*आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*४ जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १६६४*
छत्रपती शिवाजी महाराज सुरतजवळील घणदेवी येथे येऊन धडकले. (सकाळी १० वाजण्याच्या सुमारास) 
तेथून पूढे ते उधन्यास येऊन पोचले. उधन्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला वकील ईनायतखान सुभेदाराकडे पाठवला. वकीलाने फर्मावले की, “ईनायतखान सुभेदाराने व सुरतेतील नामवंत व्यापारांनी महाराज सांगतील तेवढी खंडणी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा सुरतची बदसुरत झाल्यास त्याची जबाबदारी आमच्यावर नाही.”
सुरतेमध्ये प्रचंड धावपळ सुरू झाली. ईनायतखान सुभेदाराने महाराजांची खंडणीची मागणी उडवून लावली. उलट उर्मट जबाब वकीलामार्फत पाठवला. महाराजांनी या वकिलालाच कैद केले.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १६८१*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे पोर्टगीजांशी फारसे चांगले संबंध नव्हते. महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजेंनी मराठी मुलखाभोवती असणाऱ्या परकीय सत्ताधीशांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. ५ मे १६८० ला त्यांनी आपला वकील गोव्याच्या व्हाइसरॉय कडे पाठवून मैत्रीचा तह करण्यास सुचवले होते. ही बोलणी सुरू असतानाच मराठ्यांचा डिचोलीचा सुभेदार मोरो दादाजी याने बारदेश मधील सिओलीम हे गाव लुटले व गोव्याकडे मौल्यवान रत्ने घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले. या बातम्या समजताच गोव्याचा व्हाइसरॉय अंतोनियो पाइस द सांदे याने मोरो दादाजीला पत्र पाठवून या घटनेचा निषेध केला व पकडलेल्या माणसांना सोडले नाही तर संभाजीराजेंना आपल्याशी मैत्री नको आहे असे समजण्यात येईल असे सांगितले. शिवाय धर्माजी नागनाथ व मोरो दादाजी यांच्या प्रांतातील व्यापरही बंद केला.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १६८३*
इंग्रजांच्या "प्रेसिडेंट" जहाजावर मराठ्यांचा हल्ला.
तसेच किल्ले राजगड, पुरंदर व शिवापूर येथे मुघल सरदार शहाबुद्दीन सोबत लढाई.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १६८४*
बापाच्या सांगण्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करण्यासाठी शहजादा मुअज्जम कोकणात उतरला.
डोंगर दर्यांची कधीच सवय नसलेली, आयुष्यातील बराचकाळ आयषोआरामात घालवलेल्या शाही फौजेला सह्याद्री सोबत मिळते जुळते घेता आलेच नाही, मराठ्यांकडून सपाटून मार खाऊन परतताना त्यांच्यावर उपासमारीची भयानक वेळ ओढवली, जीवाचीच धास्ती अशी काही बसली कि अंगावरील कपड्याची गत ती काय.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १७२१*
थोरले बाजीराव आणि निजाम यांची चिखलठाण यथे पहिल्यांदाच भेट.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १७५०*
महाराणी ताराराणींचे नातू "रामराजे" साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर दत्तक म्हणून आले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*४ जानेवारी १७७९*
कार्ल्याच्या ऐतिहासिक तळ्याकाठी इंग्रज आणि मराठे यांची घनघोर लढाई झाली. इंग्रजांना पुण्याकडे आगेकुच करायची होती तर मराठ्यांना इंग्रजाची सगळी रसद नष्ट करायची होती. इंग्रज सैन्यांना पुण्यापर्यंत पोहचू द्यायचे नव्हते, त्यामुळे इंग्रज सैन्यांना कार्ला येथे अडविण्यात आले, यावेळी इंग्रज व मराठ्यांमध्ये घनघोर लढाई झाली, या लढाईत इंग्रज सेनापती स्टुअर्ट फाक्कडा मारला गेला व मराठ्यांचा मोठा विजय झाला, या विजयाचे प्रतिक म्हणून येथील ऐतिहासिक तळ्याकाठी दरवर्षी विजयोत्सव साजरा करण्यात येतो.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४