२० जानेवारी⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

२० जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १६७४*
दिलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला. पण मराठ्यांनी तो उधळून लावला. या लढाईत दिलेर खानाचे १००० लोक ठार झाले. सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत ठार झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १६८३*
औरंगजेबचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १६९६*
संताजी नावाचे वादळ
हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली.
संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले.
हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय
हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबला व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली.
सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे.
ही लढाई झाली २० जानेवारी १६९६
शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १७०६*
औरंगजेब नगरला पोहोचला
भीमसेन सक्सेना लिहितो " बादशहाने बहादूरगडाकडून अहमदनगरकडे प्रस्थान केलं (१४ जानेवारी). तो २० जानेवारी १७०६ रोजी अहमदनगरास पोहोचला. या ६ दिवसात मराठयांनी खुद्द बादशाही सैन्यावर धाडसी आक्रमणं केली. त्यांचा बिमोड करा म्हणून बादशाहाने हमीउद्दीनखान बहादूर यास आज्ञा केली, पण तो अनअनुभवी होता. मराठयांनी मोगलांचे हे सैन्य किती कुचकामी आहे हे पहिले. ते मोगलांवर तुटून पडले. त्यांनी अनेक मोगलांना मारले आणि कित्येकांना धरून नेले. मराठ्यांची दुसरी तुकडी मोगलांच्या बाजार बुणग्यांवर आली आणि इतर सामानांवर हल्ले करीत होती. त्याच वेळी बादशाह आपल्या सिंहासनवजा उघड्या पालखीतून जात असताना त्यांना दिसला. बादशाहाबद्दल आदराची भावना म्हणून मराठे लांबून त्याला पाहात राहिले. मराठे असे वागले हे बादशाहाचे भाग्यच म्हटले पाहिजे ".
रुमशामपावेतो ज्याचे साम्राज्य पसरले आहे असा साक्षात दिल्लीन्द्रेश्वर समोरून उघड्या पालखीतून चालला आहे आणि बादशाहबद्दलच्या कुतूहल मिश्रित आदराने मराठे त्याच्यावर हल्ला करायचा सोडून त्याला लांबून बघत राहिले या गोष्टीबद्दल त्या मराठा तुकडीला कोणीही दोष देईल, पण त्याच वेळी भीमसेन सक्सेनाने जे उद्गार काढले आहेत की ' मराठे असे वागले हे बादशाहाचे भाग्यच म्हटले पाहिजे ' यातच मराठा सैन्याची त्या वेळी किती दहशत पसरली होती हेही आपल्या लक्षात येतं. जर मराठे तसं न वागते तर मोगल साम्राज्याचा बादशाह हा नैसर्गिक मरण न येता मराठ्यांच्या तलवारीने अथवा मराठ्यांच्या कैदेत खितपत पडून मरण पावला असता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १७३४*
बाजीराव बल्लाळ पेशव्यांनी गौतमाबाई च्या नावे खाजगी जहागीर दिली. मल्हाररावांनी चिमाजी अप्पा कडे माझी सेवा लक्षात घेऊन माज्या पत्नीला खाजगी जहागीर मिळावी म्हणून सन १९३३ मध्ये विनंती केली. चिमाजीने अशी शिफारस बाजीराव पेशव्यांकडे केली त्याकाळी मल्हाररावांच्या शब्दाला पेशवे दरबारात वजन होते. छत्रपती शाहूंच्या आज्ञेने २० जानेवारी १७३४ ला मल्हारबांना पत्र लिहून यापुढे खाजगी व दौलत वेगवेगळे राहतील असे कळवले. त्याकाळी खाजगीच्या प्रदेशाचे उत्पन्न हे २,९९,०१० रु वार्षिक होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १७४५*
छत्रपती शाहुंचे इंग्रजांना पत्र
इ.स. १७४५ मध्ये शाहू महाराजांनी आणि नानासाहेब पेशव्यांनी पुन्हा एकदा जंजिरेकर सिद्दीविरुद्ध आघाडी उघडण्याचा मुहूर्त साधला आणि यात पूर्वीप्रमाणे इंग्रज सिद्दीला मदत करू लागले ती थांबावी म्हणून म्हणून इंग्रजांना पत्रं पाठवली. शाहू महाराज २० जानेवारी १७४५ रोजी मुंबईकरांना लिहितात, “तुळाजी आंग्रे यांना अंजनवेल घेण्याचा हुकूम मी दिला आहे, आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही त्यात कसलाही हस्तक्षेप करू नये”. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १७५६*
बंगालचा नवाब सिराजउदौलाने २० जानेवारी १७५६ ला कलकत्त्याला ब्रिटिशांच्या ताब्यातील फोर्ट विल्यम हा किल्ला काबीज करून सुमारे १४६ ब्रिटिश स्त्री-पुरुषांना किल्ल्यातील एका अठरा बाय चौदा फुटांच्या लहानश्या अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते. परिणामी त्यातील फक्त २३ जण वाचले आणि उरलेले १२३ जण मृत्युमुखी पडले. ब्रिटीश इतिहासकारांनी या छोट्या खोलीच्या तुरुंगालाच ब्लॅक होल ऑफ कलकत्ता असे म्हटले आहे. कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल च्या ऐतिहासिक संदर्भाला वैज्ञानिक अर्थ प्राप्त व्हायला सुमारे दोनशे वर्षांचा काळ जावा लागला. १९६७ साली कृष्णविवराचे कृष्णविवर अर्थात ब्लॅक होल असे नामकरण केले ते जॉन व्हीलर यांनी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२० जानेवारी १८५८*
क्रांतिकारी कुशलसिंह चंपावतला अटक
अजमेरचा चीफ कमिशनर पेट्रीक लाॕरेन्स याने या सैन्याच्या प्रतिकारासाठी जोधपूरच्या राजपूत राजाला सैन्य पाठविण्यास सांगितले. जोधपूरचा राजा तख्तसिंह याने आपला किल्लेदार ओनाडासिंह पवार याच्या नेतृत्वाखाली दहा हजार सैन्य व बारा तोफा त्यासाठी पाठविल्या . ज्याच्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष दिल्लीच्या तख्ताची सेवा केली. त्या तख्ताच्या संरक्षणासाठी जोधपूरच्या राजाने सैन्य व रसद न पाठविता तीच मदत त्या तख्ताच्या विनाशासाठी परक्या इंग्रजांच्या सहायार्थ मात्र सैन्य व रसद पाठवावी, केवढा हा दैवदुर्विलास ! जोधपूरच्या राजाचे सैन्य क्रांतिकारकांच्या सैन्याच्या दीड पटीपेक्षा माठे असले तरी क्रांतिकारकांच्या सैन्याने जोधपूरच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली व त्याच्या सर्व तोफा सुद्धाआपल्या ताब्यात घेतल्या. जोधपूरचा किल्लेदार ओनाडासिंह व त्याचे काही सैन्याधिकारी आपल्या शेकडो सैन्यासह या युद्धात ठार झाले . नंतर चीफ कमीशनर पेट्रीक लॉरेन्स व जोधपूरचा पोलिटिकल एजंट आपले सैन्य घेऊन त्या क्रांतिकारकांचा प्रतिकार करण्यासाठी आहुवा येथे आले. १८ डिसेंबर १८५७ रोजी दोन्ही सैन्यात तुंबळ युद्ध झाले. त्या युद्धात इंग्रजांचा पराभव झाला . त्यात मेसन ठार झाला. शेकडो सैनिक ठार झाले व पेट्रीक लॉरेन्सही जीव घेऊन पळून गेला.
  
 गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंगला जेव्हा हे वृत समजले तेव्हा त्याने २० जानेवारी १८५७ रोजी पालनपूर व नसिराबाद येथील छावण्यातून मोठे सैन्य आहवा येथे पाठवून दिले. त्या सैन्यापुढे क्रांतिकारकाच्या सैन्याचा टिकाव लागला नाही. कुशलसिंह चंपावतसह क्रांतिकारकाचे अनेक नेते पकडले गेले. त्यांना बंदीवासाच्या काठोर शिक्षा देण्यात आल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४