पैठण येथील तीर्थस्तंभ आणि त्याचा गुढीपाडव्याशी असलेला संबंध
पैठण येथील तीर्थस्तंभ आणि त्याचा गुढीपाडव्याशी असलेला संबंध
दक्षिणेले पहिले मोठे राजकुळ असलेल्या महान सातवाहनांनी आपल्या संस्कृतीचा पाया घातला. सर्वात प्रसिद्ध सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने १९४४ वर्षांपूर्वी आक्रमक असलेल्या शकांचे दक्षिणेतून समूळ उच्चाटन केले. नाशिकजवळ त्यांचे खूप मोठे युद्ध झाले. शक राजा नहपान याचा पराभव करून ठार केले. या विजयाची आठवण म्हणून गुढीपाडवा व शालिवाहन शकाचे नववर्ष आपण साजरे करतो. आजपासून शालिवाहन शक १९४५ चालू झाले. शालिवाहन म्हणजेच सातवाहन. प्रतिष्ठान म्हणजे पैठण ही सातवाहनांची राजधानी. असे म्हणतात की शकांवर मिळविलेल्या या अंतिम विजयाचे प्रतीक म्हणून गौतमीपुत्र सातकर्णीने पैठणला हा विजयस्तंभ उभारला. त्याला तीर्थस्तंभ म्हटले जाते. निरनिराळ्या राजवटींच्या खुणा उमटलेला हा स्तंभ शिल्पशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. गो.नी.दाण्डेकरांनी काढलेला हा फोटो.🚩👌
Comments
Post a Comment