Posts

Showing posts from January, 2023

सरसेनापती म्हाळोजी घोरपडे यांना ३३४ व्या स्मृतिदिन त्रिवार मानाचा मुजरा

म्हाळोजी घोरपडे एक अद्भुत सरसेनापती  हिंदवी स्वराज्याचा सरसेनापती होणं हे काही खायचं काम नव्हतं, यासाठी अफाट शौर्य, निस्सीम त्याग ,स्वामिनिष्ठा अन अथांग असा पराक्रम गाजवावा लागतो.  सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई ही सातारा जिल्ह्यातील वाईजवळ. या युद्धात सर्जाखान याचा त्यांनी दारुण पराभव केला होता ,परंतु हंबीरराव मोहिते यांना त्या लढाईत तोफेचा गोळा लागला व रणधुरंदर सरसेनापती हंबीरराव मोहिते हे धारातीर्थी पडले. १६ डिसेंबर १६८७ साली हंबीरराव मोहिते धारातीर्थी पडले. आणि स्वराज्याच्या माळेतील एक स्वामीनिष्ठ असा मोती निखळला. कधीही भरून न येणारे नुकसान त्यावेळी झाले. संभाजी राजांना लहानपणापासून वडीलधारी म्हणून असलेला आधार मावळला. वाईच्या लढाईत दुर्दैवाने सरलष्कर हंबीरराव मोहिते यांचा काळ झाला अन स्वराज्याचे सरसेनापती हे पद पुन्हा एकदा रिक्त झाले. त्यानंतर संभाजी राजांनी *_म्हाळोजी घोरपडे यांसी सरंजामी देऊन मुखत्यारी सांगून त्यांना सरनोबतीची वस्त्रे दिली.आणि म्हाळोजी बाबा स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून रुजू झाले._* तत्पूर्वी म्हाळोजी घोरपडे शहाजीराजां सोबत आदिलशाहीत सरदार हो

शिर्के म्हणजे सह्याद्री चे मुसलमान पूर्व शासनकर्ते.फेरिस्ता हि त्यांची कोकणचे राज्यकर्ते म्हणून नोंद घेतो.ह्या शिर्क्यांचे स्वतःचे स्वतंत्र चलन होते ते लारी नावाने ओळखले जाई .विशेष म्हणजे त्या भागाचे ते देशमुख.देशमुख वतन मुसलमान शाह्यांची देण असं म्हणतात त्यांच्या साठी हा अस्सल पुरावा.संदर्भ-वैद्य देशपांडे दप्तर.

Image
शिर्के म्हणजे सह्याद्री चे मुसलमान पूर्व शासनकर्ते.फेरिस्ता हि त्यांची कोकणचे राज्यकर्ते म्हणून नोंद घेतो.ह्या शिर्क्यांचे स्वतःचे स्वतंत्र चलन होते ते लारी नावाने ओळखले जाई .विशेष म्हणजे त्या भागाचे ते देशमुख.देशमुख वतन मुसलमान शाह्यांची देण असं म्हणतात त्यांच्या साठी हा अस्सल पुरावा. संदर्भ-वैद्य देशपांडे दप्तर.

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३१ जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ जानेवारी १६६१* कारतलबखानाचा समाचार घेण्यासाठी महाराजांनी किल्ले राजगड सोडला...! महाराजांनी नेतोजींसह उंबराणीच्या खिंडीकडे कूच केली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ जानेवारी १६६३* छत्रपती शिवरायांनी शामराज रांझेकर पंताना पत्र लिहिले. शामराज नीलकंठ रांझेकर हे पहिले प्रधान पेशवे असावेत. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ जानेवारी १६६५* मिर्झाराजे जयसिंग औरंगाबादेस पोहोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३१ जानेवारी १७२८* श्रीमंत बाजीराव पेशवे चोपड्यानजीक तापी उतरून १८ डिसेंबर १७२७ रोजी पौष वद्य प्रतिपदेला कुकरमुंड्याजवळ कुसुंबी प्रांतात आले. तेथून निजामाच्या डोळ्यात धूळफेक करण्याच्या हेतूने बुऱ्हाणपूर जाळण्याची हूल उठवून दिली. अकस्मात बाबापाऱ्याचा घाट उतरून राऊ भडोचवर गेले. अंदाजे ३१ जानेवारीच्या दरम्यान अलीमोहन गाठले. कोणासही स्वप्नातही वाटणार नाही, अशी घोडदौड करून निजामाला निष्प्रभ करून त्याच्या प्रांताची धूळधाण उडवली. गुजरातमध्ये शिरताच सुभेदार सरबुलंदखान याला (निजामाचे आणि याचे आपसात वैर होते) असे भासवले की, निजाम आणि बाजीरावाच्या संयुक्त फौजा गुजराते

स्वराज्य संकल्पक श्री.शाहाजीराजे भोसले महाराज साहेब समाधी स्मारक , होदेगिरी , दावणगेरे , कर्नाटक #स्वराज्यसंकल्पकशहाजीराजेभोसलेपुण्यतिथी

Image
स्वराज्य संकल्पक श्री.शाहाजीराजे भोसले महाराज साहेब समाधी स्मारक , होदेगिरी , दावणगेरे , कर्नाटक  #स्वराज्यसंकल्पकशहाजीराजेभोसलेपुण्यतिथी

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३० जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० जानेवारी १५२८* थोर राजपूत योद्धा महाराणा सांगा उर्फ संग्रामसिंह याचा स्मृतिदिन राजस्थानचा इतिहास लिहायचा म्हटले तर तो इतिहास महाराणा सांगाच्या उल्लेखाशिवाय अपूर्णच आहे. सुमारे ३००- ३५०वर्षे भारतावर राज्य करणार्‍या मोगल सत्तेला त्यांची भारतात पायाभरणी होत नाही तोच मुळापासून उखडून टाकण्याची ताकद त्यावेळी कोणाकडे असेल तर याचे फ़क्त एकच उत्तर इतिहास देतो ते म्हणजे रजपूत योद्धा महाराणा सांगा. आक्रमक, क्रूर, धर्मांध अशा मुसलमान सुलतानांची सहसा कुरापत न काढण्याचा हिंदू राजांचा पायंडा राणा सांग अगदी खुशाल झुगारून देत होता. उलट मुसलमान सुलतानांनाच मैदान सोडून पळून जाण्यास भाग पाडत हिंदूंची मुसलमान सुलतानांवर जबरदस्त दहशत बसवणारा वीर योद्धा म्हणजे महाराणा सांगा होय. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *३० जानेवारी १६४२* शहाजी राजे कर्नाटकास जातात माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकात

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२७ जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ जानेवारी १६५८* छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड"  जिंकून स्वराज्यात आणला. ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२७ जानेवारी १६६७* छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो : "धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शिवाज

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२४ जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ जानेवारी १६६१* कारतलबखान स्वराज्यावर चालून आला  आणि कोकणात उतरला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ जानेवारी १६६७* छत्रपती शिवरायांनी १२ मावळ मधील  "कानंद खोरे"चा वतनाचा तंटा मिटवला. मरळ घराण्याकडे परत वतनदारी. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२४ जानेवारी १६८०* सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र  पिढ्यान् पिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्रतापाने एवढे जेरीस आणले की, नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहीमेच्या वेळी मार्टीनने नेमके असेच म्हटले आहे. तो लिहितो, The mere name of Chatrapati Shivaji Maharaja made them tremble. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुतगतीने होत कि, शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. दि. २४ जानेवारी १६८० रोजी सुरतकर इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, Where he attempts there is but little space betwixt his notice and appearance and to send for soliders from Bomba

प्रजासत्ताक दिन विशेष माहिती🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 प्रजासत्ताक दिन विशेष माहिती 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 1️⃣भारतीय प्रजासत्ताक दिन 2️⃣काय आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व 3️⃣भारतीय राष्ट्रगीत 4️⃣15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी फरक 5️⃣भारताचा राष्ट्र ध्वज 6️⃣तिरंगा 7️⃣ध्वज फडकवण्याची नियमावली [1/26, 9:10 AM] ajaykasabekar50: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️         *🔸भारतीय प्रजासत्ताक दिन.🔸* *---------------------------------------------* *🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.* *---------------------------------------------* *भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे... याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.....* *या दिवशी

प्रत्येक दिवसाच नियोजन रोज निशी कशी असावी.नित्य आध्यत्मिक गोष्टी, व्यायाम,नित्य आचरणात आणणे खूप गरजेचं आहे

आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाला नियोजनाची आवश्यकता असते. रोज नित्य नियमाने रोज निशी लिहणं खूप महत्वा आहे. तुम्ही रोजनीशी कशी लहायची 1)तारीख व वार प्रिंटेड वही उत्तम. 2) अध्यात्मासाठी एक ओळ :- याच्यामध्ये आरती, दर्शन नामस्मरण,स्तोत्र पढणे,आणि घरातील देव पूजा इत्यादी गोष्टीचे उल्लेख करणे आवश्यक आहे. 3) अध्यात्मिक वाचन :- उदाहरणार्थ धार्मिक ग्रंथ  4) वाचनासाठी 30 मिनिटे :- सोशल मीडियावरील पोस्ट यासाठी एक ओळ. 5) लेखनासाठी एक ओळ :- आज नवीन लिहिलं याचे उल्लेख. & 6) व्यायाम:- तीस मिनिटे चालणे किंवा इतर योगा वैगेरे 7) प्रवास :- आजच्या दिवशी किंवा किती प्रवास केला. कुठून कुठपर्यंत किलोमीटर सहित. 8) नोकरीमध्ये काय काम केलं. असा उल्लेख. 9)व्यवसाय :-काय केल नफा तोटा उल्लेख करणे 10)संध्यकाळ ची दिवा बत्ती :- शुभम करोति. नामस्मरण आरती. इतर आध्यात्मिक सेवा. 11)आहार :- आहार काय केला याचा तपाशील 12)झोप :-किती तास. 13)आजच्या दिवसात नवीन काही शिकतात आलं का किंवा काही अचिव्हमेंट 14)मित्र व परिवार वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि कुणाचा आज वाढदिवस असे उल्लेख करणे

स्वराज्य संकल्पक, महाबली, सरलष्कर, फर्जंद महाराजसाहेब शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा"महाराजसाहेब शहाजीराजीराजे भोसले यांची होदेगिरी (जिल्हा दावणगिरी, कर्नाटक) येथील समाधी🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

Image
शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युध्दप्रसंगीची बुध्दीमत्ता, उत्तम प्रशासन व स्वतंत्र राज्यकारभार हे मुलभूत गुणकौशल्य असलेले ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते. शहाजीराजे भोसले हे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र होते तर छत्रपती शिवरायांचे ते वडील होते. "स्वराज्य संकल्पक, महाबली, सरलष्कर, फर्जंद महाराजसाहेब शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांच्या स्मृतिदिनानिमित्त मानाचा मराठी मुजरा" महाराजसाहेब शहाजीराजीराजे भोसले यांची होदेगिरी (जिल्हा दावणगिरी, कर्नाटक) येथील समाधी 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ जानेवारी १६५५*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जानेवारी १६५५* शहाजीराजांचे मोरया गोसाविंकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुनांना ताकीद पत्र, अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहु बजानेब कारकुनांनी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा| सुपे बिदानंद सु|| खमस खमसैन अलफ राजेश्री मोरोवा गोसावी सो|| चिंचवड पा|| पुणे यांचे बाबे रघुनाथ खेडकर येही हुजूर येऊन माळूम केले जे गोसावी यास इनाम पा|| मा|| बा||फर्मान व खुर्दखते वजीरानी व बा|| खुर्दखते रख्तखाना गह्दम सालाबाद ता|| सालुगा||कुलबाब कुलकानु दुमाले चालत असता साल माराकारणे कारकून नवी जिकीर करून गोसावियाचे इनामावरी कनकगिरीपटी नवी बाब जाली आहे ते घाळून पैकीयाची तहसील लाविली आहे व आणखी नविया पटिया जालिया आहेती त्याही घाळून घेऊन म्हणताती तरी ये बाबे माहाराज्रे ताकीद खुर्दखत मर्हामती करून कनकगिरीपटीची व आणिक नवे पटीयाची तसवीस न लगे व उसापती केली असेल टे फिराउन देती यैसा हुकुम केला पाहिजे म्हणौनू माळूम केले तरी गोसावियाचे इनाम कुलबाब कुलकानु ता|| सालगुदस्ता बा|| सनद दुमाले असता सालमा||कनकगिरीपटी घाळू

२० जानेवारी⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

२० जानेवारी ⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० जानेवारी १६७४* दिलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी तो उधळून लावला. या लढाईत दिलेर खानाचे १००० लोक ठार झाले. सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत ठार झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० जानेवारी १६८३* औरंगजेबचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२० जानेवारी १६९६* संताजी नावाचे वादळ हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसाव

सातारकरांनो, का विसरलात छत्रपती प्रतापसिंहराजेंचा प्रताप?* *क्रांतीकारी राजाची अवहेलना कशासाठी? महाबळेश्वरचा निर्माता उपेक्षित का?*

*सातारकरांनो, का विसरलात छत्रपती प्रतापसिंहराजेंचा प्रताप?*   *क्रांतीकारी राजाची अवहेलना कशासाठी? महाबळेश्वरचा निर्माता उपेक्षित का?*  सातार्‍यालगतचा महादरे तलाव कुणी बांधला किती सातारकरांना माहीत आहे? यवतेश्वरच्या मंदिरामागे तलाव बांधून त्यातील पाणी खापरी नळाने सातारा शहरात कुणी आणले? किती जणांना माहिती आहे?  सातार्‍याचा ऐतिहासिक राजवाडा, अदालतवाडा कुणी बांधला कितीजण सांगू शकतात? मराठा मुला-मुलींना ब्रिटीश काळात लष्करी शिक्षण देण्याची क्रांतीकारी व्यवस्था कोणी केली? हे कुणाला माहीत आहे का? जो छळ छत्रपती संभाजीराजेंचा औरंगजेबाने केला. तसाच छळ आणखी एका छत्रपतींचा ब्रिटीशांनी केला त्या थोरल्या प्रतापसिंहराजेंचा भिमप्रताप सातारकरांनो कसा काय विसरलात? जयंतीदिनी दोन हारांपुरतेच प्रतापसिंह महाराजांचे स्मरण शिल्लक राहिले आहे का? सन 1707 मध्ये छत्रपती संभाजीराजेंचे सुपुत्र थोरले छत्रपती शाहूमहाराज हे सातारच्या गादीवर बसले आणि सातारा ही छत्रपतींची राजधानी झाली.  सातार्‍यातल्या अनेक पेठा त्यांनी वसवल्या. प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण करुन शाहूमहाराजांनी आपली किर्ती दिगंतात पसरवली. सातार्‍याल

19/01/2023- गगनगिरी महाराज निर्वाणदिन..

Image
🟣१९/०१/२०२३- गगनगिरी महाराज निर्वाणदिन...🙏...🙏* *गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिला पुलकेशीच्या घराण्यातील होते, असे सांगितले जाते... श्रीपाद बाळासाहेब पाटणकर (साळुंखे) हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मणदुरे येथे १९०६ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय तीन वर्षे असतानाच त्यांचे आईचे व महाराज पाच वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले.....* *लहानपणापासूनच त्यांना ईश्वरप्राप्तीची ओढ होती. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले, नाथसंप्रदायींबरोबर ते बत्तीसशिराळा येथे आले. तेथे वयाच्या सातव्या वर्षी नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली. पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांनी चित्रानंदस्वामी यांची भेट झाली.....* *एकदा बद्रीनाथ जवळील व्यासगुंफेत महाराज अतिशय दमून भागून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले. साधूंनी त्यांच्या कमंडलूतील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोथिंबिरीसारखे गवत खायला दिले. त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितल

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१९ जानेवारी १३११*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१९ जानेवारी १३११* वारंगळच्या लुटीतच जगप्रसिद्ध कोह-इ-नुर (कोहिनूर) हिरा मलिक काफुरच्या हातात सापडला. तो हिरा मलिक काफूरने जून १३१० मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट केला. वारंगळची लुट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे. म्हणून त्याने कर्नाटकातील द्वारसमुद्र म्हणजे नंतरचे हलेबिंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले. १९ ऑक्टोबर १३१० ला मलिक काफूर दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर तीन महिन्यानंतर त्याची गाठ गुणवडीजवळ करणसिंह गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडली. वाटेत लागतील ती गावे लुटायची, स्रियांचे अपहरण करायचे, लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची हाच क्रुर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्यासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता.  पण गुणवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणाऱ्या भुयाराजवळ सुर्यकुल कुलभूषण श्री करणसिंह गावडे यांच्या आणि भीमराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सगर राजपूत

'राजा ऑफ सातारा' छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची आज २३० वी जयंती'(जन्म - १८ जानेवारी १७९३) .

'राजा ऑफ सातारा' छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची आज २३० वी जयंती' (जन्म - १८ जानेवारी १७९३) .  छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शाळा बांधून बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन दिले. मुलींच्या व दलितांच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या महाराजांना प्रतिकूल विचारांनाही सामोरे जावे लागले. मराठा मुला मुलींना लष्करी शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. सातारा शहरातील व ग्रामीण भागातील जनतेसाठी यवतेश्वर मंदिराच्या पाठिमागे एक मोठा सुंदर तलाव बांधला व त्यातील पाणी सातारला आणले. तसेच महादरे येथे तलाव बांधला. तेथील पाणी खापरी नळाने शहरात आणले. शहरात जलमंदिर पॅलेस चे बांधकाम केले.  प्रतापसिंह महाराजांनीच नवा राजवाडा बांधला. हा राजवाडा १८२६ मध्ये पुर्ण झाला. सध्या या ठिकाणी हायस्कुल (छत्रपती प्रतापसिंह हायस्कुल) सातारा नगरपालिका प्राथमिक शाळा भरते. हा वाडा बांधकामाच्या व नक्षिकामाच्या दृष्टिने फार अप्रतिम आहे.  सातारच्या राजांपैकी अत्यंत उमदा, अत्यंत थोर व चांगला असा हा राजा होता. अशा सदगुणी व कर्तबगार राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🙏

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१८ जानेवारी १६५७*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ जानेवारी १६५७* मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर औरंगजेबच्या हाताखाली मुघल सैन्य आदिलशाहीवर आक्रमणाची तयारी करत होते मुअज्जम दिल्लीहून ३० नोव्हेंबर १६५६ ला वीस हजार सैन्यानिशी निघाला व १८ जानेवारी १६५७ ला औरंगाबादेत पोहोचला त्याच दिवशी मुअज्जमच्या सैन्याने बीदरच्या किल्ल्याकडे कूच केले. त्यावेळी बीदरचा किल्ला सिद्दी मीरजानच्या हातात होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *१८ जानेवारी १६७५* छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आव्हान दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात, ”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे. पुढे शिवरायांच्या निधनानंतर "छत्र