचा पाठपुरावा केला होता. मराठ्यांच्या सार्वभौमत्वासाठी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी  सण 1690 ते 1719 असी प्रदीर्घकाळ कैद भोगली. महाराणी येसूबाई साहेब यांनी शंभूराजांच्या नंतर मराठ्यांचे राज्य सावरून धरण्यासाठी महान त्याग केला. अशा महाराणींच्या महत्त्वाच्या स्मारकाचा शोध या इतिहास संशोधकांनी घेतला आहे.महाराष्ट्र शासनाने या शोधाची तातडीने दखल घेऊन या समाधीस्मारकाचे जतन संवर्धन करावे अशी अपेक्षा करूया.  इंद्रजीत सावंत , १६-३-२०२३, कोल्हापूर. महाराणी येसूबाईंच्या समाधीची मुळ जागा सापडली...... राजधानी सातारासंबंधी महत्त्

आजचे इतिहासाती दिनविशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ मार्च १६४७* छत्रपती शिवाजी महाराजांनी व आईसाहेब जिजाबाई यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला. पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्‍यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची "प्रतिपच्चंद्र" ही राजमुद्रा तसेच अखेरीस "मोर्तब" म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे. या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायक भट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते. शिवाजी महाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिप व्यवस्थेकरीता असे.. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ मार्च १६७४* छत्रपती शिवरायांची धाकट्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा रायगडावर मृत्यू. 🏇🚩🏇

शहाजीराजा_म्हणजे_कोणी_सामान्य_व्यक्ती_नव्हे

Image
#शहाजीराजा_म्हणजे_कोणी_सामान्य_व्यक्ती_नव्हे       भोसले कुळाच्या पराक्रमाने संपूर्ण हिंदुस्थान ढवळून काढणारे महाबली महाराजा शहाजीराजे भोसले सरलष्कर. मराठा सरदारांना एकत्रित करून दिल्लीच्या तख्ताचे विस्तारवादी धोरण गुंडाळून तह करायला लावणारे देवगिरीच्या पाडावानंतर चे पहिले सामर्थ्यवान राजा .  #उत्तरेत_अकबर_दक्षिणेत_शहाजी ही म्हण रूढ झाली ती उगाचच नाही ,भातवडी युद्ध व त्यानंतर तीन वर्षे मुर्तुजा निजाम मांडीवर बसवून चालवलेले स्वराज्य , त्यानंतर ही ३/४ वर्षे नाशिक पासून भिमतटीचा प्रदेश महत्वाचे किल्ले मुघलांना ताब्यात घेण्यासाठी झुझंवले याबाबत शहाजहान बादशहा ने  एक पत्र आदिलशहाला पाठवले करारात ठरले प्रमाणे विनातक्रार निजाममुलुख शहाजहानास हवाली कर शहाजी याने त्र्यंबक जुन्नर भागातील किल्ले अजुन ही निजाम वंशातील मुलगा पुढे करून स्वतः चे ताब्यात ठेवला आहे त्याने ते ताब्यात देईपर्यत त्याला तुझेकडे कामाला घेऊ नको , देण्यास नकार दिला तर विजापुरास प्रवेश देऊ नको , शहाजहान बादशहा याने शहाजीराजे भोसले यांचे सारखा मराठा आपल्या दिल्ली दरबारात ठेवून घेणे म्हणजे हातात विस्तव घेणे हे ओळखून आदिलशहाला दोघ

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन* शुक्रवार दि- १७ मार्च २०२३ *🌸नित्य पुजा🌸* *🚩काकडा आरती.🚩* *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Image
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 *श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन*         शुक्रवार दि- १७ मार्च २०२३           *🌸नित्य पुजा🌸*        *🚩काकडा आरती.🚩*        *🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

गोत्र म्हणजे काय ?

गोत्र म्हणजे काय ? धार्मिक विधी करताना बर्याच वेळा आपले गोत्र काय असा प्रश्न गुरुजी विचारतात तेंव्हा गोत्र म्हणजे काय असा प्रतिप्रश्न करणारे देखिल असातात, अशावेळेला पुर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देउन वेळ मारुन नेणारे काही जण असतात. पण तसे नसून गोत्र ही वेद्यीक धर्माने दिलेलि देणगी आहे. जन्मवंश शास्त्रदृष्ट्या अतंत्य सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे. "धर्मसिंधु" ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दीलेले आहे, 'तत्र गोत्र लक्षणम् - विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो$थ गौतमः । अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ ' विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ, आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषीं च्या नावांना गोत्र असे म्हणतात. प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे १ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व २ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक ३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौव

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ मार्च

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ मार्च १६४९* छत्रपती शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ मार्च १६६५* कारवार(मास्टर)- सुरत प्रेसिडेंट ला पत्र “फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन छत्रपती शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले, ते गोव्यावरुन कसलाही विरोध न होता बार्सिलोरपर्यंत जाऊन, ते बंदर लुटून, गोकर्णला परत आले.” 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१४ मार्च १७०७* महाराष्ट्र जिंकण्याची इच्छा अपुरी ठेवूनच औरंगजेब फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे मरण पावला. हि बातमी नुकतीच माळव्याच्या सुभेदारपदी नियुक्ती झालेल्या औरंगजेब पुत्र आज्जमशाह यास समजल्यावर तो ताबडतोब अह्मदनगरला आला व ईद

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ मार्च

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१२ मार्च १६३५* मयुर सिंहासन -  शहाजहाननें हें प्रसिद्ध सिंहासन तयार करविलें. त्यानें मोंगल खजिन्यांतून सुमारें ८६ लाख किंमतीचीं चांगली रत्नें निवडून काढिलीं; आणि १ लक्ष तोळें सोनें (किंमत १४ लाख रुपये) खरेदी करून कसबी सोनार कामावर बसविले; आणि बेबादखान याच्या देखरेखीखालीं हें नवीन मयूरसिंहासन तयार करविलें. हें काम सात वर्षें चाललें. सिंहासनाची लांबी सव्वा तीन, रुंदी अडीच व उंची ५ यार्ड होती. त्याला बारा कोन व बारा खांब होते. वर मधोमध एक लहानसें झाड असून प्रत्येक खांबाच्या शिखरावर दोन दोन मोर होते. एवढयाचवरून त्यास मयूरसिंहासन नांव पडलें. वर जाण्यास तीन रत्नखचित पायऱ्या असून, अकरा बाजू कठडे बसवून बंद केलेल्या होत्या. बारावी बाजू प्रवेशाची असून उघडी होती. आंतल्या बाजूस एका फारशी कवीची वीस कवनें कोरविलेलीं होती. ह्या सिंहासनास लागलेल्या साहित्याची किंमत एक कोट रुपये असून, त्याशिवाय मजुरी निराळी होती. ता. १२ मार्च स. १६३५ रोजी ह्या सिंहासनावर शहाजहान प्रथम बसला. नादीरशहानें परत जातांना हें सिंहासन इराणांत नेलें. त्याच्या नंतरच्य

स्वर्गीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण (बी.ए. एल एल. बी.)

Image
"राजकारणाचा प्रपंच करताना दुसर्‍याचं अंतःकरण जाणावं लागतं. अडचणीत न सापडण्याची खबरदारी घ्यावी लागते. समय ओळखावा लागतो. प्रसंगी नम्र व्हावे लागते. लोकांची पारख करावी लागते. प्रामाणिक आणि फितूर, दोन्ही गृहीत धरावी लागतात. दोष आढळला, तर तो अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडे कानाडोळा करावा लागतो. विरोधकांशी त्यांच्याच शस्त्राने लढावे लागते. तसे करणे कित्येकदा अवश्यकच असते. दूरदर्शीपणाने काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागते"  - स्वर्गीय यशवंतराव बळवंतराव चव्हाण (बी.ए. एल एल. बी.)

११ मार्च १७९५ “खर्डा किल्ला”....🚩

Image
११ मार्च १७९५ “खर्डा किल्ला”....🚩 अहमदनगरच्या आग्नेयेला जामखेड तालुका आहे जामखेड तालुक्यातील प्रमुख गावांमधील एक असलेल्या खर्डा गावात पुरातन ऐतिहासिक असा भुईकोट किल्ला आहे गावाच्या बाजूला असलेला हा किल्ला निंबाळकर सरदारांनी बांधला आहे चौकोनी आकाराची तटबंदी व चार प्रमुख दोन दुय्यम असे एकूण सहा बुरुज असलेल्या उत्तराभिमुख खर्डा किल्ल्याचा दरवाजा शाबूत असून त्यावर एक शिलालेख आहे.. इतिहासातील प्रसिद्ध खरड्याची लढाई ही याच ठिकाणी झाली होती हैदराबादचा निजाम व मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी लढाई झाली त्यात मराठ्यांनी निजामाचा पराभव केला होता जामखेड तालुक्यातील शिर्डी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खर्डा हे गाव ऐतिहासिक वास्तुचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे मराठवाड्यातून नगर जिल्ह्यात प्रवेश करताना भव्य तटबंदी असलेला भुईकोट किल्ला प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो महादजी शिंदेचे वारस दौलतराव शिंदे याच्याशी नाना फडणवीसाचे संबंध सुधारलेले होते आणि शिंद्याची विशाल सेना पुणे येथे असल्याने त्याचा फायदा घेऊन मराठा सत्तेचा प्रभाव दक्षिणेत वाढविण्याचे नानाने ठरविले आणि हैदराबादच्या निजामावर लक्ष क

मार्च- जागतिक महिला दिन विशेष डफळापूर संस्थानातील केवळ पुरुषच नव्हे;परंतु स्त्रियाही राजसिहांसनावर विराजमान झाल्या व त्यांनीं कैक वर्षे पूर्ण मुत्सदीगिरीने राज्यकारभार पाहिला.

८ मार्च- जागतिक महिला दिन विशेष  डफळापूर संस्थानातील केवळ पुरुषच नव्हे;परंतु स्त्रियाही राजसिहांसनावर विराजमान झाल्या व त्यांनीं  कैक वर्षे पूर्ण मुत्सदीगिरीने राज्यकारभार पाहिला.  १. येसुबाई चव्हाण (मृत्यू १७५४)- जत संस्थानचे संस्थापक सटवाजीराव चव्हाण यांच्या सून.मौजे सरकुली येथील भोसले घराण्यातील कन्या.यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या बाजूने राहुन मराठा साम्राज्य साठी कामगिरी केली.या राजधुरंदर,लढाऊ तसेच धार्मिक होत्या.छत्रपती शाहू महाराज प्रथम हे कर्नाटक स्वारीवर असताना येसूबाईंनी राजेंना मेजवानीचे आमंत्रण दिले व राजेंनी १६/०७/१७३९ रोजी डफळापूरच्या राजवाड्यात १ दिवस मुक्काम केला असल्याची नोंद आहे. सावर्डेचा पाटील कैद केला त्यासंबंधी छत्रपती शाहू महाराजांनी येसूबाई यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे.  २. बहिणाबाई चव्हाण (मृत्यू १७८०)-सटवाजीराव चव्हाण यांचे बंधू धोंडजीराव चव्हाण यांच्या सून.    बहिणाबाई यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सोबत सलोख्याचे संबंध ठेवले होते व पुण्याच्या  दरबारात आपला  प्रभाव कायम केला होता.नानासाहेब पेशवा यांनी जत जहागिरीचा तोडगा काढत बहिणाबाईच्या बाज

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२४ जानेवारी १६६१*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ जानेवारी १६६१* कारतलबखान स्वराज्यावर चालून आला  आणि कोकणात उतरला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ जानेवारी १६६७* छत्रपती शिवरायांनी १२ मावळ मधील  "कानंद खोरे"चा वतनाचा तंटा मिटवला. मरळ घराण्याकडे परत वतनदारी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ जानेवारी १६८०* सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र  पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी मार्टीनने नेमके असेच म्हटले आहे. तो लिहितो, The mere name of Chatrapati Shivaji Maharaja made them tremble. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुतगतीने होत कि, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. दि. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, Where he attempts there is but little space betwixt his notice and appearance and to send for soliders from Bomba

मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई ईशप्रभू देसाई यांनी बनवून घेतलेली छत्रपती शिवरायांची अश्वारूढ दगडात कोरलेली मूर्ती)"सर्वांना जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छ"

Image
दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परतताना बेलवडी या गावातील एक छोटीशी गढी छत्रपती शिवजी महाराजांच्या नजरेत आली. त्यांनी लगेच सैनिकांना गढी जिंकून स्वराज्यात घेण्याचा आदेश केला. ती गढी ईशप्रभू देसाई यांची होती. ते मराठ्यांच्याविरूध्द लढताना मृत्यूमुखी पडले होते. परंतू त्यांच्या मृत्यूपश्चात गढीचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नी मल्लम्मा देसाई या रणांगणात उतरल्या त्यांनी मराठ्यांच्या विरोधात मोठा संघर्ष केला. जवळपास एक महिना हि लढाई चालू होती. शेवटी मराठा सैनिकांनी गढी जिंकली व मल्लम्माला बंदी केले व शिवरायांसमोर हजर केले. शिवरायांना पहिल्यापासूनच महिलांविषयी आदर व सन्मान होता. त्यांना मल्लम्मांच्या पराक्रमाची बातमी कळताच त्यांनी मल्लम्माला बंदीमुक्त करण्याचा आदेश दिला. तसेच मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली तिच्या अल्पवयीन मुलाला अभय दिले एवढेच नाही तर तिच्या या शूर कार्यामुळे तिला 'सावित्री' हा किताब दिला. छत्रपती शिवरायांकडून मिळालेल्या एवढ्या मोठ्या सन्मानाने मल्लम्मा भारावून गेली तिला गहिवरून आले होते. तिने आपल्या जहागिरीतील यादवाड येथे

मार्च इ.स.१६७०फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवारकिल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :-

मार्च इ.स.१६७० फाल्गुन वद्य द्वादशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, मंगळवार किल्ले पुरंदर स्वराज्यात दाखल :-  १६७० नंतर तहात गेलेले सर्व किल्ले परत घेण्याचा निश्चय केला व सिंहगडापाठोपाठ आजच्या दिवशी पुरंदर स्वराज्यात दाखल झाला. किल्ले पुरंदर पुन्हा जिंकला तो  65वर्षाच्या निळोपंत काकांनी अतुलनीय पराक्रम  महाराज गाजवून किल्ले पुरंदर जिकूंन स्वराज्यात दाखल केला.

ओडिसाचे मराठा साम्राज्य🚩

ओडिसाचे मराठा साम्राज्य🚩 ओडिशा राज्य जे प्रामुख्याने भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेसाठी पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे....  जिथे दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक भगवान जगन्नाथ पुरी च्या दर्शनासाठी येत असतात ..  आणि ही रथयात्रा संपूर्ण देशात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की ही जगन्नाथ पुरीची रथयात्रा सुरू करणारे दुसरे कोणी नसून  नागपूरच्या राजघराण्याचे संस्थापक महाराज रघुजीराजे भोसले होते...  कारण एकेकाळी हे मंदिर धन आणि वैभवाने खूप श्रीमंत होते. परंतु मंदिरातील पैशाच्या लाभापोटी अनेक विदेशी आक्रमकांनी हे मंदिर लुटले. ज्यामध्ये फिरोजशाह तुघलक, जहांगीर, अकबर, औरंगजेब, बंगालचे नवाब असे अनेक शासक समाविष्ट होते. ज्यांनी केवळ मंदिराची संपत्तीचं नाही लुटली तर मंदिराचा बराचसा भागही तोडला. आणि मंदिराजवळच्या राहणाऱ्या हिंदूंची हत्या करून.  प्रचंड रक्तपात केला.  त्यामुळे प्रत्येक वेळी या मंदिरातील मूर्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागत होते.  अशा अनेक कारणांमुळे भगवान जगन्नाथ मंदिराची रथयात्रा पूर्णपने बंद झाली होती.. 🚩ओडिशामध्ये मराठ्यांनचे आगमन 🚩

नंदी....वैशिष्ठ्य पूर्ण शिल्पांकन..

Image