आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१२ जानेवारी १५९८*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १५९८*
*_राजमाता जिजाऊ जन्मोत्सव_*

।। जय जिजाऊ ।।
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते झाले शिवराय नी शंभू छावा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसता मिळाला स्वराज्य ठेवा…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते लढले मावळे…!
जिजाऊ तुम्ही नसता तर,
नसते दिसले विजयाचे सोहळे…!

१२ जानेवारी या दिवशी महराष्ट्राच्या इतिहासाला एक कलाटणी मिळाली होती. स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी जिजाऊ रूपाने सिंदखेड
राजा येथे लखुजीराजे जाधवांच्या घरी प्रकटली. हीच ती
स्वराज्य-जननी, हीच ती माता जिने स्वराज्याचे देखणे स्वप्न देखिले, हीच ती जननी जिने आमच्या रक्ता रक्ता मध्ये स्वाभिमान भिनवला. जिने 'प्रत्येक' मावळ्या मध्ये शिवबा घडवला. स्वराज्या साठी लढणाऱ्या प्रत्येकावर आगदी शिवबा प्रमाणेच प्रेम केले. जिजाऊ साहेबांनी आपल्या मायेने शिवबांसाठी जीवाला जीव देणारे मावळे घडवले, स्वाभिमानाच्या ठिणगीने त्यांना पेटवले आणि पुढे हीच स्वराज्याची मशाल क्रूर यवनांना जाळून खाक करू लागली.
आमच्या ह्याच शूर मावळ्यांना स्वप्नात पण बघून हेच जुलमी दुश्मन झोपेत पण दचकून जागी व्हायचे. ह्या सर्वांना एकत्र ठेवणारा तो शिवबा ह्याच माउलीने घडविला.
या माउलीने आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडणीसाठी पणाला लावले. आपले सौभाग्य आणि आपल्या पोटचा गोळा देखील या स्वराज्याला ओवाळून टाकीला. एक पत्नी म्हणून धीराने शहाजी राजांच्या सोबत उभ्या राहिल्या. शिवरायांच्या मातृत्वा बरोबरच त्यांचे गुरुत्व हि त्यांनी स्वीकारले; प्रसंगी याच माउलीने हाती तलवारही धरली. स्वदेश, स्वधर्म, स्वभाषेची जान तेंव्हा सर्वांना झाली आणि अखेर कित्येक वर्षाच्या संघर्षा नंतर ३२ मन सोन्याचे
सिंहासन रायगडी अवतरले.
स्वराज्य मिळाले आणि त्या स्वराज्याला छत्रपती मिळाला. जिजाऊच्या नव्हे तर कुणाच्या आशीर्वादाने.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १६६०*
मराठे राजापुरात घुसले... 
अफजलवधाच्या धक्क्यातून सावरायला वेळ मिळायच्या आत झालेल्या मराठ्यांच्या अकस्मिक हल्ल्याने आदिलशाहीचे सगळे अधिकारी व सरदार हदरले होते हे इंग्रजांच्या पत्रावरुन स्पष्ट होते की १० डिसेंबर पर्यंत दौलोजी राजापूरला पोहोचले नव्हते. दाभोळच्या बंदरात अफजलखानची तीन जहाजे उभी होती ह्याची माहिती राजांना होती व त्यांनी दौलोजीला ती जप्त करायला सांगितले होते पण दौलोजी तिथे पोहोचायच्या आत महमूद शरीफने ती तेथून हलवली व राजापूरला पिटाळली..

राजापूरला आदिलशाही अधिकारी अब्दुल करीम ह्याला ही जहाजे सुपूर्त करण्यात आली जेव्हा त्याला रुस्तुमेजमानच्या २८ डिसेंबर १६५९ च्या पराभवाबद्दल कळले तेव्हा त्याने राजापूरहून पळ काढला १२ जानेवारी १६६० ला शिवाजी महाराजांचे पाचशे मावळे राजापूरला व आणखी दोनशे जैतापूरला पोहोचले अब्दुल करीम, महमूद शरीफ व इतर काहींनी जहाजांनी वेंगुर्ल्याला पळ काढला जैतापूरला काही इंग्रजांनी महाराजांच्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यात फिलिप गिफ्फार्डला अटक झाली. शिवरायांनी राजापूर सोडले व खारेपाटणला गेले त्यांनी खारेपाटणच्या कोट घेतला व फिलिप गिफ्फार्डला त्यात बंदी बनविले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १७०५*
छत्रपती शाहु महाराजांनी सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १७०८*
छत्रपती शाहु महाराज राज्याभिषेक दिन
मराठा साम्राज्याचा सुवर्ण काळ गनला जाणारा सातरावे शतक, या कलखंडा मध्ये मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा मोगल्यांच्या राज्यात धुमाकुळ घालु लागल्या..
छत्रपती शिवराय,छत्रपती शंभू राजे यांच्या पश्चात सर्व मराठा सरदार-दरकदार यांच्यावर उत्तम नियंत्रन ठेऊन आणि मराठा साम्राज्याचा हिंदुस्थानात प्रथम विस्तार करणारे , थोरले शाहू छत्रपती नावा रूपास आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १७४२*
सरखेल संभाजी आंग्रे पुण्यतिथी
शूर सागरी सेनानी संभाजी आंग्रे यांचे दि. १२ जानेवारी १७४२ रोजी सततच्या दगदगीमुळे निधन झाले. त्यांना मुलगा नसल्यामुळे त्यांचा सावत्र भाऊ तुळाजी आंग्रे हे मराठा आरमाराचे 'सरखेल' झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १७७९*
वडगावची लढाई
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटीशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरुन सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटीश सैन्य कर्नल एगर्टन च्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येउन मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोडून टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जानेवारी १८६३*
स्वामी विवेकानंद जन्मदिवस
कोलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. ते पुढे स्वामी विवेकानंद नावाने ओळखले जावू लागले त्यांचा आज जन्मदिवस.
भारतीय तत्त्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्त्वज्ञ, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य, गुरुंची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ’रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४