प्रजासत्ताक दिन विशेष माहिती🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिन विशेष माहिती
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
1️⃣भारतीय प्रजासत्ताक दिन
2️⃣काय आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व
3️⃣भारतीय राष्ट्रगीत
4️⃣15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी फरक
5️⃣भारताचा राष्ट्र ध्वज
6️⃣तिरंगा
7️⃣ध्वज फडकवण्याची नियमावली
[1/26, 9:10 AM] ajaykasabekar50: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*🔸भारतीय प्रजासत्ताक दिन.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे... याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.....*
*या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे आयोजन केले जाते.....*
*भारतालाया ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा स्वातंत्र्य लढा आणि त्यातील महात्मा गांधी यांच्या अहिंसा पद्धतीचा मोठा सहभाग आहे. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्यशासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते.....*
*२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसूदा समिती स्थापना केली गेली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्ष,११ महिने आणि १८ दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सद्स्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.....*
*दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, म्हणजे नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते.हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती, येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्यात प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच राष्ट्रपती ध्वजारोहण करतात व २१ तोफांची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनावरून या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.....*
*भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते इतके या संचलनाचे महत्त्व आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.....*
*२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व गांधी जयंती (२ ऑक्टोबर)). ह्या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.....*
*भारतातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तसेच शासकीय संस्था, खाजगी संस्था, ग्रामपंचायती अशा विविध ठिकाणी २६ जानेवारी रोजी ध्वजवंदन केले जाते आणि भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त केला जातो.....*
*स्रोत: विकिपीडिया...*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
[1/26, 9:10 AM] ajaykasabekar50: 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*काय आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व?*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*२६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी नवी दिल्लीत भव्य परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारत आपली ताकद दाखवतो. देशभरात देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.*
*देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात. या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. परंतू अनेकांना या दिवसाचं महत्त्व माहित नाही. पाहूयात काय आहे या दिवसाचे महत्त्व...*
*२६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता.*
*स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.*
*भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होता. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली.*
*स्रोत: आंतरजाल, महाराष्ट्र टाईम्स.Baban Bansidhar Lihinar*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
[1/26, 9:10 AM] ajaykasabekar50: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*🔸भारतीय राष्ट्रगीत🔸*
*जानिए क्या है हमारे राष्ट्रगान जन गण मन का मतलब ।*
*शब्द अंग्रेजी हिंदी*
*जन= People= लोग*
*गण= Group= समूह*
*मन= Mind = दिमाग*
*अधिनायक= Leader= नेता*
*जय हे= Victory= जीत*
*भारत= India= भारत*
*भाग्य= Destiny= किस्मत*
*विधाता= Disposer= ऊपरवाला*
*पंजाब= Punjab= पंजाब*
*सिंधु= Sindhu = सिंधु*
*गुजरात= Gujarat= गुजरात*
*मराठा= Maratha= मराठा (महाराष्ट्र)*
*द्रविण= South= दक्षिण*
*उत्कल= Orissa= उड़िसा*
*बंगा= Bengal= बंगाल*
*विंध्य= Vindhyas= विन्धयाचल*
*हिमाचल= Himalay= हिमालय*
*यमुना= Yamuna = यमुना*
*गंगा= Ganges = गंगा*
*उच्छलय= Moving= गतिमान*
*जलधि= Ocean = समुद्र*
*तरंगा= Waves = लहरें (धाराएं)*
*तब = Your = तुम्हारा*
*शुभ = Auspicious = मंगल*
*नामे = name = नाम*
*जागे= Awaken = जागो*
*तब = Your = तुम्हारा*
*शुभ = Auspicious = मंगल*
*आशीष= Blessings = आशीर्वाद*
*मांगे = Ask = पूछो*
*गाहे = Gaahe = गाओ*
*तब = Your = तुम्हारी*
*जय = Victory = जीत*
*गाथा = Song = गीत*
*जन = People = लोग*
*गण = Group = समूह*
*मंगल = Fortune = भाग्य*
*दायक = Giver = दाता*
*जय हे = Victory Be = जीत*
*भारत = India = हिंदुस्तान*
*भाग्य = Destiny = किस्मत*
*विधाता = Dispenser= ऊपर वाला*
*जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.= Victory, Victory, Victory, Victory Forever = विजय, विजय, विजय, विजय हमेशा के लिए ।*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
[1/26, 9:10 AM] ajaykasabekar50: ❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
*15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक ...*
*१)१५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वज फडकवतात तर २६ जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. यामागील कारण आपला देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपतिपद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.*
*२) १५ ऑगस्टला राष्ट्रीय ध्वज उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण म्हणतात तर, २६ जानेवारीला ध्वजाची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून ध्वज अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून ध्वज फडकवला जातो.*
*३)१५ ऑगस्ट १९४७ ला इंग्रजांचा ध्वज (युनियन जॅक) खाली उतरला व भारताचा ध्वज वर चढवला. म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर २६ जानेवारी १९५० ला भारताचा ध्वज होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून ध्वज बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्यावर गाठ सुटून ध्वज हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला ध्वज फडकवणे म्हणतात.*
*४) १५ ऑगस्ट ला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर, २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर ध्वज फडकवला जातो. आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे.*
*माजी नौसैनिक - रविंद्र आनंदराव भोसले.*
❄️❄️❄️❄️❄️🏵️❄️❄️❄️❄️❄️
[1/26, 9:31 AM] ajaykasabekar50: 🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
*🔸भारताचा राष्ट्रध्वज.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे. ध्वजाच्या रुंदी-लांबीचे प्रमाण दोनास-तीन असे आहे. पांढऱ्या पट्टयाच्या मध्यभागी गडद निळ्या रंगाचे अशोकचक्र आहे. ह्या चक्राची मूळ रचना सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील पौराणिक स्तंभावर पाहावयास मिळते. ह्या चक्राचा व्यास जवळजवळ पांढऱ्या पटट्याच्या रुंदीइतकाच आहे व ह्या चक्रास २४ आरे आहेत.*
*राष्ट्रध्वजाच्या ह्या रचनेला भारताच्या सांविधानिक सभेने २२ जुलै १९४७ रोजी मान्यता दिली. भारत सरकारच्या वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या अवैधानिक सूचनांखेरीज राष्ट्रध्वजाचे प्रदर्शन आणि वापर करण्यासंबंधी काही कायदेदेखील केलेले आहेत.*
*प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० (१९५० मधील क्र. १२), राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ (१९७१ मधील क्र. ६९). असे सर्व नियम, कायदे इत्यादींचे एकत्रीकरण करून सर्व संबंधितांच्या सुविधेसाठी २००२ सालचा राष्ट्रध्वज संकेत तयार केला आहे.*
*राष्ट्रध्वजाचे नियम.*
*२६ जानेवारी २००२ पासून ह्या संकेताची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून पूर्वीच्या सर्व नियमांऐवजी आता ह्याचा वापर केला जाईल. ह्यामधील तरतुदीनुसार आता सामान्य नागरिक, खाजगी संस्था तसेच शैक्षणिक संस्था राष्टध्वजाचे मुक्त प्रदर्शन करू शकतात. परंतु असे प्रदर्शन व वापर प्रतीके आणि नावे (अनुचित वापर टाळणे) १९५० आणि राष्ट्रीय अनादर प्रतिबंध १९७१ कायद्याच्या अधीन राहून करता येईल.*
*आंतरजाल.*
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
[1/26, 9:31 AM] ajaykasabekar50: 🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
*🔸तिरंगा.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*भारतीय राष्ट्रध्वज (तिरंगा) २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी अंगीकारला गेला. २४ मार्च रोजी इंंग्रजांनी लवकरच भारत सोडून जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला. स्वतंंत्र भारताचा ध्वज कसा असावा हे ठरविण्यासाठी तातडीने एक समिती नेमली गेली. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रभृृती होते. त्यांनी ठरवले की कॉंग्रेसचा ध्वज हाच स्वतंंत्र भारताचा ध्वज म्हणून घोषित करावा, फक्त चरख्याऐवजी अशोकचक्र हे चिह्न ध्वजाच्या मध्यभागी विराजमान व्हावे. घटना समितीने २२ जुलैला या ठरावाला मंंजुरी दिली.*
*ध्वजातील गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंगीत पट्टे आणि त्यांचे अर्थ- केशरी त्याग, शौर्य पांढरा शांती, निळा २४ बुद्धांनी दिलेल्या २४ सत्यांच ते प्रतिक आहे. या द्वारे दु:खाचे कारण व त्यावरील उपाय सांगतात. हिरवा समृद्धी भारताच्या राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी, पांढरा, हिरवा, आणि निळा. (त्यामुळे भारताचा राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).*
*२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकृत करण्यात आला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोकचक्र (धम्मचक्र) असून ते सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असलेले अशोकचक्र आहे. चक्राला २४ आरे आहेत.*
*मच्छलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंचीचे व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे.*
*ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्यात आली आहे. वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो. मधल्या भागात पांढरा रंग आहे. या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो. खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृद्धीचा बोध होतो. निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राचे व त्यासोबत बदलत जाणारे जग सूचित करतो. जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्ण आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणार्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला ‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.*
*फडकवण्याची नियमावली.*
*भारत देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.*
*राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी भारतीयांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले जाते. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला जातो की, तेथून तो ध्वज सगळ्यांना दिसतो.. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याची प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला जातोच. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक असते.*
*संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला जातो.. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविण्याची प्रथा आहे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला असतो. प्लॅस्टिकचा ध्वज वापरण्यास मनाई असते.*
*राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये.*
*ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमालावर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.*
*ध्वजांचा इतिहास.*
*ध्वजाची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे. अर्जुनाच्या कपिध्वजाचा उल्लेख महाभारतात सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जरीची झालर लाभलेला भगवा ध्वज प्रसिद्ध आहे.*
*१८३१ साली राजा राममोहन राॅय बोटीने इंग्लंडला जात असताना त्यांनी एका फ्रेंच जहाजावर फ्रान्सचा तिरंगी झेंडा पाहिला व स्वातंत्र्य समता बंधुता यांचे प्रतीक असलेला ध्वज आपल्या देशालाही लाभावा असे त्यांना वाटले. पुढे १८५७ च्या यूद्धात देशभक्तीच्या भावनेतून एक ध्वजगीतही निर्माण झाले.*
*आंतरजाल.*
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
[1/26, 9:31 AM] ajaykasabekar50: 🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
*🔸राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली.🔸*
*---------------------------------------------*
*🔸संकलन: सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*---------------------------------------------*
*देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.*
*राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.*
*ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.*
*संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.*
*राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.*
*संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.*
*राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.*
*ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.*
*ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.*
*केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्यांच्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.*
*आंतरजाल.*
🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪🇳🇪
Comments
Post a Comment