आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१९ जानेवारी १३११*

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१९ जानेवारी १३११*
वारंगळच्या लुटीतच जगप्रसिद्ध कोह-इ-नुर (कोहिनूर) हिरा मलिक काफुरच्या हातात सापडला. तो हिरा मलिक काफूरने जून १३१० मध्ये दिल्लीला माघारी जाऊन अल्लाउद्दीनला भेट केला. वारंगळची लुट बघून अल्लाउद्दीनचे डोळे लकाकले आणि त्याच्या लक्षात आले की भारताचा दक्षिण भूभाग अधिक समृद्ध आहे. म्हणून त्याने कर्नाटकातील द्वारसमुद्र म्हणजे नंतरचे हलेबिंदू येथील होयसला साम्राज्य जिंकण्यासाठी पुन्हा मलिक काफूरला दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे पाठवले. १९ ऑक्टोबर १३१० ला मलिक काफूर दहा हजार सैन्यासह दक्षिणेकडे निघाला आणि बरोबर तीन महिन्यानंतर त्याची गाठ गुणवडीजवळ करणसिंह गावडे आणि त्यांच्या सैन्याबरोबर पडली. वाटेत लागतील ती गावे लुटायची, स्रियांचे अपहरण करायचे, लोकांना बळजबरीने धर्मांतरे करायला लावायची हाच क्रुर मलिक काफूरचा एक कलमी कार्यक्रम होता. त्याच्यासमोर कोणाचाच टिकाव लागत नव्हता.  पण गुणवडी गावातील दत्तोबा मंदिराजवळ असणाऱ्या भुयाराजवळ सुर्यकुल कुलभूषण श्री करणसिंह गावडे यांच्या आणि भीमराव गावडे यांच्या नेतृत्वाखाली सगर राजपूत आणि काही ब्राम्हण योद्धे असे अकराशे जणांचे एक पथक त्या मलिक काफूरचा प्रतिकार करण्यासाठी जमले होते. १९ जानेवारी ते २० जानेवारी १३११ असे दीड दिवस हे घनघोर युद्ध चालले होते. एका बाजूला मलिक काफूरचे दहा हजार सैन्य तर दुसऱ्या बाजूला फक्त अकराशे योद्धे. शेवटी दीड दिवसांच्या संग्रामानंतर २०जानेवारी १३११ या दिवशी २२ सगर योद्धे या ठिकाणी मारले गेल

*१९ जानेवारी १५९७*
महाराणा प्रताप यांचा स्मृतिदिन
(जन्म ९ मे १५४०)
राणा प्रतापसिंह गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते; परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले. अकबराचे स्वामित्व न पतकरल्यामुळे त्यास मोगलांशी अखेरपर्यंत झगडा करावा लागला. अकबराने मानसिंह आणि आसफखान यांच्याबरोबर मोठी सेना देऊन त्याच्यावर पाठविले. २१ जून १५७६ रोजी हळदीघाटच्या घनघोर लढाईत प्रतापसिंहाचा पराजय झाला, तरी तो तीतून निसटला आणि राजस्थानच्या दऱ्याखोऱ्यांतून त्याने मोगलांशी गनिमी काव्याने संघर्ष चालू ठेवला. त्यांच्या रसदा तोडल्या, खजिने लुटले. अकबर स्वतः त्याच्यावर चालून गेला पण त्याला प्रतापला न जिंकताच परत फिरावे लागले. त्याची पाठ वळताच प्रतापने आपले गेलेले सर्व किल्ले परत मिळविले. यानंतर त्याने पुढे १२ वर्षे शांततेने राज्य केले. ह्यावेळी अकबर हा पंजाब व दक्षिण भारत ह्या दोन ठिकाणी आपली सत्ता स्थिर करण्याच्या बेतात होता. त्यामुळे त्याने पुढे प्रतापकडे लक्ष दिले नसावे. राणाप्रतापास परचक्राची फार चिंता होती. म्हणून त्याने आपल्या सरदारांकडून तुर्कांपासून आपल्या देशाचे रक्षण करण्याचे प्रथम वचन घेऊन नंतर आपल्या अमरसिंह ह्या पुत्राच्या हाती राज्य सोपविले व प्राण सोडला. अकबरानेही त्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. कर्नल टॉड म्हणतो, ‘प्रतापचे नाव अजूनही पूज्य मानले जाते आणि पुढेही एखाद्या नवीन जुलमी राजसत्तेकडून राजपुतांत शिल्लक असलेली देशाभिमानाची ठिणगी विझेपर्यंत ते नाव पूज्यच मानले जाईल.’

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१९ जानेवारी १६३६*
निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने शहाजहान निघाला होता. त्याने हांडियाजवळ नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले. ह्या परिसरातून वर्षाला नऊ लक्ष होनाचे उत्पन्न येत होते. १९ जानेवारी १६३६ ला शेख दबीर व इतर काही आदिलशाही वकील शाहजहानला भेटले. त्यानंतर ५ फेब्रुवारीला शाहजहानने खानजमान, खानदौरान व शाहिस्ताखान यांना निजामशाहीचा परिसर जिंकण्यासाठी धाडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१९ जानेवारी १६८२*
छत्रपती संभाजीराजांनी मोहीम हाती घेतल्यापासून तोफांची तुफान सरबत्ती करून देखील जंजिर्‍याच्या घेऱ्यात मराठ्यांना प्रवेश मिळत नव्हता. या संबंधी मुंबईकरांनी सुरतकरांना १९ जानेवारी १६८२ रोजी पत्र पाठवलेले उपलब्ध आहे, त्या मधील नोंदीनुसार – ‘सिद्दी जोपर्यंत तह करत नाही किंवा माघार घेत नाही तो पर्यंत छत्रपती संभाजी महाराजांस शांतता मिळणार नाही असा त्याने निग्रह केला आहे’. काही केल्या किल्ल्यात प्रवेश करणे जरुरीचे होते, किल्ल्याच्या आत प्रवेश केल्याशिवाय विजयश्री प्राप्त होऊ शकत नव्हती, जंजिऱ्या भोवती सिद्दिचे आरमार आणि किल्ल्यातून होणारा प्रतिकार यामुळे काही प्रवेश करणे शक्य नव्हते, म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी आता सिद्दीस जेरीस आणण्यासाठी सागरात सेतू बांधण्याचा निर्णय केला. हे म्हणजे कल्पनेपलीकडचे होते इतिहासामधूनच इतिहास पाहायचा म्हटले तर जसे प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेच्या मदतीने सेतू बांधून लंका प्रवेश केला तसेच थेट खाडी बुजवून सेतू बांधून जंजिरा सर करण्याचा संभाजीराजांचा मानस होता. सेतू बांधण्याचे काम सुरु झाले. लाकडाचे ओंडके, आवश्यक तेवढी साधन सामग्री मागवण्यात आली. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हा एक मोठा प्रश्नच होता, पण या कडे एक धाडसी निर्णय म्हणून पाहता येईल. सेतू बांधण्यात थोडे यश प्राप्त झाले खरे पण निसर्गचक्रापुढे कोणाचे काय चालणार? सागरास भारती आली आणि केल्या कामावर पाणी फेरले गेले. आणि याच दरम्यान औरंगजेब दख्खनेत उतरल्यामुळे आणि त्याचे सरदार कोकणात उतरल्यामुळे छत्रपती संभाजीराजांना जंजिरा मोहीम अर्धवट सोडणे क्रमप्राप्त झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४