आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१८ जानेवारी १६५७*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १६५७*
मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर औरंगजेबच्या हाताखाली मुघल सैन्य आदिलशाहीवर आक्रमणाची तयारी करत होते मुअज्जम दिल्लीहून ३० नोव्हेंबर १६५६ ला वीस हजार सैन्यानिशी निघाला व १८ जानेवारी १६५७ ला औरंगाबादेत पोहोचला त्याच दिवशी मुअज्जमच्या सैन्याने बीदरच्या किल्ल्याकडे कूच केले. त्यावेळी बीदरचा किल्ला सिद्दी मीरजानच्या हातात होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १६७५*
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आव्हान दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणून प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले.
त्यात ते म्हणतात,”ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?” पुढे राजे म्हणतात, ”या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.
पुढे शिवरायांच्या निधनानंतर "छत्रपती संभाजी महाराज" यांनी त्या जलदुर्गाचे काम पूर्ण केले. त्यास नाव दिले "किल्ले पद्मदुर्ग".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १६८४*
गोव्यातील मांडवी नदीच्या तोंडावर आग्वाद(अॅग्वाडा) किल्ल्याच्या समोर स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी औरंगजेबचे लढाऊ आरमार धान्य व युद्ध सामग्री घेऊन उभे होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १७६१*
नानासाहेबांनी १८ जानेवारी सन १७६१ रोजी माळव्याहून सदाशिवराव भाऊसाहेबांना जे पत्र लिहून पाठवले आहे त्यात ते म्हणतात "अब्दालीस कोंडून धरावे" याचा अर्थ पानिपतवरील घडलेल्या विपरीत घटना नानासाहेबांना कळाल्या नव्हत्या ते त्या काळी शक्यही नव्हते. कारण पानिपत ते माळवा यातील अंतर ६५० किमी आहे. 
नानासाहेबांना पानिपतवरील घटनेची सांकेतिक बातमी भेलसा येथे दिनांक २४ जानेवारी रोजी समजली. भेलसा पानिपतपासून सुमारे ५६० किलोमीटरवर आहे. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १७६८*
राणोजींची राजपूत पत्नी चिमाबाई हिच्या पोटी जन्माला आलेले महादजी हे राणोजी शिंद्यांचे कनिष्ट पुत्र होते. १८ जानेवारी १७६८ रोजी महादजी शिंदे वयाच्या चाळीशीत गादीवर आले ते १७९४ पर्यंत वयाच्या सत्तरीपर्यंत आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर सत्तेत राहिले. शिंदे होळकरांनी पुढे इतिहास घडवला. नजीबाच्या शत्रुत्वामुळे आपले दोन बंधू मृत्युमुखी पावले म्हणून महादजींनी त्याचा निर्वंश करायची शपथ घेतली होतीआणि ती पूर्णत्वास नेली नजीबाची राजधानी घौसगढ महादजींनी जमीनदोस्त केली. आणि नजीबाची कबर फोडून त्याचे प्रेत जाळले. नराधम नजीबाचा नीच नातू गुलाम कादर ह्यालाही महादजी शिंदेही यातनामय मरण देऊन त्या चांडाळाचा निर्वंश केला होता. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १७७९*
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले. त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१८ जानेवारी १७९३*
छत्रपती प्रतापसिंह भोसले यांचा जन्म
(मृत्यू -१४ ऑक्टोबर १८४७)
महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रतापसिंह भोसले प्रतापसिंह भोसले प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला.
सवाई माधवराव (कार. १७७४-९५) पेशवेपदावर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होता आणि छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते, तरी सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरा बाजीराव (कार १७९५-१८१८) पेशवेपदी आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा अवमान करण्यास प्रारंभ केला व अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः सातारच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले.
हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले (१८०९). ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले; पण त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने प्रतापसिंहाची नजरकैद अधिकच कडक केली. त्या वेळचा इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन याने या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले.
हे करताना त्याने प्रकटे केले, की ‘मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.’ परिणामतः अष्टी (सोलापूर जिल्हा) येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत (१८१८) प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर ११ एप्रिल १८१८ साली पुन्हा नेऊन बसविले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४