मार्च- जागतिक महिला दिन विशेष डफळापूर संस्थानातील केवळ पुरुषच नव्हे;परंतु स्त्रियाही राजसिहांसनावर विराजमान झाल्या व त्यांनीं कैक वर्षे पूर्ण मुत्सदीगिरीने राज्यकारभार पाहिला.

८ मार्च- जागतिक महिला दिन विशेष 

डफळापूर संस्थानातील केवळ पुरुषच नव्हे;परंतु स्त्रियाही राजसिहांसनावर विराजमान झाल्या व त्यांनीं  कैक वर्षे पूर्ण मुत्सदीगिरीने राज्यकारभार पाहिला. 

१. येसुबाई चव्हाण (मृत्यू १७५४)- जत संस्थानचे संस्थापक सटवाजीराव चव्हाण यांच्या सून.मौजे सरकुली येथील भोसले घराण्यातील कन्या.यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या बाजूने राहुन मराठा साम्राज्य साठी कामगिरी केली.या राजधुरंदर,लढाऊ तसेच धार्मिक होत्या.छत्रपती शाहू महाराज प्रथम हे कर्नाटक स्वारीवर असताना येसूबाईंनी राजेंना मेजवानीचे आमंत्रण दिले व राजेंनी १६/०७/१७३९ रोजी डफळापूरच्या राजवाड्यात १ दिवस मुक्काम केला असल्याची नोंद आहे. सावर्डेचा पाटील कैद केला त्यासंबंधी छत्रपती शाहू महाराजांनी येसूबाई यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे. 

२. बहिणाबाई चव्हाण (मृत्यू १७८०)-सटवाजीराव चव्हाण यांचे बंधू धोंडजीराव चव्हाण यांच्या सून. 
  बहिणाबाई यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या सोबत सलोख्याचे संबंध ठेवले होते व पुण्याच्या  दरबारात आपला  प्रभाव कायम केला होता.नानासाहेब पेशवा यांनी जत जहागिरीचा तोडगा काढत बहिणाबाईच्या बाजूने निकाल दिला होता.घाडगे,घोरपडे,शिंदे अनेक मराठा सरदार यांचा बहिणाबाई यांना पाठींबा होता. जतकर व डफळापूर यांच्यातील डफळापूरकरांना स्वतंत्र जहागिरी मिळून डफळापूर संस्थानचा पाया या स्त्रीने घातला.महादजी शिंदे यांच्याकडून बहिणाबाई यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. महादजी शिंदे यांनी बहिणाबाई यांच्या मृत्यूनंतर रामचंद्रराव (बहिणाबाईचा नातू) याला सहकार्य करण्याची पत्र लिहून हमी दिली. 

३. राणीबाई चव्हाण (मृत्यू १९१७)-रामचंद्रराव चव्हाण (डफळापूर संस्थानच्या शेवटच्या राणीसाहेब) यांच्या पत्नी.मुधोळच्या घोरपडे घराण्याशी आप्त. डफळापूर संस्थानसाठी त्यांनी केलेली कामगिरी उत्तम आहे.संस्थानमधील शाळेचा पाया,महिलांना मोफत शिक्षण,ग्रंथालय, रस्ते,न्यायव्यवस्था यांवर त्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली.राणीबाई डफळे यांनी डफळापूरच्या पुलाचे उद्घाटन केल्याची नोंद आहे. डफळापूरचे पहिले पोस्ट ऑफिक यांच्या काळातच सुरु झाले.                      -   डफळापूर संस्थान

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४