*सन 1693 सालचे सरदार बर्गे घराणे कडील इनामपत्र प्रकाशित* वकील विशाल बर्गे साहेब यांच्या संशोधनातून.
*सन 1693 सालचे सरदार बर्गे घराणे कडील इनामपत्र प्रकाशित*
सदरचे इनाम पत्र हे तारीख 20 फेब्रुवारी 1693 सोमवार शके 1614 रोजी दिलेले आहे. बर्गे घराने बाबत हे प्रकाशित होणारे पहिलेच इनाम पत्र आहे असे इतिहास प्रेमी आणि मोडी अभ्यासक *बारामती मध्ये वकिली करणारे अँड विशाल बर्गे* यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपले पूर्वज हे सातारकर छत्रपती यांचे एकनिष्ठ सरदार होते आणि सेनापती संताजी घोरपडे यांच्या सैन्यात कायम सोबत होते. हे पिढ्यानपिढ्या ऐकत आलेलो होतो. प्रत्येक पिढीत वेगवेगळ्या लढाई मध्ये इनाम मिळाले आहेत.
सातारा, कोरेगाव येथील बर्गे घराण्यातील सरदार रखमाजी सुभानजी बर्गे, सरदार खंडेराव बर्गे व सरदार सेखोजी बर्गे असे सुमारे 14 सरदार स्वराज्य रक्षणाच्या कार्यात अग्रेसर होते असे अनेक उल्लेख आढळतात .बर्गे सरदार यांचे वंशज मूळ गाव कोरेगाव तसेच ग्वाल्हेर, बडोदा, यमनूर कर्नाटक अलिबाग इथे अनेक ठिकाणी आहेत.
जुल्फिकारखानाने रायगडास वेढ घातला. दिवसे दिवस वेढा घट्ट होऊ लागला .येसूबाईसाहेबांनी राजाराम व काही विश्वासू सरदारांनी वेढ्यातून बाहेर
पडावे अशी मसलत केली.
त्याप्रमाणे ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज व
काही सरदार त्यांचे बरोबर बाहेर पडले. त्यांनी पुढे २६ संप्टेबर १६८९ रोजी जिंजीकडे कुच
केले.
राजाराम महाराजां बरोबर शेवटपर्यंत जे मातब्बर सरदार मंडळी होती. त्यामध्ये छत्रपतींचे विश्वासू सरदार रखमाजी सुभानजी बर्गे कुटुंब कबिल्या सह होते.
या सन 1693 रोजीच्या इनाम पत्रात खालील मजकूर आहे.
" रखमाजी बिन सुभानजी बर्गे यांचे विशेइ राजश्री संताजी घोरपडे सेनापती यांनी चंदीचे मुक्कामी येऊन विनंती केली की, रखमाजी बिन सुभानजी बर्गे हे देशी हून स्वामीच्या पायाशी एकनिष्ठ कर्नाटक प्रांतात चांदीस येऊन एक भावे सेवा करीत आहेत. यांस काही भूमि इनाम द्यावया आदण्या केली पाहिजे म्हणुन विदित केले. त्यावरून स्वामी याजवरी कृपाळू होऊन नूतन इनाम मौजे कोरेगाव कसबा वाई पैकी जीरात चावर .//. निम्मे चावर विसा पांडा चे भूमि कुलबाब कूलकानु खेरीज हक्कदार करून दिले आहे. याचे पुत्रपौत्रादी वंशपरंपरेने चालवणे. "
संताजी घोरपडे व राजाराम महाराज यांच्या मध्ये शेवटची समेट सरदार सेखोजी बर्गे यांनी केले बाबत प्रसिद्ध पत्रव्यवहार आहे. तेही नव्या संदर्भात पुन्हा प्रकाशित करणार असेल चे विशाल बर्गे यांनी सांगितले.
सदर मोडी पत्राचे तंतोतंत भाषांतर बारामती माळेगाव मधील मोडी अभ्यासक् ओंकारजी चावरे यांनी केले आहे.
संदर्भ:--
छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा) १६८२ ते १७४९.(चरित्र)
मोडी कागदपत्रे वैयक्तिक संग्रह (विशाल बर्गे बारामती )
*सादर माहिती कृपया नावा सहित शेअर करावी.*
Comments
Post a Comment