काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू असे म्हणतात. हे विकार निर्माण होऊ नये. यासाठी अध्यात्म खूप उपयोगी आहे. त्यासाठी तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी व इतर सर्व संत साहित्य वाचत राहिलं पाहिजे. संताचा नामस्मरण करत राहिला पाहिजे वरीलपैकी मत्सर याविषयी आपण जाणून घेऊ.

मत्सर ही अतिशय नकारात्मक भावना असून यामुळे अनेकांना अनुभव आले असतीलच. म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे..एखाद्या  व्यक्तीचा आनंद किंवा क्षमता पाहण्यास सक्षम नसणे. ज्याला इतरांचे सुख पाहून मत्सर होतो, हेवा वाटणे अशा प्रवृत्तीची लोक  समाजामध्ये असतात. मत्सर हा एक  मानसिक पापाचा भाग आहे.

 काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू असे म्हणतात.

या मधील आपण मत्सर किंवा हेवा विषयी पाहू.

 मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये चढउतार ही येतच असतात. कधी सुख तर कधी दुःख. कधी यश तर कधी अपयश. येतच असतं.  परंतु स्वाभिमानाने  एखाद्यापेक्षा अर्थात सर्वान पेक्षा पुढे जात असलेल्या . काही जळावू वृत्तीची लोक. त्या व्यक्तीचा मत्सर करू लागतात.

 एखादा व्यक्ती कष्ट करतोय पुढे जातोय, घर घेतोय गाडी घेतोय. प्रगती करतोय. मोठं पद प्रतिष्ठा मिळवतोय.परंतु हेच सगळं होत असताना. त्याला रोखण्यासाठी आजूबाजूची ठराविक म्हणजे मत्सर करणारी परिचित लोकच असतात.
 याचं कारण म्हणजे ज्याच्याशी परिचय नाही त्यानी मत्सर  करण्याच कारण नाही.

 परिचयातील सर्वच नाही परंतु ठराविक  लोक मात्र 
कारण अश्या लोकांना पुढे गेलेले पचनी पडत नाही.  अशी लोकं तुम्हाला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करत असतात.
 सर्वच लोक अशा पद्धतीचे नसतात परंतु काही लोक मात्र मत्सर  करतच राहतात. कारण अशा लोकांचा मानसिक विकास झालेला नसतो.

 यामध्ये नातेवाईक आले, मित्र आले भावकी आली गावठी आली.ज्या लोकांशी अशी ज्ञात अज्ञात लोकांमध्ये. मत्सर करणारी लोक, तुमचा हेवा करणारी लोक. तयार होतात याचं कारण.

मत्सर म्हणजे द्वेष, जळावू वृत्ती, दुसऱ्याची भरभराट, प्रगती सहन न होणे.. एखाद्याचा आनंद किंवा क्षमता पाहण्यास सक्षम नसणे. तेवडी प्रगल्प बुद्धी त्यांची झालेली नसते.

ज्याला इतरांचे सुख पाहून मत्सर होतो, हेवा वाटतो अशी लोक. ही लोक सतत निंदा करत राहतात.आणि त्यांच्या पापा मध्ये वाढ  करत राहतात.

 मनुष्याने आपल्या आयुष्याशी  नेहमी कृतज्ञ असले पाहिजे. मत्सर मध्ये आपल्याकडे काय आहे न पाहता. इतरांकडे काय आहे हे पाहण्यास मन धजवते,




Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४