'राजा ऑफ सातारा' छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची आज २३० वी जयंती'(जन्म - १८ जानेवारी १७९३) .
'राजा ऑफ सातारा' छत्रपती प्रतापसिंह महाराज यांची आज २३० वी जयंती'
(जन्म - १८ जानेवारी १७९३) .
छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी शिक्षणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी शाळा बांधून बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन दिले. मुलींच्या व दलितांच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या महाराजांना प्रतिकूल विचारांनाही सामोरे जावे लागले. मराठा मुला मुलींना लष्करी शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती.
सातारा शहरातील व ग्रामीण भागातील जनतेसाठी यवतेश्वर मंदिराच्या पाठिमागे एक मोठा सुंदर तलाव बांधला व त्यातील पाणी सातारला आणले. तसेच महादरे येथे तलाव बांधला. तेथील पाणी खापरी नळाने शहरात आणले. शहरात जलमंदिर पॅलेस चे बांधकाम केले.
प्रतापसिंह महाराजांनीच नवा राजवाडा बांधला. हा राजवाडा १८२६ मध्ये पुर्ण झाला. सध्या या ठिकाणी हायस्कुल (छत्रपती प्रतापसिंह हायस्कुल) सातारा नगरपालिका प्राथमिक शाळा भरते. हा वाडा बांधकामाच्या व नक्षिकामाच्या दृष्टिने फार अप्रतिम आहे.
सातारच्या राजांपैकी अत्यंत उमदा, अत्यंत थोर व चांगला असा हा राजा होता. अशा सदगुणी व कर्तबगार राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
🌹🙏🌹🚩
Comments
Post a Comment