आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१४ मार्च

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ मार्च १६४९*
छत्रपती शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ मार्च १६६५*
कारवार(मास्टर)- सुरत प्रेसिडेंट ला पत्र
“फेब्रुवारीच्या आरंभी ८५ लहान व तीन मोठी गलबतें घेऊन छत्रपती शिवाजीराजे मालवणांतून बाहेर पडले, ते गोव्यावरुन कसलाही विरोध न होता बार्सिलोरपर्यंत जाऊन, ते बंदर लुटून, गोकर्णला परत आले.”

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ मार्च १७०७*
महाराष्ट्र जिंकण्याची इच्छा अपुरी ठेवूनच औरंगजेब फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे मरण पावला. हि बातमी नुकतीच माळव्याच्या सुभेदारपदी नियुक्ती झालेल्या औरंगजेब पुत्र आज्जमशाह यास समजल्यावर तो ताबडतोब अह्मदनगरला आला व ईदचा मुहूर्त साधून १४ मार्च १७०७ ला त्याने आपणास मोगल सल्तनतीचा बादशाह म्हणून जाहीर केले. मोगलान मधील रिवाजाप्रमाणे, अन्य दावेदार  भावंडांचा काटा काढल्याशिवाय निरंकुश राजसत्ता लाभत नसल्याने, आज्जमशहा आपला भाऊ शाहा आलम याचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ मार्च १७२३*
खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी युद्ध करून मराठ्यांच्या फौजासह बाजीराव माळव्यात गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ मार्च १७६०*
पानिपत मोहीमेत अब्दालीच्या सैन्यापेक्षाही पेक्षाही मराठ्यांचा खरा पराभव हा "पाण्याने" केला. दिनांक १४ मार्च सन १७६० रोजी पडदुर येथून निघून सदाशिवराव भाऊसाहेब अत्यंत वेगाने उत्तरेत सरकले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१४ मार्च १८१८*
घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात
कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४