आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशष २१ मार्च
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ मार्च १६५७*
छत्रपती शिवरायांनी 'गुंजन मावळ' चे वतनदार 'शिळमकर' यांचा वतनाचा तंटा लाल महाल, पुणे येथे सोडवला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*२१ मार्च १६५७*
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून 'नूरखान बेग' यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फर्मान लाल महाल -पुणे येथून दिले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*२१ मार्च १६६७*
किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..!
किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग
आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
*२१ मार्च १६७०*
शिवरायांनी कर्नाळा किल्ला स्वाधीन करून घेताना केलेली गंम्मत व वापरलेली युक्ती मुंबईकर इंग्रजांनी त्यांच्या सुरतेच्या वरिष्ठाना पत्रं लिहून कळवली.
मुंबई - सुरत १६७० मार्च २१
'शिवाजी वर देशात गेला आहे. त्याच्या लोकांनी आमचेपासून जवळच दिसणाऱ्या कर्नाळा नावाच्या डोंगरी किल्ल्याला वेढा घातला आहे. आपल्या समोरून रक्षणाकरीता फळ्या आणि चिखल यांच्या भिंती बांधीत बांधीत ते तटांशी जाऊन भिडले आहेत. ह्या फळ्या ते लोक आपल्यासमोर धरतात थोड्या अवकाशात ते हा किल्ला घेतील.'
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ मार्च १७०२*
संताजी पुत्र राणोजी घोरपडे धारातिर्थी
मुघल पन्हाळ्याला थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ९ वर्षे वेढा घालून बसले होते पण किल्ला आणि किल्लेदार त्यांना काही दाद देत नव्हते. औरंगजेबाने आपले एका हून एक सरस उमराव पन्हाळ्यावर रवाना केले होते पण या पैकी कुणीच पन्हाळा काबीज करू शकले नाहीत.
किल्ल्यातून मराठे अनेक वेळेला मुघली छावणीवर रात्री-अपरात्री गनिमी हल्ला करीत आणि जमेल तेवढे शत्रूचे नुकसान करून पुन्हा गडावर पसार होत असत. गडावरच्या मराठयांना बाहेरून सुद्धा मदत मिळत असे.
धनाजी जाधवांच्या आणि हिंदुराव घोरपडेंच्या सैन्याने सुद्धा पन्हाळ्याच्या आसमंतातील मुघली फौजेला हैराण करून सोडले होते. पन्हाळ्याच्या आसमंतात अतुलनीय पराक्रम करणारा अजून एक वीर म्हणजे संताजी पुत्र राणोजी घोरपडे. या युद्धात राणोजी घोरपडेनवर जबाबदारी होती ती मुघली रसद मारण्याची आणि त्यांनी ती चोख बजावली. राणोजी घोरपडे शिपाईगिरित आपल्या वडलांच्या पुढेच होते असे काही इतिहासकार लिहितात. २१ मार्च १७०२ ला मुघली फौजेशी सामना करताना राणोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ताराराणीने राणोजी घोरपडेंच्या विधवा पत्नीला नंतर राणोजीच्या पराक्रमाची याद ठेवून
कापशी सुभा इनाम म्हणून दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ मार्च १७४८*
इ.स. १७४७ मध्ये अफगाणिस्तानचा बादशहा नादीरशहाचा खून झाला. त्यामुळे त्याचा सेनापती अहमदशहा अब्दालीने सत्ता बळकावली. सत्तेवर येताच त्याने हिंदुस्थानातील राजकिय गोंधळाचा फायदा घेऊन जानेवरी १७४८ मध्ये हिंदुस्थानावर पहिली स्वारी केली. पंजाबचा मोगल सुभेदार शहानवाजखानाचा पराभव करून दिल्लीवर चाल केली. दिल्लीच्या बादशहाने (महमदशहा) त्याच्याविरुद्ध आपला मुलगा अहमदशहा वजीर कमरुद्दीन व मीरबक्षी सफदरजंग यांना पाठविले. २१ मार्च रोजी मनुपूर तेथे लढाई होऊन अब्दालीचा पराभव झाला पण वजीर कमरुद्दीन मारला गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ मार्च १८२७*
सेनापती दौलतराव शिंदेंचे निधन
पेशवाई गेल्यावर नऊ वर्षें दौलतराव जिवंत होते. त्याच्या सारखा मुत्सद्दी व सेनापती नसल्यानें महादजीचे बेत याच्या हातून सिद्धिस गेले नाहींत. दौलतराव २१ मार्च १८२७ रोजीं मरण पावला. त्यावेळीं त्याचें राज्य दीड कोटीचें होतें. त्याची बायको बायजाबाई; त्याला पुत्र नसल्यानें दत्तक घेऊन बाईनें बरेंच दिवस राज्य चालविलें.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ मार्च १८५८*
सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment