आजचे दिन विशेष 20मार्च

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मार्च १६६६*
नेतोजी पालकर मिर्झाराजांच्या विनंतीमुळे विजापूरकरांना सोडून मोगलांना सामील.

🏇🚩


🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मार्च १७१९*
तीन दशकानंतर मराठ्यांच्या राजमाता येसूबाई कैदेबाहेर पडल्या
मातापुत्र प्रदीर्घ वियोगानंतर एकमेकांस भेटले. 
एकेकाळी औरंगजेबाच्या कैदेत सापडलेल्या आपल्या पुत्राचे राज्य कलेकलेने वर्धिष्णू होत चालल्याचे, मराठ्यांचे निशाण नर्मदापार गेलेले पाहण्याचे भाग्य या येसूबाईंना लाभले.
छत्रपती शाहूंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मार्च १७२०*
कोल्हापूरकर संभाजीराजे यांचा पराभव
सन १७१९ साली पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी चासकर जोशी यांच्यामार्फत कल्याण - भिवंडी प्रांत स्वराज्यात आणला. यानंतर  बेळगांव, रूकडी, तावळे डिग्रज या भागात मोठी मोहीम राबविण्यात आली. थोरातांचा पून्हा बंदोबस्त करून आष्टा व येळावी ही दोन महत्त्वपूर्ण ठाणी ताब्यात घेतली. कोल्हापूरकर संभाजी राजे आणि शाहूमहाराज यांच्यात वैमनस्य वाढत होते. दरम्यान पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी कोल्हापूरला वेढा घातला. दिनांक २० मार्च १७२० रोजी कृष्णतीरावरील उरणबाहे येथे कोल्हापूरकर संभाजी राजे यांचा पूर्ण पराभव करून त्यांनी संभाजी राजेंना साताऱ्यास राजदर्शनासाठी आणले. साताऱ्यास राजबंधूंच्या भेटीगाठी, राजकीय खलबते झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मार्च १७३९*
नादिरशहाने दिल्ली लुटली. मयुरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मार्च १७६१*
पानिपतच्या युद्धानंतर दोन महिन्यांनी म्हणजे २० मार्च १७६१ रोजी अहमदशहा अब्दाली अफगाणिस्तानात जाण्यासाठी दिल्लीहून निघाला. त्याच्यासोबत मराठे युद्धकैदीही होते. परत जाताना पंजाबमध्ये शिखांनी या युद्धकैद्यांपकी काही मराठी स्त्रियांना मुक्त केले, अशी इतिहासात नोंद सापडते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० मार्च १९१०*
सावरकर बंधू, मदनलाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले. 
जॅक्सन मराठी भाषेचा आणि नाटकांचा चाहता असल्याने  नाटकाचा प्रयोग सुरू होण्याची वेळ झाली असताना अनंत कान्हेरे ह्यांनी जॅक्सनवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच ठार झाला. अनंत कान्हेरे आपल्या जागेवरच शांतपणे उभे राहिले, त्यांना त्यांच्या साथीदारांसह अटक करण्यात आली. कान्हेरे, कर्वे आणि देशपांडे यांच्यावर खटला भरण्यात आला. २० मार्च इ.स. १९१० रोजी तिघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.
नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४