आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*२१ जानेवारी १६५५*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १६५५*
शहाजीराजांचे मोरया गोसाविंकडून नव्याने कुठलेही कर घेऊ नये याविषयी पुणे व सुपे परगण्याच्या कारकुनांना ताकीद पत्र,
अज रख्तखाने राजश्री शाहाजी राजे दामदौलतहु बजानेब कारकुनांनी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा| सुपे बिदानंद सु|| खमस खमसैन अलफ राजेश्री मोरोवा गोसावी सो|| चिंचवड पा|| पुणे यांचे बाबे रघुनाथ खेडकर येही हुजूर येऊन माळूम केले जे गोसावी यास इनाम पा|| मा|| बा||फर्मान व खुर्दखते वजीरानी व बा|| खुर्दखते रख्तखाना गह्दम सालाबाद ता|| सालुगा||कुलबाब कुलकानु दुमाले चालत असता साल माराकारणे कारकून नवी जिकीर करून गोसावियाचे इनामावरी कनकगिरीपटी नवी बाब जाली आहे ते घाळून पैकीयाची तहसील लाविली आहे व आणखी नविया पटिया जालिया आहेती त्याही घाळून घेऊन म्हणताती तरी ये बाबे माहाराज्रे ताकीद खुर्दखत मर्हामती करून कनकगिरीपटीची व आणिक नवे पटीयाची तसवीस न लगे व उसापती केली असेल टे फिराउन देती यैसा हुकुम केला पाहिजे म्हणौनू माळूम केले तरी गोसावियाचे इनाम कुलबाब कुलकानु ता|| सालगुदस्ता बा|| सनद दुमाले असता सालमा||कनकगिरीपटी घाळूनु त्यास तहसील लावणे व आणिखी नविया पटीया घाळूनु घेउनू म्हणणे हे तुम्हास कोण फर्मावले आहे यावरून तुमचे कारकुनीची बूज जाहीर जाली आता खुर्दखत पावताच याचे इनामावरील कनकगिरीपटी घेतली असेली व टे आणिखी नविया पटीया काही घातलिया असतील तरी त्या दुरी करणे काही उचापती केली असेल तरी टे जराबजरा फिराउन देवणे त्याचा एक रुका ठेविलियावरी साहेब तुमची नुरी ण ठेवीत पेस्तर हरयेक बाब येकजरा याचे इनामाचे वाटे नव जाणे सालाबाद चालिलेप्रमाणे चालवणे तालिक घेऊन असल खुर्दखत फिराउन देणे फिर्यादी येऊ ण देणे पा|खा|| जैनाखान पिरजादे बा||
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १६६१*
आदिलशहाच्या ताब्यातील कोकणपट्टी स्वराज्यात सामिल करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोकण मोहिम हाती घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १६७५*
छत्रपती शिवरायांनी कुतुबखानाचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १७४०*
स्वतः शाहू छत्रपतींना बाजीरावांच्या ह्या गुणांची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच त्यांनी बहुतांश बाबतीत राऊंना स्वातंत्र्य दिले होते. त्यामुळेच अनेकदा मोहीमांवर बाजीराव परस्पर निर्णय घ्यायचे, तरी बाजीरावांच्या निष्ठेबद्दल शाहू थोडीदेखील शंका बाळगत नसत. बाजीरावांवर कधीच नाराज होत नसत. उलट १७२८ मध्ये सातारा दरबारातील पेशव्यांचे मुतालिक लिहितात (तत्रोक्त), "..राऊ स्वामींची मर्जी अवघियांनी पालावी. त्यांचे चित्तास क्षोभ करु नये"! किंवा मस्तानीच्याही संदर्भात शाहूंचे चिटणीस गोविंद खंडो दि. २१ जानेवारी १७४० यादिवशी नानासाहेबांना लिहितात (पेशवे दफ्तर, खंड ९, पत्र ३२), "ऐसियास राजश्री स्वामींची मर्जी पाहाता ते वस्तू (मस्तानी) त्याजबरोबर (बाजीराव) न द्यावी, ठेवून घ्यावी, चौकी बसवावी; त्यामुळे राऊ खटे जाले, तऱ्ही करावे ऐसी नाही"! एवढी मर्जी सांभाळत असत शाहू बाजीरावांची.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १७६१*
थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १८०५*
होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १८१९*
वीर नोवसाजी मस्के नाईकांचे स्वातंत्र्य युद्ध -
हे नोवाहचे युध्द दिनांक ८ जानेवारी १८१९ ते ३१ जानेवारी १८१९ पर्यंत चालले. २१ जानेवारी ला हाटकरांच्या उठावासंबंधी लेफ्टनंट रौबर्ट पिटमन याने ब्रिटीश अधिकारी हेन्री रसेलला लिहिलेल्या पत्रात नोवासाजी नाईकांच्या गनिमी युद्धनीतीचा उल्लेख केला आहे. "१९ तारखेच्या रात्री १० वाजता नोवसाजीच्या सैन्यातील २०० घोडेस्वार अचानक आले आणि त्यांनी माझ्या लष्करी छावणीच्या मागील बाजूस असलेल्या रक्षकावर गोळीबार केला. ते हल्ला परतवत होते, लेफ्टनंट सुथरलैंड यांनी त्वरित काही स्वार जमवून छोटे दल तयार केले, आणि काही मैलांपर्यंत त्यांचा पाठलाग केला, परंतु रात्रीच्या अंधारात ते दिसेनासे झाले."
निजामाच्या ५,००० सैन्याविरुद्ध हाटकरानी निकराचा लढा दिला होता. या संपूर्ण युद्धात हटकरांकडील ५०० अरब, ८० पेक्षा जास्त अतिजखमी आणि ४०० योद्धे शहीद झाले. तसेच, हैद्रबाद सरकारकडचे १८० सैनिक जखमी आणि २४ मारले गेले. जखमींमध्ये ६ युरोपीय अधिकारी होते. या युद्धात हटकरांना पराभव स्वीकारावा लागला. काही काळानंतर सर्व हटकर नाईकांना पकडून फाशीवर देण्यात आले. नोवसाजी यांना दगा करून पकडण्यात आले. ब्रिटिशांच्या दृष्टीकोनातुन हे युध्द इतके महत्त्वपूर्ण होते कि नंतर रेजिमेंटमध्ये युद्धाच्या विजयानंतर पदक वाटली गेली. ३१ जानेवारी १८१९ ला हाटकरांचे हे युद्ध संपल्याची माहिती मिळते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*२१ जानेवारी १९४३*
क्रांतिकारक हुतात्मा हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली.
हेमू कलाणी यांचा जन्म ११ मार्च १९२४ रोजी कलानी कुटुंबात सक्कर येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी पुढील शिक्षण टिळक हायस्कूलमधून घेतले. तिथेच त्यांनी राष्ट्रप्रेमाची दीक्षा घेतली. डॉ. मेघाराम कलानी यांनी कराची येथे स्वराज्य मंडळ नावाची संस्था स्थापन केली होती. या संस्थेमार्फत तरुणांनी स्वराज्य सेना सक्करमध्ये उभारली. या संघटनेचे नेतृत्व हेमू कलाणींकडे होते. आपल्या शाळेतील मित्रांना एकत्र करून हिंदूस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची शपथ घेतली. २३ ऑक्टोबर १९४२ रोजी लष्करी सैन्य घेऊन रेल्वेगाडी उडविण्याची योजना केली. योजनेप्रमाणे हेमू व त्यांच्या मित्रांनी रेल्वे रुळाच्या फिश प्लेट्स काढण्याच्या कामास सुरुवात केली. एवढ्यात संरक्षण पथकाचे शिपाई तेथे आले. हेमू कलाणींनी सर्व सहकार्यांना पळण्यास सांगितले. कोणीही पळण्यास तयार नव्हते. तरी हेमू कलाणींनी त्यांना दरडावून पळवून लावले. पण हेमू एकटेच शिपायांच्या हाती सापडले. लष्करी कोर्टापुढे त्यांना आणण्यात आले. त्यांचा अनन्वित छळ करूनही त्यांनी आपल्या सहकार्यांची नावे सांगितली नाहीत. हेमू कलाणींनी कोर्टाच्या कामात सहभागी होण्याचे नाकारले. बचावासाठी वकीलही दिला नाही. त्यांनी लष्करी कोर्टाला एकच उत्तर दिले, "गुलामी आणि दडपशाही यांचा प्रतिकार करण्याचा मला जन्मसिद्ध हक्क आहे. त्यासाठी मी जे काही केले त्याचा मला खेद वाटत नाही. लष्कराची सैनिक गाडी पाडण्यात मला अपयश आल्याने दुःख होत आहे."
लष्करी कोर्टाने हेमू कलाणींना आजन्म कारावासाची शिक्षा फर्मावली. पण लष्करी कमांडर लॉर्ड रिचर्डसन याने ती बदलून हेमू कलाणींना फाशी देण्याचे फर्मान काढले. हेमू कलाणींना वाचविण्यासाठी अनेकांनी व्हॉईसरॉय लॉर्ड लिनलिथगोपर्यंत प्रयत्न केले. परंतु काही उपयोग झाला नाही. फाशीपूर्वी वैद्यकीय तपासणीत त्यांचे वजन आठ पौंड वाढल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. "ब्रिटिश साम्राज्य नष्ट होवो !" अशा घोषणा देत हेमू कलाणी २१ जानेवारी १९४५ रोजी सक्कर येथे वधस्तंभावर चढून गेले.
भारतमातेच्या ह्या वीर सुपुत्रास मनाचा मुजरा !!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment