अहंकार
मी तू पणाची केली बोळवन.. हे गुरुदेव दत्तांच्या आरती मधील वाक्य खूप महत्त्वपूर्ण आहे. मी म्हणजे अहंकार .... जीत अहंकाराचा शिर्काव होतो. येथील विनाशाला सुरुवात होते. अहंकारानं सोन्याची लंका गेली. तर मग अहंकार गेलाच पाहिजे. मानवी स्वभावामधील हा एक विकार असून. त्याला संपवण्यासाठी भगवंत नामस्मरण. मी करता करविता नाही. मीच या ठिकाणी जन्म घेऊन काही काळासाठी भाड्याने पृथ्वीवरती आलो आहे. अशी बुद्धी जन्माला येण्यासाठी याच्यासाठी अध्यात्म खूप गरजेचे आहे. अहंकार म्हणजे मी पण त्याबद्दल ब्राह्मक कल्पना.
प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हरभरे चढणारी माणसे भेटतातच. परंतु अज्ञानामुळे आपण त्या झाडावर चढतो. मी एक खास व्यक्ती आहे मी बुद्धिमान व्यक्ती आहे. मी खास व्यक्ती आहे मी बुद्धिमान आहे माझ्या जवळ संपत्ती आहे. अशा प्रकारचे भ्रम अनेकांच्या मनात असतात. आज आपण अहंकार म्हणू शकतो.
अहंकार मानवी जीवनाचा खूप मोठा शत्रू आहे. प्रत्येक व्यक्ती अहंकार व्याप्त जीवन जगत असते. कुण्या माणसाला अहंकार असेल तर याचा जाणाऱ्या सर्व माणसांना सांगत असतो. मी शून्यातून जग उभं केलं आहे. याव केल मी त्याव्ह केलं. असं केलं मी तसं केलं. अरे तू खरंच ब्रह्मदेव आहेस काय. कुणाला रूपाचा कुणाला ज्ञानाचा कुणाला पैशाचा संपत्तीचा तर कुणाला प्रगतीचा अहंकार म्हणजे मध मस्ती आहे.
आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी कोणीच नाही ही भावना असावी. ‘अहं’चा त्याग केला की आपण सोSहं च्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं..
Comments
Post a Comment