आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष🚩🏇🚩🏇🚩🏇🚩#१४_जानेवारी_
🚩
#आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_जानेवारी_१६४१
शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र:-
शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे म्हणून पत्नीची व शिवबाराजांची भेट होऊनहि एक वर्ष झाले होते त्यामुळे शहाजीराजांनी दादोजींना पत्र पाठवुन त्यांना बंगरुळास बोलावुन घेतले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_जानेवारी_१६५८
कोकण मोहीम आटपून "शिवराय" किल्ले राजगडावर आले.
हाच तो दिवस ज्या दिवशी शिवरायांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तुमध्ये प्रवेश केला.
राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून किल्ले "राजगड" तिर्थक्षेत्रात पालटून गेला, तोच हा दिवस.
यापूर्वी स्वराज्याची सुत्रे "किल्ले पुरंदर" वरून चालवली जायची.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_जानेवारी_१६८५
छत्रपती संभाजी महाराजांनी शहाबुद्दीनचा पराभव केला.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#१४_जानेवारी_१७६१
#पानिपतचा_प्राणघातकी_रणसंग्राम.
पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला परंतू पानिपत येथील पराभव हा मराठी राज्याला कलंक नसून अभिमानास्पद आहे, कारण यानंतर अफगानी आक्रमण पुन्हा दिल्ली पाहू शकले नाहीत, मोगल साम्राज्य संपुष्टात येत होते.
राज्य टिकवण्याचा जोम किंवा वकूब मोगलांच्यात राहिला नव्हता .
त्यातून नादिरशहाच्या स्वार्यापासून वायव्येकडून अफगाणांचे हल्ले हिंदुस्थानावर होऊ लागले.
अहमदशहा अब्दालीच्या आक्रमणात दत्ताजी शिंदे यांना वीरमरण आले यामुळे सारा महाराष्ट्र चवताळून उठला. सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोहिमेत विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे सारखे अवघे सोळा सतरा वर्षांचे सेनानीही आपल्या जीवाची पर्वा न करता सामील झाले होते.
हिंदुस्थानच्या रक्षणासाठी झालेल्या या लढाईत महाराष्ट्राची एक सबंध पिढी मारली गेली .
हल्ली आपण पानिपत म्हणजे पराभव असे मानतो परंतु पानिपत म्हणजे पराभव नव्हे पानिपत म्हणजे मराठा सैन्याने अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम, पानिपत म्हणजे
“ बचेंगे तो और भी लडेंगे “
अस उत्तर देणारा शूरवीर दत्ताजी शिंदे,
सदाशिवराव भाऊंच्या जिगरबाज लढ्याची कहाणी, कुंजपुरा जिंकल्यावर भाल्याच्या फाळावर कुतुबशहाच मुंडक लावून दत्ताजीच्या मृत्यूचा बदला घेणारा जनकोजी, मराठा फौजेला दाणापाणी पुरवायला आकाशपाताळ एक करणारे म्हातारे गोविंदपंत आणि पोटात अन्नाचा कण नसताना अंगावर झालेल्या शेकडो जखमांची पर्वा न करता मराठा सैन्याला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे हजारो मावळे.
पानिपतावर रक्त सांडलेल्या प्रत्येक शूर-वीराला
मानाचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली🙏
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
#संदर्भ_सह्याद्रीचे_अग्निकुंड
#सहयाद्री_प्रतिष्ठान
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
Comments
Post a Comment