आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*३ जानेवारी

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १६७०*
सिद्दी संबुल, सिद्दी याकूत व सिद्दी खैरीयत ह्या तिघांनी फतेहखानचा विचार अमान्य करून फतेहखानास कैद केले. 
सिद्दी संबुल हा दंडराजपुरीचा मुख्य झाला व दंडराजपुरी नव्याने महाराजांशी लढू लागला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १६७१*
सरदार जसवंतसिंग व महाबतखान यास औरंगजेबाने दख्खनवर स्वारी करण्याविषयी आदेश दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १६८२*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर जंजिऱ्याच्या सिद्दीने स्वराज्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १६८१ मध्ये त्याने पाताळगंगा वरील आपटा गांव जाळले.
डिसेंबर १६८१ मध्ये छत्रपती संभाजी रायगडावरून २०,००० सैन्य आणि तोफखाना घेऊन जंजिऱ्याच्या दिशेने निघाले.
एक पूर्ण पंधरवडा तोफांनी जंजिऱ्यावर मारा करून पूर्वेकडील तट फोडून काढला. ३ जानेवारी १६८२ पर्यंत सिद्दीची अशी अवस्था झाली की त्याला किल्ल्यावरील टेकडीमागे लपून बसावे लागले.
जंजिरा हा पूर्ण बेटाला घेराव करून बांधलेला जलदुर्ग आहे. त्यामुळे आरमार असून सुद्धा, तटा बाहेर सैनिक उतरवणे शक्य नव्हते. म्हणून छत्रपती संभाजींनी जंजिऱ्यापर्यंत सेतू बांधण्याचा निश्चय केला. पण त्याचवेळी, मोगलांनी उत्तर कोंकणात एक दुसरी मोहीम सुरु केली. त्यांना तोंड देण्यासाठी छत्रपती संभाजी जातीने गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १६८४*
छत्रपती संभाजी महाराजांनी वसईच्या देशमुखास पत्र लिहिले:-
सुलतान माजम व शाबदिखान गनीम दोहिकडून कोकणात उतरला, या प्रसंगी हशामांचे बहुतच प्रयोजन आहे. 
याकरिता संताजी, येसाजी यास नौसंचनी हशमाचा जमाव वरघाटे पाठविले असे हे सांगतील तिहेप्रमाणे हशमांची नौसंचनी करून पाठवून देणे, तुम्हासंगी हशामाचा पोख्ता जमाव झाला तरी गनिमाचा काय गुमान लागला बुडविलाच जातो. 
आजवरी स्वामीने तुमचे चालविले ते सार्थक या दिवसात करून आपला मजुरा करून घेणे म्हणजे स्वामी तुम्हावरी संतोषी होतील, आपले समाधान असो देणे. 

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १६८४*
मराठ्यांनी आपले वकील धावजी येथे पाठविले. व तहाची याचना केली. साराव्हाय हा निकोलाव मनुचीला वकील म्हणून बरोबर घेणार होता. पण तो आजारी पडल्यामुळे ते शक्य झाले नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा दुभाषी हिंदू असल्यामुळे विजरईचा त्याच्यावर विश्वास नव्हता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १७११*
गोव्याच्या व्हिसेरेईने पोर्तुगालच्या राजास लिहीलेल्या पत्राची नोंद!
इ.स.१७०७ छत्रपती शाहू महाराजांचे महाराष्ट्रात आगमण झाले तेव्हा त्यांच्याशी लढण्यासाठी महाराणी ताराबाईसाहेब यांनी व्हिसेरेई दों रुद्रिगु द कांश्त याला पत्र पाठवून तहाचा संदर्भ लावला होता. व्हिसेरेईने पत्रोत्तरी महाराणी ताराबाईसाहेब यांना कळविले होते की, तहाच्या वाटाघाटी करण्यासाठी त्यांचे दुत आपणाकडे पाठवावे. परंतु ह्या वाटाघाटी पुर्ण होण्यापूर्वीच छत्रपती शाहू महाराजांकडून महाराणी ताराबाईसाहेब यांचा पराभव झाल्याने त्यांना कोल्हापूरला जाऊन पन्हाळ्याच्या किल्ल्याचा आश्रय घ्यावा लागला. पोर्तुगिजांकडून आपणाला संकटप्रसंगी मदत झाली नाही हे महाराणी ताराबाईसाहेब यांच्या मनात राहीले व पन्हाळ्याला स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी पोर्तुगिजांशी शत्रुत्वाचे धोरण अवलंबिले. "महाराणी ताराबाईसाहेब यांचे सैन्य गोव्याच्या सिमेवर गोळा झाले आहे. हे सैन्य केव्हा गोव्यात घुसेल त्याचा नेम नसल्याने 'कोंगो' येथील ठाण्याच्या मदतीला आरमार पाठवीता आले नाही".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १७३७*
यशवंत बुरुज - मार्टेलो टॉवर
१७३७ ऑक्टोबरला अर्नाळा किल्ल्याच्या तटबंदीच्या बुरुजाच्या बांधकामास सुरुवात झाली.
३ जानेवारी १७३७ ला किल्ल्यापासून अदमासे १००० हात अंतरावर फिरंगी बुरुज होता त्याचा बांधकामास हात घातला
घेरा ११५ हात, पाया जमिनीत ४ हात, १८ हात जमिनीपासून उंच, नऊ हातावर सफेली चुने गच्ची बांधणी केली, आठ जनग्या धरल्या व १६ तोफांच्या जागा केल्या त्यावर सुतार लावोन तक्तपोशी कौलारु केली

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १७३९*
गुजरात मधील ठाणे बादल पारडी घेण्यासाठी चिमाजी आप्पांनी पिलाजी जाधव यांचा मुलगा सटवाजी जाधव यास रवाना केले, पण दमण येथील किल्ल्यांची भक्कम शिबंदी पाहता, या मुलखात रायजी शंकर नावाच्या एका माहितगाराला पाठविले व ३ जानेवारी १७३९ रोजी लिहिलेल्या पत्रात चिमाजी आप्पा चौकशी करताना सटवाजी जाधवास लिहितात.
श्री. शके १६६० पौष शु॥ ५.
राजश्री सटवोजी जाधव गोसावी यांसि :--
अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्नो। चिमणाजी बल्लाळ आशीर्वाद. सु॥ तिसा सलासीन मया अलफ. रामनगरकर राज्यांस आह्मी भेटीस बोलाविलें आहे. ऐशास, तुह्मी बादलापारडीस खटपट करावयाचा उद्योग केला असेल, तरी रामनगरकर राज्यांसदेखील तुह्मी आपणाजवळ ठेऊन घेणें; आणि काम सिद्धीस नेणें. तैसेंच रा। रायाजी शंकर यास कार्य असिलें तर ठेवणें. ते राहातील. जरी तुह्मी तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल, तर मग विना कार्य मशारनिल्हेस ठेवावेसें नाहीं. पाठऊन देणें. डहाणूजवळ डोंगर बांधावयाचा आहे तो बांधतील. सारांश, तुह्मी बादलापारडी जेर करावयाचा उद्योग केला असेल तरी व रायाबा तेथें असावेसें असेल,
तें वर्तमान लिहिणें ?
लेखन
सीमा.
० श्री ॅ
राजा शाहू नरपति 
हर्षनिधान बाजीराव 
बल्लाळ प्रधान.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १७७५*
गोव्याच्या व्हिसेरेईने पुणे दरबारातील पोर्तुगिजांचे वकील नारायण शेणवी धुमे यांना लिहीलेल्या पत्राची नोंद!
"आशियाई लोक हे लांचलुचपतीला बळी पडणारे असतात. तेव्हा तुम्ही मंत्री आणि अधिकारी यांना लाच चारून त्यांना सहज वश करून घेऊ शकाल. मात्र पैशांचा व्यवहार विश्वासू माणसांमार्फत करावा".वानगी दाखल वरील अवतरण दीले आहे, त्यावरून पोर्तुगीज आणि पेशवाईतील मुत्सद्दी यांच्यामधील संबंधावर चांगला प्रकाश पडतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*३ जानेवारी १८३१*
सावित्रीबाई फुले जयंती 
(मृत्यू : मार्च १०, इ.स. १८९७ पुणे)
ज्यांनी स्त्रीयां बद्दल "चुल आणि मुल" ही कल्पना मोडीत काढंत, स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्त्रीयांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. 
आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. 
स्त्रीयांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली, अशा, "स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत", भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.....!!!
सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*



*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४