आजचे शिव कालीन दिन विशेष

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ मार्च १३०७*
देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ मार्च १६७४*
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू होती. इंग्रजांच्या वतीने तहाची बोलणी करायला नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुभाषा मुंबईहून रायगडाकडे निघाला. २४ मार्च १६७४ रोजी तो न्यायाधीश निराजीपंतांची भेट घेण्यासाठी पाचाडला आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ मार्च १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
२४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्य मल्लिकार्जुन' येथे मुक्काम. भाग्यनगरपासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४