अपयशाला कारणीभूत ठरतात या गोष्टी

1)राग :-शब्दासाठी संताप, क्रोध, त्वेष, रोष, कोप हे समानार्थी शब्द आहेत.

2)आळस करणे :-काम करण्याच्या इच्छेच्या अभावाला आपण आळस म्हणतो. आळस आहे म्हणून काम करण्याची इच्छा होत नाही म्हणणं चुकीचं आहे. काम करण्याची इच्छा नसणे म्हणजे आळस होय. या प्रकारच्या आळशी व्यक्तींचा स्वभाव बनून जातो. त्या व्यक्ती जीवनात कधीही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाहीत. यशस्वी व्हायचं असेल तर आळस झटकलाच पाहिजे. 

3)खूप जास्त झोप :- सकाळी लवकर न उठणे, प्रमाणापेक्षा जास्त झोपणे,  दुपारी झोपणे या सवयींमुळे जीवनामध्ये अपयश येते. उदाहरणार्थ तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही अभ्यास करायला हवा. परंतु वेळ मिळालेल्या वेळेचा तुम्ही दुरुपयोग करता. परिणाम तात्पर्य असं येतं. तुम्ही नापास होता किंवा कमी मार्क मिळतात. या ठिकाणी अपयश आल्यामुळे. पुढील आयुष्य तुम्ही अंधारात ढकलत जात आहात.  त्यामुळे अति झोप हा अवगुण असून वेळेत त्याला दूर करायला हवा.


4) सतत इतरांना दोष देणे :- जीवनामध्ये  कोणतीही गोष्ट अशक्य नाही.जीवनामध्ये स्वतःचा रस्ता स्वतः तयार केला पाहिजे. कष्ट केले पाहिजेत. प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवण्यासाठी  सतत कष्टाची सवय ठेवली पाहिजे. परीक्षेत उत्तीर्ण व्हायचंय अभ्यास केला पाहिजे. तसंच कोणत्याही गोष्टी इतरांना स्वतः प्रयत्न करत राहणे हेच खरे जीवन आहे. स्वावलंबी होणे हेच खरे जीवन. इतरांना दोष देत बसाल तर तुम्ही तुमचा वेळ व्यर्थ घालवत आहात. तुम्ही बहुमूल्य वेळ तुमच्या कामावरती फोकस करा.  ध्येय जे असेल त्यावर फोकस करा.

5) नकारात्मक विचार :- काही माणसांना सतत निगेटिव्ह विचार करायची सवय असते. सवयीमुळे ते जीवनात कधीही यश मिळवू शकत नाहीत. भविष्य वर्तमान आणि भूतकाळ याचा इतिहास पाहून. वर्तमान मध्ये कार्य करत राहणे. प्रयत्न करत राहणे. हेच माणसाच्या हातामध्ये असले. तरीसुद्धा मनुष्य स्वभाव मात्र नकारात्मक विचारांनी भरलेला असतो. मग असंच होईल, तसंच होईल, चला तर काय करून तसं झालं तर काय करू. या विचारामुळे मनुष्य सतत निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतलेला असतो. नकारात्मक विचार दूर होण्यासाठी अध्यात्म खूप महत्त्वाचा आहे. मेडिटेशन खूप महत्त्वाचा आहे. नामस्मरण खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी जीवनातील प्रत्येक दिवशी थोडा तरी वेळ यासाठी   काढायलाच हवा.
6) लवकर हार मानणे :- आजकाल मनुष्यामध्ये सहनशीलता नावाची चीज खूप कमी आहे असं जाणवत आहे. कोणतेही ध्येय ठरवल्यानंतर. कधी यश तर कधी अपयश येतच राहतं. परंतु काही लोकांचे अपयश आल्यानंतर खचून जातात आणि लवकर हार म्हणून प्रयत्न थांबवतात. त्यामुळे ते जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. थोडसं संयम हवाच. प्रयत्नांती परमेश्वर.  त्यामुळे क्षेत्र कोणतेही असो लवकर हार म्हणायची नाही जोपर्यंत आपण जिंकत नाही.

6) लवकर यशाची अपेक्षा ठेवणे :- काही लोक झटपट श्रीमंत होण्यासाठी शॉर्टकट मार्गाचा अवलंब करतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांना लवकर यश मिळण्याची अपेक्षा असते. हीच अपेक्षा अपयशाला कारणीभूत ठरत असते. त्यामुळे यशाला शॉर्टकट नसतो. प्रत्येक गोष्टी मिळवण्यासाठी काही वेळ लागतो. तो पुरेसा वेळ संयम आणि प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात.


7) कामाबद्दल चालढकल करणे :- एखादं नियोजित काम असेल. आळसामुळे किंवा इतर गोष्टींमुळे त्या गोष्टीकडे त्या कामाकडे चालढकल करणाऱ्या व्यक्ती जीवनात कधीही यश मिळवू शकणार नाहीत.

8) आरोग्य आणि व्यायाम:- जीवनात यश मिळवण्यासाठी आरोग्य खूप महत्त्वाचा आहे. सकस आहार व व्यसनापासून दूर राहता आलं पाहिजे  आणि व्यायामाची जोड असायला हवी. योगासने, चालणे..

©®लेखक नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...