महाबळेश्वर

महाबळेश्वर
वरील नावांची दोन ठिकाणे आहेत. एक नवे- त्याचे नांव मालकम पेठ व दुसरे जुने- किंवा क्षेत्र महाबळेश्वर.
नवे महाबळेश्वर- इंग्लडसारख्या थंड देशांतून आलेल्या इंग्रज राज्यकर्त्यांना व अधिकार्यांना महाराष्ट्रातील उन्हाळा असह्य होऊ लागला व म्हणून ते उन्हाळ्यात राहण्यासाठी थंड हवेची ठिकाणे शोधू लागले. माथेरानपेक्षाही महाबळेश्वर उंच असल्याने हे ठिकाण त्यांना पसंत पडले. सातारच्या महाराजांकडूनजागा मिळवून त्यांनी तेथे बंगले बांधले व इतर सोयी करुन घेतल्या. मोठ्या इंग्रज अधिकार्यांची चाकरी करण्याकरता हिंदु नोकर मंडळीही येऊ लागली. संस्थानिक, राजेराजवाडे, श्रीमंत लोक व व्यापारीही उन्हाळ्यात व थोड्या प्रमाणात हिवाळ्यातही येथे गर्दी करु लागले व वसाहत वाढत गेली. ही घटना सुमारे १४० वर्षापूर्वी घडली. या ठिकाणची उंची ४७१० फूट आहे.
जुने किंवा क्षेत्र महाबळेश्वर- हे नव्या महाबळेश्वरापासून सुमारे तीन मैल लांब आहे. या ठिकाणाविषयी पद्मपुराणाच्या सह्याद्रि खंडांत एक कथा आली आहे.
महाबळ व अतिबळ नावाचे दोन दैत्य भाऊ-भाऊ होते. ते उन्मत्त होऊन प्रजेचा छळ करु लागले. प्रजा ब्रह्मा, विष्णु, शंकर यांना शरण गेली व तिचे रक्षण करण्याकरता तिन्ही देव दोन्ही दैत्यांशी लढू लागले. विष्णू अतिबळाचा युध्दांत वध केला पण महाबळापुढे तिघांचेही काही चालेना. तेव्हा तिघांनीही महामाया देवीचे स्तवन केले. तेव्हा तिने महाबळाला ठार केले.
जुन्या महाबळेश्वराला धोम महाबळेश्वर असेही जुन्या महाबळेश्वराची उंची ४३८५ फूट आहे.
येथील डोंगरातून ७ प्रवाह बाहेर वाहात येतात. त्यांत शिवलिंगे आहेत. या सात प्रवाहांना कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री, सावित्री, भागीरथी, सरस्वती अशी नांवे आहेत. या सर्व नद्यांचे पाणी एका कुंडांत एकत्र आले असून त्याला ब्रह्मकुंड असे नाव आहे. तेथून ते दुसर्या एका कुंडात सोडले आहे. 
पाण्यातील लिंगावर १४ हातांची एक ताम्र गजाननाची प्रतिमा आहे. या मंदिराला पंचगंगा मंदिर म्हणतात. येथे रुद्र, चक्र, हंस, पितृमुक्ति इ. तीर्थे आहेत.
हे मंदिर इ. स. १२१५ यादव घराण्यांतील सिंघण देवाने बांधले. पुढे त्यांची दुरुस्ती वेळोवेळी शिवाजी महाराज, चंद्रराव मोरे, शाहू महाराज यांनी केली.
शिवाजी महाराजांनी देवळास तीन सोन्याचे कळस दिले होते. अहिल्याबाईने केदारेश्वराचे मंदिार बांधले. बारा वर्षाच्या तीर्थयात्रेनंतर समर्थ येथेच प्रगट झाले. ते येथे दोन अडीच महिने होते. पहिला मारुती त्यांनी येथेच स्थापन केला. येथून समर्थ कृष्णेच्या काठाकाठाने वाई, माहुली करीत कर्हाडपर्यंत गेले.
येथे गोपाळभट महाबळेश्वरकर नावाचे एक सत्पुरुष राहात होते. शिवाजी महाराजांनी व त्यांच्या मातुश्रींनी त्यांच्याकउून गुरुपदेश घेतला होता. महाराजांनी त्यांना वर्षासन दिले होते. ते सूर्यापासक होते. ६-१-६५ ला येथे शिवाजी महााजांनी आपल्या मातुश्रींची व एकनिष्ठ वृध्द माननीय सल्लागार सोनोपंत डबरी यांची सूर्यग्रहणाच्या वेळी सुवर्ण तुला केली. किती सोने लागले त्याचा उल्लेख नाही.
१६५७ अखेर दिवाकर गोसावी यांनी बहिरभटांमार्फत मंदिराची दुरुस्ती केली.
सवाई माधवराव हा एकच पेशवराव १४-१०-१७९१ रोजी येथे आला होता. त्याच्या बरोबर मॅलेट व प्राईस हे दोघे इंग्रज होते.
१६-५-१८९९ मध्ये स्वतंत्र तहाने प्रतापसिहाने इंग्रजांना हा प्रदेश तोडून दिला.
सातारच्या महाराजांच्याकडून महाबळेश्वरचे सौंदर्य ऐकून १८२४ च्या उन्हाळ्यात इंग्रज सेनापती पी. लॉडविक याने येथे भेट देऊन पहाणी केली. प्रथम त्याला डोंगराचे एक टोक सापडले म्हणून त्याला त्याचे नांव देण्यात आले. तो एकटाच काठी घेऊन हिंडत असता त्याचा कुत्राही एका चित्त्याने त्याच्या जवळून पळवला. लॉडविकने वर्तमान पत्रातून या ठिकाणावर लेख लिहिले. त्याच्यानंतर सातारचा इंग्रज प्रतिनिधी (रेसिडेंट) सेनापती ब्रिग्ज येथे आला व त्याने स्वत:करता एक इमारत बांधली. तोच येथील पहिला बंगला. त्याने सातारच्या महाराजांना सातारहून येथपर्यंत एक रस्ता बांधण्यास सांगितले. तो रस्ता प्रतापगडावरुन पुढे महाडपर्यंत नेण्यात आला. नंतर मुंबईचा राज्यपाल (गव्हर्नर) सर जे. मालकम् याने येथे इंग्रज शिपायांकरता एक आरोग्यधाम बांधले व तो स्वत: येऊन येथे उन्हाळ्यात राहू लागला. त्याच वेळी त्याच्यानंतर येणारा राज्यपाल कर्नल रॉबर्टसन याने आपल्याकरता एक इमारत बांधली.
१८२८ च्या नोव्हेंबरमध्ये सर. जे. मालकमने डॉ. विइलिअमसनला मुद्दाम आणून आरोग्यदृष्टीने त्याच्याकडून पाहणी करविली. माऊंट चार्लटवर राज्यपालाकरता खास बंगला बांधण्यात आला व त्याला लेडी मालकमचे नाव देण्यात आले. नंतर छत्रपतींमार्फत मालकम पेठ येथे येऊून राहण्याबद्दल जनतेला विनंती करण्यात आली. छत्रपतींमार्फत वरील रस्ता आणखी वाढवून पारघाटांतून महाडातून रायगड जिल्ह्यातील दासगावपर्यंत नेण्यात आला. हे काम १८३० मध्ये पूर्ण झाले. नंतर पार्शी व्यापारी आले. बटाट्याचे मळे तयार करण्याकरता चिनी कैद्यांना वेठीस धरण्यात आले. हे कैदी बाजाराजण असून त्यांना पूर्वेकडील इंग्रजांच्या वसाहतींतून आणण्यात आले होते. कैदेचा अवधी संपल्यानंतर ते मुक्त होवून लग्ने करुन त्यांनी येथेच संसार थाटे. छत्रपतींनी वाई तालुक्यातील खंडाळा या गावाबद्दल महाबळेश्वर इंग्रजांना दिले.
१८३१ मध्ये सरसेनापति सर सिडने बेकविथ येथे मरण पावला व तीन हजार रुपये सार्वजनिक वर्गणी गोळा करुन त्याचे येथे एक स्मारक बांधण्यात आले आहे. त्याच्यावरील दोन शिलालेख आता अस्पष्ट झालेले आहेत. गरीब लोक हे स्मारक पवित्र समजून त्याला नवस करतात. येथून आग्नेयेस ७०० यार्डावर इंग्रजांची स्मशानभूमि असून येथेही प्रेक्षणीय थडगी आहेत.
दरवर्षी गव्हर्नर उन्हाळ्यात येथे येत असे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४