आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*७ जानेवारी १६६४*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६६४*
सूरतेवरील स्वारी - लुटीचा दूसरा दिवस
सकाळी दहा वाजता सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने वकिलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला. त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला.
ही घटना पाहणार्या स्मीथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यावर वृत्तांत सांगितला. इस्कालिअट या व्यक्तिने हा वृत्तांत लंडनला कळवला. त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जसाच्या तसा.....
"गुरूवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरूण मुसलमानाला छत्रपती शिवाजी महाराज बोलले की, " या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुभेदाराला वाटते की काय?" त्यावर, " आम्ही पण बायका नाही; हे घे" असे उलट बोलून तो तरूण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर खंजीर घेऊन धावला. त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसऱ्याने छाटला असताही तो त्या भरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर आदळून दोघेही कोलमडून पडले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर दिसणाऱ्या त्या खुनी मुसलमानाच्या रक्तामुळे छत्रपती शिवाजी मेले अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. पण तितक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यास सोडवून घेतले व दुसऱ्याने त्या खून्याचे डोकेही फोडले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्काळ कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्यांना समोर आणून उभे केले आणी मर्जीप्रमाणे हात, पाय, डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला. जेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला, "त्यापेक्षा माझे डोकेच उडवा !" छत्रपती शिवाजी महाराजांनी ते मान्य करून त्याची टोपीही डोक्यावरून काढून ठेवली गेली. पण छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटले कोणास ठाऊक त्याने एकाएकी कत्तल थांबवली व स्मिथ वाचला. तोपर्यंत ४ डोकी व २४ हात कापले गेले होते. त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मिथ वखारीत पाठवण्यात आला." कसा भयंकर प्रसंग आहे हा ! गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले. महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या "परवानगीची" वाट न पाहता त्या गनिमाचा शिरच्छेद करून टाकला. समिती नेमणे, पुरावे गोळा करणे, सज्जड दम देणे वगैरे भूरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६७८*
छत्रपती शिवाजीराजांचा वकील पितांबर शेणवी चौथाई संबंधीचे पत्र पोर्तुगीजास देण्यासाठी गोव्यास गेला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६७९*
दर्यासारंग (आरमाराचा पहिला सुभेदार) आणि इब्राहीम खान (आरमारातील अधिकारी) यांनी बसनूर लढाईत पराक्रम गाजवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६८०*
थळ किल्ल्यावरून मराठ्यांनी आणि उंदेरी वरून सिद्दीने एकमेकांवर तोफांचा मारा केला. उंदेरीवर सिद्दीच्या ताब्यामुळे मराठे अत्यंत नाराज होते. त्यांनी सिद्दीला उन्देरीवरून हुसकून लावण्याचे अनेक असफल प्रयत्न केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६८०*
मुंबई कौन्सिलने छत्रपती शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६८४*
लोणावळा जवळील किल्ले लोहगड येथे मराठ्यांची मुघल सरदार फरबुद्दीनखान सोबत लढाई.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १६८४*
पोर्तुगीज वकील मॅन्युएल सारयव्ह द अलबु केकी हा तहाच्या कामाकरिता मराठ्यांकडे आला होता. प्रत्यक्ष तह मात्र फोंडा येथे दि. २५ जानेवारी १६८४ रोजी झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १७३८*
निजाम-बाजीराव पेशवे यांच्यात सराई-दुराईचा तह.
भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी महत्त्वाची लढाई होय. याही सुमारास बाजीरावाने मोठी फौज घेऊन डिसेंबर १७३७ मध्ये नर्मदा ओलांडली आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपले गुप्तहेर धाडले. निजाम उत्तरेकडून भोपाळजवळ आला. मराठी सैन्याने तोफखान्यापासून अलिप्त राहून मोगलांच्या सैन्यास गनिमी युद्धतंत्राने बेजार केले. त्यावेळी निजामाने मराठी फौजांपासून संरक्षण मिळावे, म्हणून भोपाळच्या तटबंदीयुक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली. तीच गोष्ट बाजीरावाला हवी होती. त्याने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली. निजामाच्या तोफखान्यामुळे मराठ्यांचे सैन्य दूरवर राहिले; पण भोपाळ सोडून निजामाला फार दूरवर जाता येईना व मराठ्यांनी घातलेल्या वेढ्याची फळी फोडता येईना. शिवाय त्याचा मुलगा बऱहाणपूरपर्यंतही पोहोचला नव्हता. तेव्हा नाईलाजाने निजामाने तहाची बोलणी सुरू केली. शेवटी दोराहसराई या ठिकाणी तह होऊन निजामाने बाजीरावाच्या सर्व अटी मान्य केल्या

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १७३९*
चिमाजीअप्पांनी वसईच्या किल्याला वेढा घातला. चिवट पोर्तुगीजांनी तब्बल चार महिने मराठ्यांच्या वेढ्याला दाद दिली नाही. मे महिन्याच्या सुरवातीला चिमाजीअप्पा प्रचंड संतापले आणि मराठ्यांच्या फौजेसमोर जाऊन म्हणाले की "कोट जिंकता येत नसेल तर ठीक आहे. मला तोफेच्या तोंडी बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊन पडेल असे करा. मला त्यानेच समाधान वाटेल."
चिमाजीअप्पांच्या या विधानाने मराठी फौजांत आवेश संचारला. मसलती झाल्यावर किल्याच्या तटबंदी खाली सुरूंग पेरण्यात आले. सुरूंगास बत्ती दिली क्षणार्धात एक प्रचंड मोठा बुरूज आसमंतात उडाला. बुरूजाबरोबर साठएक पोर्तुगीज सैनिकही उडाले. ह्या अचानक भयंकर हल्याची पोर्तुगीजांना कल्पनाच नव्हती. बुरूज उडालेला पाहून मराठ्यांना प्रचंड स्फुरण चढले. बेभान मराठे स्फोटाने पडलेल्या खिंडाराकडे धावले.. आणि अचानक मराठ्यांनीच पेरलेल्या दुसर्‍या सुरंगाचा स्फोट झाला. अनेक मराठे या स्फोटात मारले गेले. पण मराठ्यांचे धैर्य अजिबातच खचले नाही. उलट आणखी त्वेषाने मराठ्यांनी किल्यात घुसण्यास जोर लावला. हर हर महादेव च्या घोषणांनी बेभान झालेले मराठे पोर्तुगीजांवर अक्षरशः तुटून पडले. जलचर चिवट पोर्तुगीजांच्या सैन्यानेही लढण्याची शर्थ केली. पण मराठ्यांच्या या तांडवा पुढे त्याचा टिकाव लागला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १७५२*
डिसेंबर १७५१ मधेमराठयांनी निजामापासून त्रिंबक किल्ला जिंकून घेतला. या दोन महिन्याच्या युद्ध धुमाळीत बुसीच्या तोफखान्याचा मराठयांच्या गनिमी काव्याच्या लढाईपुढे काही उपयोग झाला नाही. म्हणून सलाबतजंगाने तहाची बोलणी ‌लावली. शिंगवे, परगणे राहुरी येथे ७ जानेवारी १७५२ रोजी उभयतास अटी मान्य होऊन तह झाला.  या तहात ठरल्याप्रमाणे पेशव्यांनी त्रिंबक किल्ला निजामास परत दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*७ जानेवारी १७६१*
भाऊसाहेबांच्या तगाद्यावरून गोविंदपंताने मरणापूर्वी ४,२०,००० रुपयाचा ऐवज नारो शंकराकडे दिल्लीस सुरक्षितपणे रवाना केला. त्यापैकी दिनांक २२ डिसेंबर रोजी दिल्लीहून रुपये १ लाख १० हजार
पायगुड्याच्या तुकडीबरोबर पानिपतास पोचविण्यात आले व ते छावणीत पोचले. पुढे दिनांक २ जानेवारी १७६१ मध्ये पराशर दादाजी ह्या सरदार बरोबर प्रत्येक घोडेस्वाराबरोबर ५०० रुपयाची एक थैली, असे थैली नेणारे ३०० घोडेस्वार घेऊन पानिपताकडे रवाना झाला. मराठ्यांच्या हालचालीवर दुराण्याची पूर्ण टेहळणी होती. दिल्लीहून पानिपताकडे जाण्यास निघालेला पराशर दादाजी दिनांक ४ जानेवारीस रात्री अबदालीच्या लष्करापाशी चुकून गेले आणि ही कोणत्या सरदाराची छावणी आहे असे मराठीत चौकशी केली. दुराण्यांनी हे मराठे आहेत असे त्यांच्या बोलण्यावरून ओळखले व त्यांच्यावर हल्ला केला. हल्यात मराठे घोडेस्वार ठार होऊन फक्त १ घोडेस्वार बचावून दिल्लीस ७ जानेवारी रोजी परत आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४