आजचे इतिहासाती दिनविशेष
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ मार्च १६४७*
छत्रपती शिवाजी महाराजांनी व आईसाहेब जिजाबाई यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला.
पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची "प्रतिपच्चंद्र" ही राजमुद्रा तसेच अखेरीस "मोर्तब" म्हणजेच समाप्तीमुद्रा आहे. या कसबा गणपतीच्या पुजा-अर्चेची सर्व जबाबदारी वेदमूर्ती विनायक भट ठकार यांच्याकडे असल्याचे समजते. शिवाजी महाराज म्हणतात गणपतीला दररोज अर्धा शेर तेल दिप व्यवस्थेकरीता असे..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ मार्च १६७४*
छत्रपती शिवरायांची धाकट्या पत्नी काशीबाईसाहेब यांचा रायगडावर मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ मार्च १७५४*
मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ मार्च १७५५*
तुळाजी आंग्रे विरोधात इंग्रज आणि पेशवे यांच्यात करार
तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला, सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला. सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व, प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली, इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते. इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१९ मार्च १७९२*
टिपू सुलतानला पकडले
टिपू सुलतानाच्या विरुद्धच्या चढाईत पटवर्धन कुटुंबीयांनी जबाबदारीचा मोठाच हिस्सा उचलला. त्यांच्या पैकी तीन संस्थानिक लढाईत उतरले अन वेगवेगळ्या दिशांना दबा धरून बसले. चिंतामणराव मिरजेतचं राहिले, कारण ते मुख्य केंद्र होते. परशुरामभाऊ तासगावला जाऊन राहिले, तर रघुनाथराव नीलकंठ कुरुंदवाडला. एखादी लढाई करून नामोहरम होणाऱ्यांपैकी टिपू सुलतान नव्हता, हे सर्वानाच माहिती होतं पण तो तब्बल दोन वर्ष टिकाव धरेल, याचीही कल्पना कुणी केली नव्हती त्यानं दोन वर्ष या तिन्ही फौजांना चकवलं पण शेवटी १९ मार्च १७९२ रोजी तो पकडला गेला. एक मोठी लढाई परशुरामभाऊ अन चिंतामणराव यांच्या सहाय्याने जिंकली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment