शिवविचार_प्रतिष्ठान**२५ मार्च इ.स.१६७०*
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*२५ मार्च इ.स.१६७०*
छत्रपती शिवरायांची चांदवडवर स्वारी.
*२५ मार्च इ.स.१६७५*
जाॅन चाईल्ड' या इंग्रज अधिकाऱ्याने छत्रपती शिवरायांची भेट घेतली. नोट: जॉन चाईल्ड हा बॉंबे चा राज्यपाल म्हणून इंग्रजांनी पाठवला होता
*२५ मार्च इ.स.१६८९*
मुघलांनी छत्रपती संभाजीराजेंना कैद केल्यानंतर मुघल सरदार 'झुल्फीकारखान' याने मराठ्यांची राजधानी 'किल्ले रायगड' ला वेढा घातला.
याप्रसंगी महाराणी येसुबाई यांनी छत्रपती राजाराम महाराजांना रायगडावरून निसटून जाण्याचा सल्ला दिला. जानकीबाई रायगडावर महाराणी येसुबाई व बाळ शाहू सोबत राहिल्या तर ताराबाई, राजसबाई, अंबिकाबाई या पत्नी व प्रल्हाद निराजी, खंडो बल्लाळ आदि सेनानीसह छत्रपती राजाराम महाराज यांनी रायगड सोडून जिंजीकडे प्रस्थान केले. वाटेत विशाळगडावर ताराबाई,राजसबाई आदिना पाठीमागे ठेवून ते जिंजीला पोहचले.
Comments
Post a Comment