ओडिसाचे मराठा साम्राज्य🚩
ओडिसाचे मराठा साम्राज्य🚩
ओडिशा राज्य जे प्रामुख्याने भगवान जगन्नाथ मंदिराच्या रथयात्रेसाठी पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे....
जिथे दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक भगवान जगन्नाथ पुरी च्या दर्शनासाठी येत असतात ..
आणि ही रथयात्रा संपूर्ण देशात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते.
पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की ही जगन्नाथ पुरीची रथयात्रा सुरू करणारे दुसरे कोणी नसून
नागपूरच्या राजघराण्याचे संस्थापक महाराज रघुजीराजे भोसले होते...
कारण एकेकाळी हे मंदिर धन आणि वैभवाने खूप श्रीमंत होते.
परंतु मंदिरातील पैशाच्या लाभापोटी अनेक विदेशी आक्रमकांनी हे मंदिर लुटले.
ज्यामध्ये फिरोजशाह तुघलक, जहांगीर, अकबर, औरंगजेब, बंगालचे नवाब असे अनेक शासक समाविष्ट होते.
ज्यांनी केवळ मंदिराची संपत्तीचं नाही लुटली तर
मंदिराचा बराचसा भागही तोडला.
आणि मंदिराजवळच्या राहणाऱ्या हिंदूंची हत्या करून.
प्रचंड रक्तपात केला.
त्यामुळे प्रत्येक वेळी या मंदिरातील मूर्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागत होते.
अशा अनेक कारणांमुळे भगवान जगन्नाथ मंदिराची रथयात्रा पूर्णपने बंद झाली होती..
🚩ओडिशामध्ये मराठ्यांनचे आगमन 🚩🚩
18 व्या शतकात
मराठ्यांनी मुघल साम्राज्याचा यशस्वीरित्या पराभव करून
मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज संपूर्ण भारतभर रोवला होता..
ज्यामध्ये नागपूरचे महाराज रघुजीराजे भोसले यांचेही मोठे योगदान होते.
ज्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी बंगालवर विजय प्राप्त करून
ओडिशा सारखे पवित्र राज्य नवाब अलीवर्दी खान याच्या कैदेतून मुक्त झाले
आणि ओडिसा राज्याला मराठा साम्राज्यात विलीन केले..
त्यानंतर मराठ्यांनी ओडिशा राज्यावर स्वतंत्ररित्या आपला कारभार पाहणे सुरु केला.
ज्यामध्ये ओडिशा राज्याचे सुमारे 30 जिल्हे समाविष्ट होते..
पुढे रघुजीराजे भोसले जगन्नाथ पुरी च्या मंदिराजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी या मंदिराची दुरवस्था पIहिली..
आणि तात्काळ हजारो एकर जमीन दान देऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
यासोबत पूजा-पाठ करून मूर्तींची पुन्हा मंदिरात पुर्नप्रतिष्ठा केली.
आणि थांबलेली जगन्नाथ मंदिर रथयात्रा तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले,
आणि ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जगन्नाथ मंदिराचा खूप मोठया प्रमाणात विकास केल.
जसे की त्यांनी
त्यावेळी 40 लाख रुपये देऊन मंदिर परिसरात भोग मंडप उभरला.
मंदिराच्या मठात दानपIत्रे प्रदान केली..
बाहेरून येणाऱ्या भाविकांनसाठी राहण्यासाठी
22 धर्मशाळा बांधल्या.
आणि मठही बांधले
एवढेच नाही तर जगन्नाथ मंदिराच्या महाद्वाराजवळ ३४ फूट, जगन्नाथ मंदिरापासून 25 फूट अंतरावर एक अरुण स्तंभ आहे, जोही मराठयांनीचं बसवला होता.
मराठा शासनकाळात त्यावेळी
जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेवर साधारण २० हजार रुपये दरवर्षी निधी दिला जात असे..
याशिवाय भारतातील सर्व राज्यातील लोकांना जगन्नाथ मंदिराचे दर्शन घेता येईल,
यासाठी ओडिसाच्या कटकपासून कोलकाता, नागपूर, जयपूर, मद्रास, विशाखापट्टणम, कलिंगपट्टणम असे अनेक रस्ते मराठा शासनकाळात बांधले गेले.
आणि गरजेनुसार त्या रस्त्यावर पूल बांधण्यात आले.
जेव्हा आपण पुरी शहरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला असाच 280 फुटांचा पूल पाहायला मिळतो..
ज्याला अठरानाल पूल म्हणतात.
जो आजही मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देतो.
अशा अनेक प्रयत्नांनंतर मराठा शासनकाळात या मंदिराचे
वैभव पुन्हा परत आले ...
आणि महत्वाचे म्हणजे की मराठा शासनकाळात ओडीसातील फक्त मुस्लिम शासनकर्ते संपले नाहीत तर
हे मंदिर कायमचे बाहेरच्या आक्रमकांपासून सुरक्षित झाले.
तेव्हापासून ते आजपर्यंत या मंदिराची रथयात्रा कोणत्याही अडथळ्याशिवाय दरवर्षी एका नव्या उत्साहात प्रमाणे साजरी केली जाते.
या रथयात्रेला भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे श्रेय नागपूरच्या भोसले राजेंना जाते.
त्यामुळे दरवर्षी या रथयात्रेला
नागपूरच्या भोसले घराण्याला खास निमंत्रण असते.....
जय भवानी जय शिवाजी 🙏🙏
Comments
Post a Comment