आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*५ जानेवारी १५९२*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १५९२*
शाहजहानचा जन्म
खुर्रम, लाहोर, पंजाब (पाकिस्तान) येथे मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई यांच्या पोटी  शाह जहान नामक पुत्र जन्माला आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १६५७*
आदिलसाही सैन्याबरोबर मासूरजवळ झटापट
मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर उद्भवलेल्या आदिलशाहीतील कलहाबद्दल छत्रपती शिवरायांना बहुतेक कल्पना होती. वरील फर्मान मुहम्मद आदिलशाहच्या मृत्यूनंतर आठरा दिवसांनी लिहीले आहे. त्यामुळे आदिलशाहीतील अस्थिरतेचा लाभ घेऊन छत्रपती शिवरायांनी मासूरवरील छापा घातला. हा भाग छत्रपती शिवरायांच्या मुलुखापासून बराच दूर आहे. त्यामुळे हा छापा प्रदेश जिंकण्यासाठी नसून खंडणीसाठी असावा हे जास्त संयुक्तिक वाटते. अशावेळी छत्रपती शिवरायांची नीति कमीतकमी जीवहानी व जास्तीजास्त धनलाभ अशीच होती. त्यामुळे ज्याला आदिलशाही फरमानात पराभव म्हटले आहे ती खरतर यशस्वी माघार असावी असे दिसते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १६५८*
१६५७ च्या ऑक्टोबरात शिवरायांस कुणकुण लागली की कल्याण-भिवंडी प्रांताचे बहुतेक स्थानिक प्रमुख आदिलशाही सत्तेचे अन्यायी जूं झुगारून देऊन मुक्त होऊ इच्छित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले सरदार आबाजी सोनदेव यांस कल्याण-भिवंडी जिंकून स्वराज्यात आणण्यास पाठविले. ते काम ह्या अधिकाऱ्यांनी केल्यावर महाराजांनी ५ जानेवारी १६५८ ला माहुली काबीज केली. नंतर राजमाची, लोहगड हे डोंगरी किल्ले ताब्यात घेतले. अशा रीतीने प्रजेच्या अनुकूलतेने उत्तर कोकण महाराजांच्या ताब्यात आले. त्यानंतर एक-दोन वर्षांत महाराजांनी कुडाळपर्यंत दक्षिण कोकण काबीज करून तेथे आपला अमंल बसविला. कल्याण १६५७त ताब्यात आल्यावर महाराजांनी कल्याण बंदरात नाविक तळ बनविला आणि गलबते उभी करण्यासाठी गोदीही बांधली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १६६४*
सुरतेवरील पहिला स्वारी
सुरतेहून पाळती बहिर्जी जासूद आला सुरतेची पोथी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांपुढे वाचली आणि म्हणाला की, सुरत मारील्याने अगणित द्रव्य सापडेल, असे सांगितले त्याजवरून राजीयांनी विचार केला, आणि बेत निघाला सुरत बद् सुरत करण्याचा...
सुरत म्हणजे औरंगजेबाच्या दारातील पारडू मेलेली दुभती म्हैसच होती. दिल्ली खालो खाल दिमाख होता सुरतेचा अशा ह्या सुरतेत औरंगजेबाच्या ५ हजार सैनिकांचा जागता पहारा. सुरतेभोवती अभेद्य तटबंदी राजगडापासून अंदाजे ३२५ किलोमीटर उत्तरेला असलेल्या ह्या सुरतेच्या प्रत्येक घराची खडान खडा माहिती राजांना होती कारण राजांचा तिसरा नेत्र सुरतेवर पाळत ठेवून होता तो तिसरा नेत्र म्हणजे बहिर्जी नाईक.
सुरत म्हणजे ऐश्वर्य. अवघ्या जगातील व्यापाराच्या मोठ्या घडामोडी इथे चालत अठरा टोपीकर , इराणी ,हाफ्शी, तुराणी, बगदादी, अरबी, बोहरा, खोजा, यहुदी, अफघाणी, मुघली इत्यादी परदेशी व्यापारीहि इथून व्यापार करत असत. ह्या लोकांनी सुरत भरून गेली होती.
औरंगजेबाच्या फौजेने ३ वर्षे रयत नासवली होती नागवली होती ह्याची भरपाई म्हणून महाराजांना सुरतेतील संपत्ती हवी होती
सुरतेवर निघण्याची तयारी जय्यत झाली आठ हजार घोडेस्वार तयार झाले निघण्याचा दिवस ठरला १५ डिसेंबर १६६३. आईं जगदंबेचे दर्शन घेऊन आणि आऊ साहेबांचा आशीर्वाद घेऊन राजे निघाले. मजल दरमजल करत ५ जानेवारी १६६४, मंगळवार छत्रपती शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील इनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, "इनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही."
पण दिखाऊ कर्तबगारीचा तो इनायतखान बहादूर याने महाराजांचे सौजण्यशील फर्मान धुडकावून लाविलेत्या मगरूरी मुळे महाराजांनी सुरत लुटण्याची आज्ञा केली.
सावकारांचे वाडे काबीज करून सोन, रूपे, मोतीं, पोवळे,माणीक, हिरे, पाचू, गोमेदराज, ,असे नवरत्ने; नाणे, मोहोरा, पुतळ्या , इभ्राम्या, सतराम्या,असफ्या, होन, नाणे नाना जातींचे इतका जिनसांच्या धोंकटीया भरल्या. कापड भांडे तांब्याचे
वरकड अन्य जिन्नस यास हात लाविलाच नाही असे शहर चार दिवस अहोरात्र लुटिले (सभासद बखरीतील वर्णन)
सुरत मनसोक्त लुटून महराज आल्या मार्गानेच निसटले.
इतिहास काळापासूनचं लुट ह्या शब्दानेच अंगावरती काटे उभे राहतात, अर्थातच भयावह असणाऱ्या ह्या शब्दाला देखील महाराजांनी किती वेगळाच अर्थ दिला. लुट म्हटली की कत्तली ह्या अग्रभागीच कुणाचीच गय त्यात केली जात नाही. कुठलेही ठिकाण सोडले जात नाही पण परधर्माची मंदिरेच काय साध्या मुक्या जनावरांना देखील धक्का लागणार नाही अशी लुट घडविले माझ्या राजाने
आज दिनांक ५ जानेवारी १६६४ पासून पुढे ४ दिवस हि लुट चालू होती, पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १६७१*
छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे (पेशवे) पंतप्रधान यांनी साल्हेर जिंकला. साल्हेरवर फत्तुल्लाखान हा सरदार होता. मराठ्यांच्या पहिल्या दिवशीच्या हल्ल्यातच हा ठार झाला. दाऊद खान कुरेशी हा मोगल सरदार साल्हेर वाचवण्यासाठी फर्रादपूराहून निघाला, पण साल्हेर गेल्याची कथा त्याला वाटेतच समजली. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १६८४*
१५ सप्टेंबर १६८३ रोजी शाहआलम औरंगाबादहून रामदेव घाटांतून दक्षिण कोकणच्या स्वारीवर शाहआलम रवाना झाला. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १६९३*
देसूर मुक्कामी जुल्फिकारचा समाचार
हा काळ होता १६९२चा मराठे पळवून पळवून मोगलांना मारत होते. संताजी धनाजी, असे सारेच वीर शर्थीने राज्य राखत होते. मराठ्यांचा तिसरा छत्रपती राजे राजाराम महाराज यावेळी जिंजीस होते आणि जिंजीस औरंगजेबाचा पुत्र कामबक्ष याचे वेढे पडले होते परंतू त्याचे आणि राजाराम महाराजांचे संबंध अगदी चांगले झाले होते. (बापाच्या मृत्यू पश्चात गादीसाठी होणाऱ्या भांडणामध्ये मराठ्यांनी आपली बाजू धरावी यासाठी) त्यामुळे तो वेढा देऊन बसलाय असे कधी वाटच नसे.
जिंजी पासून वांदीवॉश हे ठिकाण सुमारे २५ मैल दूर आहे. तेथे मोगलांची अन्नधान्य सामग्री होती मराठे मोगलांनी तिथपर्यंत जाऊ देत नव्हते मोगलांचे पहिले २ प्रयत्न फसले पण तिसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांना यश आले. जुल्फिकार खान. ते अन्नधान्य घेऊन पुन्हा आपल्या तळाकडे निघाला. मार्गात देसूर (जिंजीपासून १३ मैल ईशान्येस) या ठिकाणी संताजीने आपल्या २० हजार सैन्यानिशी खानावर हल्ला चढविला. मोठी तेज लढाई झाली भीमसेन सक्सेना हा मोगल इतिहासकार या लढाईच्या वेळी हजर होता. त्याने ही लढाई प्रत्यक्षात पाहिली असल्याने त्याच्या वर्णनास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. 
तं लिहितो.
....जुल्फिकार खान परत येण्यास निघाला. मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरुवात केली. मराठे देसूर मुक्कामी गोळा झाले होते. त्यांनी मोगलांची वाट अडविली. मोगलांपाशी बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती. राव दलपतने सैन्याची उजवी बाजू सांभाळलीआणि त्याने शत्रूंना हटविले इतक्यात रात्र झाली. मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांनी मोठे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले. दुसऱ्याच दिसावी सकाळी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले. त्यांनी निकराचे हल्ले चढविले. त्यांनी इतक्या गोळ्या झाडल्या की मोगलांच्या सोबत अस्केके वंजारी हवालदिल झाले. मराठ्यांची बंदुकी मोगल सरदारांच्या हत्तींवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या. जुल्फिकारखान व राव दलपत यांच्या हत्तींना अनेक गोळ्या लागल्या. आम्ही कुच करीत असताना. वाटेत भातशेते लागली आमच्या सैन्यातील कितीतरी बैल. आणि उंट चिखलात अडकले. घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले. आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला. त्यामुळे अतिशय कठीण परिस्थिती झाली .
पळता भुई थोडी केली या मोगलांची मराठ्यांनी सह्याद्रीच्या कुशितले हे वाघबच्चे कर्नाटक जिंजी सारख्या परराज्यात देखील पराक्रमाचे तमाशे दाखवीत होते आपली तलवार गाजवीत होते. गुलामी मराठ्यांच्या रक्तातच नाही म्हणून राजाशिवाय प्रजा कित्येक काळ झगडत होती. त्या रावदलपत ला सुचेना काय करायचे. जुल्फिकारखान तर पाठीला पाय लावून पळत सुटला त्यांचे सैन्य चहू बाजूला आपला जीव मुठीत धरून पळत सुटले होते पळताना सगळ्यांच्या तोंडात एकच वाक्य होते
भागो ....! भागो... संताजी आया
ही लढाई घडली ती तारीख होती. ५ जानेवारी १६९३...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १७३४*
शिद्दीचे सैन्य रायगड पुन्हा ताब्यांत आणण्याच्या वाटचालीस लागले व पूर्वीचीच परिस्थिति उत्पन्न होऊन मराठ्यास पराभूत होण्याचा नामुष्कीचा प्रसंग येणार, असे दिसून येताच इ. स. १७३३ डिसेंबर अखेरीस शाहू महाराजांनी प्रतिनिधीशी पुन्हा एकदा रायगडबद्दल चर्चा केली. त्यावेळी प्रतिनिधीने सांगितले की शाहूमहाराजांनी  दरसाल ४० हजार रुपये दिल्यास मी रायगडवर दीड हजार सैनिक ठेवून रायगड राखतो. शाहूमहाराजांनी त्यावर म्हटले की तुम्हास स्थळ द्यावयाचे व पैसेहि द्यावयाचे मग आमचे स्थळ आम्हीच राखतो; तुम्ही तुमच्या तैनातीच्या प्रदेशांतून बेगमी द्या म्हणजे झाले मग शाहूमहाराजांनी बाजीराव व चिमाजी आप्पास आज्ञापत्र धाडलें की मातबर
सरदाराबरोबर फौज पाठवा. चिमाजीआप्पाने स्वतः घाटावर अगर रायगडच्या माचीस अगर रायगडच्या पायथ्याशी रहावे. शाहू महाराजांनी पेशव्यांच्या मदतीसाठी सैन्य पाठविण्याची व्यवस्था केलीच होती. तें सैन्य ता. ५ जाने. १७३४ रोजी पोलादपुरास दाखल झाले. बाजीरावाचे सैन्यही घाटाखाली उतरले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १७३९*
जानेवारीच्या सुरुवातीलाच राणोजी शिंदेनी डहाणूचे ठाणे जिंकले असावे, सटवाजी जाधवांनी ५ जानेवारी १७३९ च्या  सुमारास बादल पारडी किल्ला काबिज केल्याचे कळते आणि याच दरम्यान वर नमूद केलेल्या पत्रावरून असे नक्कीच कळते की डहाणूया जवळ असलेल्या डोंगरावर किल्ला बांधायची योजना चिमाजी आप्पांनी आखली होती आणि तो किल्ला रायजी  शंकर बांधणार होते, अगदी तो किल्ला विवळवेढे की बारड गड.  डहाणू किल्ल्याच्या परिसरात बारड्याचा डोंगर तसा भौगोलिक दृष्ट्याही मोक्याच्या आहे.  समोर पसरलेल्या अथांग समुद्रावर आणि पूर्वेकडील लांबवर पसरलेल्या मुलखावरही लक्ष ठेवण्यासाठी बार्ड्याचा डोंगर उंच आणि तितकाच उपयुक्त ठरू शकतो म्हणूनच इथं किल्ल्याच्या बांधकामाचा खटाटोप नक्कीच दिसतोय.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*५ जानेवारी १७९२*
उदेपूरच्या मुलुखात बहुशः होळकरांनी अंमल बसविला होता. उदेपूर राजा भिमसिंगाने पाटीलबावांचे व होळकरांचे महालात उपद्रव करून तमाम अंमल उठविला आणि आपली ठाणी बसविली. उदेपूरचा राणा लहान मूल; पटाईत कारभारी यांनी आपल्या हाती पडल्या त्या जागा दाबून बसले. भिमसिंग कारभारी चितोड किल्ला वगैरे जागा दाबून बसला. सरकारचे मामलतीचा पैका येईना. चितोडनजीक ६ कोसावर मुक्काम करून चितोडकरांकडे खंडणी मागितली, चितोडकरांनी साफ उत्तर केले की, “आम्हापाशी दारुगोळी आहे. प्रांतातील पैसा तुम्ही घेतला. आता मेहेरबानी राखून आल्या मार्गी जावे”. तेव्हा साम व दंड दोन्ही प्रकार सरदारांमार्फत पाठवून राणाजीस आपले भेटीस आणिले. दिनांक ५ सप्टेंबर १७९१ रोजी भेटी होऊन चितोडजवळ येऊन दोघांनी मुक्काम केला. बावा दोन कोस सामोरे जाऊन भेटले. चितोडचा मुलूख बावांनी घेतला. फक्त किल्ला राहिला. त्यास जाबसाल जमेना तेव्हा चितोडनजीक दोन कोस जाऊन बावानी चितोडगडास मोर्चे लाविले (ऑक्टोबर).जी चितोडगड शिंद्याचे हवाली झाला. त्यावर राणाजीचा बंदोबस्त करून दिला. अंबूजी इंगळ्याबरोबर दहा हजार फौज व समरुची पलटणे चार अशी जमात देऊन मामल्याचा पैसा वसूल करावा असे सांगून राणा व भिमसिंग यांचा निरोप दिनांक ५ जानेवारी १७९२ रोजी घेऊन उज्जैनचे रोखे दक्षिणेस जावयास निघाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...