आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*११ जानेवारी १६६६*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १६६६*
मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर छत्रपती शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. पन्हाळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १६८०*
रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.
आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १६८८*
मातबरखानाने पट्टा गड जिंकला
१६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांनी १६८८ ते ८९ या कालावधीत मराठांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड, मोरदंत किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांनी जिंकून घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १७०३*
डफळे सरकारांनी औरंगजेबाला विनंती केली की माझ्या "फौजे बरोबर मुगलखानाची वागणूक बरी नाही तरी माझी नेमणूक फिरोजजंग याच्या फौजेत करावी" त्याची ही मागणी मंजूर पण झाली होती. त्यावेळी त्याला ६ हजार जात आणि ६ हजार स्वार अशी मनसब होती.
सांगली जिल्ह्यातील जत हे डफळे संस्थानाची मुख्य ठिकाण किंवा राजधानी होते. घराण्यातील मूळ पुरुष म्हणून सटवाजी कडे पाहिले जाते. सटवाजी पराक्रमी होता. संताजी बरोबर त्याची दोड्डेरीची लढाई, साताऱ्याची लढाई प्रसिद्ध आहे. मोगल कागदपत्रात देखील सटवाजीचे उल्लेख सापडतात. सटवाजी हा कर्नाटकी बर्कँदाज बळगण्यासाठी प्रसिद्ध होता. बर्कँदाज म्हणजे बंदुका चालवणारे शिपाई. त्याकाळी बंदुका वापरणे म्हणजे आधुनिकतेचे प्रतीक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा कधीच स्वराज्यात नव्हता. 
मुघलांच्या बाजूने लढणाऱ्या काही प्रमुख दुय्यम दर्जाच्या सरदारात माने, घोरपडे, घाटगे, डफळे घराण्याचा समावेश होतो. संस्थान म्हणून प्रसिद्धी पावलेल्या डफळे घराण्याची कारकीर्द उत्तम राहिली . यांचा स्वतःचा ध्वज देखील होता. जत गावात भव्यदिव्य, सुंदर असा वाडा आहे. उमराणी गावात व डफळापुर येथे देखील वाडे आहेत .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १७१७*
छत्रपती  शिवाजी महाराजांचे अंगरक्षक येसाजी दाभाडे यांचे थोरले पुत्र खंडेराव दाभाडे होते. इ.स.१७०५ ते १७१७ मध्ये खंडेराव दाभाडे यांनी गुजरात प्रांतात धडक मारुन बडोदे पर्यंतचा प्रदेश काबिज केला. छत्रपती शाहू महाराजांनी ११ जानेवारी १७१७ मध्ये खडेराव दाभाडे यांची मराठा साम्राज्याचे सरसेनापती म्हणून नियुक्ती केली.
सेनापती खडेराव दाभाडे यांना वतन म्हणून मिळालेल्या तळेगावाला नंतर तळेगाव दाभाडे या नावाने ओळखले जाऊ लागले. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १७३९*
मराठ्यांनी डहाणू जिंकला
सन १५३३ मधे झालेल्या तहात पोर्तुगिजांनी व्यापारासाठी डहाणू बंदर ताब्यात घेतलं, तर राजर्षी रामोजी शिंदे यांनी ११ जानेवारी १७३९ रोजी डहाणू शिताफीने जिंकला. पुढे काही काळ हा किल्ला इंग्रज आणि पुन्हा मराठ्यांकडे आला. अखेर १८८८ मधे या किल्ल्याचं पोलिस कचेरीत रुपांतर झालं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १७७९*
पहिले मराठा - इंग्रज युद्ध
इंग्रजांनी आपले जड साहित्य तसेच टाकत पळ काढला, पण मराठी फौजेने माग सोडला नाही अखेर इंग्रजांनी वडगावचा आश्रय घेतला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १९४१*
दुसऱ्या महायुद्धात मराठा सैनिक गल्लाबत ( सुदान) येथे इटालियन सैन्यासमोर लढत होते. परिस्थिती पुर्णपणे विपरीत झाली होती मराठा बटालियन युद्ध हारलेल्या परिस्थितीत होती. अशावेळी कॅप्टन बुमगार्ट/ capt. Boomgart ने अत्यंत आवेशपुर्ण भाषण ठोकले त्या भाषणात बटालियनला छत्रपती शिवाजी राजांची आठवण करून दिली. त्या युद्धापर्यंत मराठा बटालियन " हर हर महादेव " हा जयघोष देत असे या युद्धात पहिल्यांदा "छत्रपती शिवाजी महाराज कि जय " हि घोषणा दिली गेली याचा परिणाम म्हणजे मराठे असे विरश्रिने लढले कि ते हरलेलं युद्ध इटालियन garrison ला हरवुन जिंकल गेलं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*११ जानेवारी १९६६*
स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. 
(जन्म - २ ऑक्टोबर १९०४)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४