आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ मार्च १६७५*
'जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ मार्च १६८९*
मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला. याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी राजाराम यांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह राजाराम यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई, राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२५ मार्च १७०३*
सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यू नंतर मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते.
त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment