गोत्र म्हणजे काय ?

गोत्र म्हणजे काय ?
धार्मिक विधी करताना बर्याच वेळा आपले गोत्र काय असा
प्रश्न गुरुजी विचारतात तेंव्हा गोत्र म्हणजे काय असा
प्रतिप्रश्न करणारे देखिल असातात, अशावेळेला पुर्वजांपैकी
कोणी एक पुरुष असे उत्तर देउन वेळ मारुन नेणारे काही जण
असतात. पण तसे नसून गोत्र ही वेद्यीक धर्माने दिलेलि
देणगी आहे. जन्मवंश शास्त्रदृष्ट्या अतंत्य सूक्ष्मस्तरीय
एक मानवशाखा आहे.
"धर्मसिंधु" ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दीलेले
आहे,
'तत्र गोत्र लक्षणम् - विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो$थ
गौतमः ।
अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ '
विश्वामित्र, जमदग्नि, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ,
आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे
होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय.
गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था
सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली
आहे. त्या त्या ऋषीं च्या नावांना गोत्र असे म्हणतात.
प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे
१ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व
२ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक
३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौवनाश्व
४ आयास्य : आंगिरस -आयास्य -गौतम
५ आर्ष्टिषेण : भार्गव - च्यावन -आप्न्वन - आर्ष्टिषेण -
अनूप
६ उपमन्यु : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु
७ कण्व : आंगिरस -आजमीढ -कण्व
८ कपि : आंगिरस -आमहीयव -औरुक्षयस
९ काश्य्प : काश्य्प -अवत्सार -नैधृव( काश्य्प) -अव्त्सार -
असित
१० कुत्स : आंगिरस -माधांत्र -कौत्स
११ कौंडिण्य : वासिष्ठ -मैत्रावरुण -कौंडिण्य
१२ कौशिक : वैश्वामित्र --अघमर्षण -कौशिक
१३ गार्ग्य : आंगिरस -शैन्य -गार्ग्य
१४ जामदग्न्य : भार्गव - च्यावन -आप्न्वन -और्व -
जामदग्न्य
१५ नित्युन्द : आंगिरस - पौरुकुत्स्य -त्रासदस्यु
१६ नैध्रुव : काश्य्प -अव्त्सार - नैध्रुव
१७ पाराशर :वासिष्ठ -शाक्त्य -पाराशर
१८ बादराण : आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु
१९ बाभ्र्व्य : वैश्वामित्र -देवरात -औदास
२० बिद : भार्गव - च्यावन -आप्न्वन-और्व - बिद
२१ भारव्दाज : आंगिरस बार्हस्पत्य -भारव्दाज २२मित्रायु :
भार्गव - च्यावन -देवोदास
२३ मुद्ग् गल : आंगिरस -भार्ग्याश्व -मौद्ग्गल्य
२४ यस्क : भार्गव वैतहव्य -सावेतस
२५ रथीतर :आंगिरस -वैरुप -रथीतर
२६ वत्स : भार्गव - च्यावन -आप्न्वन-और्व -जामदग्न्य
२७ वासिष्ठ : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु
२८ विष्णुवृद्ध :आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु
२९ वैश्वामित्र : वैश्वामित्र -अघमर्षण -कौशिक
३० शांडिल्य : शांडिल्य -असित -देवल
३१ शालाक्ष : वैश्वामित्र -शालंकालय -कौशिक
३२ शौनक : भार्गव -शौनहोत्र -गार्स्तमद
प्रवर म्हणजे काय ?
गोत्रांची संख्या अगणीत असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था
सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली
आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही
गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तिन ते पाच
पर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर
असे म्हणतात.
काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो.
तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,स्वतःची वेदशाखा,
सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम ह्यांची माहीती करुन दीले
जाते.
ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती ह्याचे हे छान उदाहरण आहे.....
जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यानी हे मान्य केलेले आहे की एका गोत्रात लग्न केल्यामुळे अनेक आजार ( जेनेटिकली ट्रांसमिटेड डिसीज ) होऊ शकतात आणि आपल्या पूर्वजानी जे नियम घालून दिले आहेत ते योग्य आहेत.....
ह्यातिल बऱ्याच गोष्टीची उकल जेनेटिक्सवाले आता करत आहेत ...
आपली हिंदू संस्कृती अतिशय पुढारलेली आहे . त्यामुळे योग्य अभ्यास करून त्यावर टिका करा....
धन्यवाद .............

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...