आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२४ जानेवारी १६६१*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जानेवारी १६६१*
कारतलबखान स्वराज्यावर चालून आला 
आणि कोकणात उतरला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जानेवारी १६६७*
छत्रपती शिवरायांनी १२ मावळ मधील 
"कानंद खोरे"चा वतनाचा तंटा मिटवला. मरळ घराण्याकडे परत वतनदारी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जानेवारी १६८०*
सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र 
पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी मार्टीनने नेमके असेच म्हटले आहे. तो लिहितो, The mere name of Chatrapati Shivaji Maharaja made them tremble.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुतगतीने होत कि, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. दि. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, Where he attempts there is but little space betwixt his notice and appearance and to send for soliders from Bombay will take up little less than twenty days time in less than half which he hath done his business and gone. (हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास २० दिवस लागतात पण त्याच्या अर्ध्या वेळातच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात.)
आपल्या विलक्षण प्रतिभेच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे नवे नवे प्रकार शोधून काढले की, त्यांचा प्रताप हा कायम अनेक दंतकथांचा विषय ठरला. महाराज जमिनीपासून १४-१५ हात उंच उडी मारतात, एका दमात ४०-५० कोस पायी चालतात, त्यांना पंख आहेत, ते जमिनीत घुसतात व अस्मानात गायब होतात, त्यांना सैतान प्रसन्न आहे अशा एक ना अनेक कथा त्यांच्या हयातीतच पसरल्या होत्या. कॉस्म द गार्द्रने या संदर्भात केलेले वर्णन तात्कालिन परिस्थितीचे परिचायक समजायला हरत नाही. तो लिहितो... The question is still unsolved whether he substituted others or himself or whether he was a magician or devil acted in his place. Such has been said about it in India and there is much divergence of opinion as usual.( महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वार्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वत: असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गार्द्रने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसर्‍या कोणाला स्वारीवर पाठवीत की ते जादूगर होते अथवा काही भुत पिशाच्च त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई ते गुढ अजूनही उकलेले नाही. हिंदूस्तानात सर्वत्र याच विषयाची चर्चा असून विभिन्न मतांता गोंधळ उडालेला आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जानेवारी १६८१*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूसमयीची राजकीय परिस्थिती
छत्रपती संभाजी महाराजांनी २० जुलै १६८० ला मंचकारोहण केले त्यावेळची राजकीय परिस्थिती बहुतांशी त्याच्या बाजूने होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मागे ठेवलेला संपत्तीकोषही यथायोग्य होता हे छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर आल्यानंतर केलेल्या मोजणीत लक्षात आले होते. मुघल व आदिलशाहसारख्या मोठ्या राज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळा पराभूत केले होते. त्यात दिलेरखानच्या मुघली आक्रमणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला मदत केल्यामुळे त्यांचे पारडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला झुकले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतात मोठ्या प्रदेशावर त्याची सत्ता प्रस्थापित केली होती. त्याबरोबरच इंग्रज, पोर्तुगिज व सिद्दीसारख्या लहान शत्रुंच्या आगाऊपणाचा महाराजांनी चांगला चोप देऊन समाचार घेतला होता. त्यामुळे हे तिघेही छत्रपती शिवाजी महाराजांना वचकून असत. त्यांच्या भितीचा उत्तम नमुना म्हणून एका पत्रातील उल्लेख खाली दिला आहे -

"This state is now free from anxiety. He [Shivaji] was far more dangerous in peace than in war."
"हे राज्य आता काळजीमुक्त झाले आहे. तो [शिवाजी] युद्धापेक्षा शांतीकाळात अधिक भितीदायक होता."

पोर्तुगिज पत्र, २४ जानेवारी १६८१

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जानेवारी १७३९*
अशेरीगड मराठ्यांनी जिंकला
छत्रपती संभाजी राजांच्या कारकीर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी इ. स. १६८३ साली तारापूरवर हल्ला करून बेचिराख केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला पण ऑक्टोबर १६८७मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी आप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून २४ जानेवारी १७३९ च्या कोंकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. १८१८ नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२४ जानेवारी १७६१*
नानासाहेबांना पानिपतवरील घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक २४ जानेवारी रोजी समजली. भेलसा पानिपतपासून सुमारे ५६० किलोमीटरवर आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...