आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १६६३*
शिवतेज दिन - शाईस्तेखानाचा बिमोड...
दस्तुरखुदद आलमगीराचा 'मामा' व मुघल सेनेतील
मातब्बर सरदार असलेल्या शाईस्तेखानाची छत्रपती शिवरायांनी "गनिमी कावा" या रणनीतीने पुण्यातील लालमहाल येथे तळ ठोकुन बसलेल्या अंदाजे दिड लाखाच्या सैन्यात घुसुन रातोरात बोटे छाटली. या असल्या गनिमी छाप्याचे दुसरे उदाहरण जगात नाही. खान व त्याच्या कुटुंबाने महाराजांची जबर धास्ती घेतली. पुणे व परीसरातील लुट व गाईंच्या कत्तली सर्व बाहेर पडल्या. त्याची बेगम रात्रीचीच "शिवाजी आला शिवाजी आला" म्हणून ओरडत असे. पुढे औरंगजेबाने बोटे तुटलेल्या मामाला इराणला पाठवून दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १६६६*
औरंगजेबाचे राज्यरोहन
१६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दि. २७ मार्च १६६६ ला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला. छत्रपती शिवराय त्यावेळी प्रवासातच होते. राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १६६७*
मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले.
जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.
१९ जून १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १७३७*
चिमाजीअप्पांनी ठाणे जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १७५२*
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा !
कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला. २७ मार्च १७५२ होळकर-शिंदेंनी जरी हा करार पेशव्यांचे प्रतिनिधी म्हणून केला असला, तरी यादोघां प्रबळ सरदारांचे सामर्थ्य पाहूनच बादशहा हा करार करायला प्रेरित झाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १७६७*
मालेराव होळकरांचा मृत्यू
मल्हाररावांचे एकुलते एक पुत्र खंडेराव कुंभेरीच्या १७५४ च्या वेढ्यात त्यांस तोफेचा गोळा लागला व त्यांत त्यांचे निधन झाले (१७ मार्च १७५४).
त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२७ मार्च १७८५*
शिखांचा तह
नजीबखानाच्या मृत्यूनंतर दिल्ली दरबारात जो गोंधळ निर्माण झालेला होता , त्याचा फायदा घेऊन दिल्लीच्या आसपासच्या मुलखात,गुजर लोक लुटमार करीत होते. त्यामुळे त्या प्रांतातील लोकात खूप असंतोष निर्माण झाला होता.अंबूजी इंगळेंनी गुजर लोकांचा बंदोवस्त करून त्या प्रांतातील लोकांना दिलासा दिला. त्यामुळे साहजिकच तेथील लोकांना आनंद झाला. त्यानंतर अंबूजी इंगळेंनी आपले सर्व लक्ष शिखांकडे वळविले,
दि .२७ मार्च १७८५ रोजी अंबूजी इंगळे ह्यांनी दिल्लीच्या उत्तरेस तेरा मैलावर असलेल्या भक्तावरपूर येथील आपल्या छावणीत काही शिख सरदाराच्या भेटी घेतल्या. ह्या शिख सरदारात बघेलसिंग, करमसिंग, दुलजासिंग, भागसिंग, दिवाणसिंग, मोहनसिंग, गोहरसिंग ह्यांचा समावेश होता. ह्या भेटीमध्ये मोहनसिंग आणि दुलजासिंग ह्या प्रमुख सरदारांनी महादजींना भेटून मैत्रीच्या करारावर सह्या करावे असे ठरले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment