मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई ईशप्रभू देसाई यांनी बनवून घेतलेली छत्रपती शिवरायांची अश्वारूढ दगडात कोरलेली मूर्ती)"सर्वांना जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छ"
दक्षिण दिग्विजय मोहिमेवरून परतताना बेलवडी या गावातील एक छोटीशी गढी छत्रपती शिवजी महाराजांच्या नजरेत आली. त्यांनी लगेच सैनिकांना गढी जिंकून स्वराज्यात घेण्याचा आदेश केला. ती गढी ईशप्रभू देसाई यांची होती. ते मराठ्यांच्याविरूध्द लढताना मृत्यूमुखी पडले होते. परंतू त्यांच्या मृत्यूपश्चात गढीचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नी मल्लम्मा देसाई या रणांगणात उतरल्या त्यांनी मराठ्यांच्या विरोधात मोठा संघर्ष केला. जवळपास एक महिना हि लढाई चालू होती. शेवटी मराठा सैनिकांनी गढी जिंकली व मल्लम्माला बंदी केले व शिवरायांसमोर हजर केले. शिवरायांना पहिल्यापासूनच महिलांविषयी आदर व सन्मान होता. त्यांना मल्लम्मांच्या पराक्रमाची बातमी कळताच त्यांनी मल्लम्माला बंदीमुक्त करण्याचा आदेश दिला. तसेच मल्लम्माला आपली धाकटी बहीण मानून तिची गढी व गावे तिला सन्मानपूर्वक परत केली तिच्या अल्पवयीन मुलाला अभय दिले एवढेच नाही तर तिच्या या शूर कार्यामुळे तिला 'सावित्री' हा किताब दिला. छत्रपती शिवरायांकडून मिळालेल्या एवढ्या मोठ्या सन्मानाने मल्लम्मा भारावून गेली तिला गहिवरून आले होते. तिने आपल्या जहागिरीतील यादवाड येथे शिवरायांचे अश्वारूढ दगडी शिल्प कोरून घेऊन शिवरायांचे मंदिर उभारले.
छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्री आदराबद्दल जागरूक आणि संवेदनशील होते. शिवरायांना स्त्री वर्गाबद्दल आदर होता मग ती कोणत्याही जाती-धर्माची असो. स्वराज्यात स्त्रीयांना देवीचे स्थान होते.
(फोटो - मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई ईशप्रभू देसाई यांनी बनवून घेतलेली छत्रपती शिवरायांची अश्वारूढ दगडात कोरलेली मूर्ती)
"सर्वांना जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छ"
💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Comments
Post a Comment