आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१६ जानेवारी १६६०*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १६६०*
अफजलखान वधानंतर पन्हाळगड, कोल्हापूर प्रांत हरलेल्या आदिलशहाने मराठ्यांवर दुसरी मोहीम उघडली.
रुस्तुम झमान, फाझल खान छत्रपती शिवरायांवर चालून आले असता त्यांचा पराभव होऊन त्यांनी पुन्हा विजापूरची वाट धरली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १६६६*
पन्हाळगड जिंकण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डाव 'नेताजी पालकर' वेळेवर न आल्याने फसला. १००० मावळे कापले गेले आणि मराठ्यांचा पराभव झाला. नेताजी पालकरांना छत्रपती शिवरायांनी बडतर्फ केले आणि त्या जागी कुडतोजी गुजरांना 'प्रतापराव' ही पदवी देऊन सरनौबत बनवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १६६८*
इंग्लंडच्या राजाने १६ जानेवारी १६६८ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहून ईस्ट इंडिया कंपनीला व्यापारासाठी परवानगी दयावी म्हणून विनंती केली. उत्तरादाखल २ ऑगस्ट १६६८ रोजी महाराजांनी जे पत्र आपल्या वकिलामार्फ़त इंग्लंडच्या राजाला पाठवले त्यात त्यांचा मुत्सद्दीपणा आणि जागरूकता दिसून येते. राजे म्हणतात, "दगाबाजी केलियास दोस्ती राहणार नाही आणि कंपनिस ताकीद करावी की व्यापाराशिवाय दुसरे कामात शिरू नये."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १६७८*
ब्रिटिशांचे दक्षिण दिग्विजय मोहीम संदर्भात लिहीतात :
आपली जगज्जेता म्हणून प्रसिद्धी व्हावी या महत्वाकांक्षा नेत्यांनी प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी कोकणातील अत्यंत दुर्गम किल्ला जो रायरी तेथून निघून २० हजार स्वार व ४० हजार पदाती घेऊन कर्नाटकवर गेले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अखलेल्या दक्षिण दिग्विजय स्वारीच्या दैदिप्यमान यशावर संपूर्ण हिंदुस्थानीच नव्हे तर पाश्चात्य व्यापार समूहाची देखील नजर लागून राहीली होती. तसेच या स्वारीच्या यशानंतर हिंदुस्थानच्या राजकीय पटलावर फार मोठे फेरफार होऊ शकतात असा कयास फिरंगी व्यापारी लावत होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १६८१*
१६ जानेवारी १६८१ रोजी राजे संभाजी महाराज छत्रपती झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अण्णाजीपंत आणि मोरोपंत यांना अटक केली.
शिवरायांचे जेष्ठ पुत्र संभाजी महाराज यांना स्वराज्याचे दुसरे छत्रपती होण्यासाठी राज्याभिषेक करण्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १६८१*
औरंगजेबावर चाल करून आलेला त्याचा पुत्र अकबरास औरंगजेबाने पुरते तोंडघशी पाडले त्यामुळे अकबरास जे राजपूत मदत करीत होते त्यांनी अकबराची पाठ सोडली व १६ जानेवारी रोजी सकाळी लढाईस तोंड उघडले त्यावेळी अकबराकडून थोडेच सैन्य रणांगणावर होते तथापि दुर्गादासने अकबरास अंतर दिले नाही. आपल्या पित्याच्या म्हणजेच औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी पळ काढला आणि दक्षिणेत छत्रपती शिवाजीपुत्र छत्रपती संभाजी प्रबळ आहे त्याच्याशी राजपुतांचे संगनमत करून औरंगजेबाचा डाव हाणून पडावा असा विचार करण्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१६ जानेवारी १७७९*
इंग्रजांची संपूर्ण शरणागती
१३ जानेवारी ला रात्री मराठ्यांनी वडगांव वर हल्ला चढवला तो १४ च्या सकाळी इंग्रजांनी पांढरे निशाण फडकवे पर्यंत तो चालुच ठेवला. अखेर १६ जानेवारी १७७९ ला नाना फडणिसांनी व महादजी शिंदेनी इंग्रजांची संपूर्ण शरणागती मान्य करत तह लादला. तहानुसार इंग्रजांना १७७३ पासुन जिंकलेला सर्व मुलुख परत करायचा होता तसेच मराठ्यांना युद्धखर्च ही द्यायचे मान्य केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४