Posts

Showing posts from January, 2022

सरसेनापती म्हाळोजी घोरपडे याचा अपरिचित इतिहास ..!!!!

Image
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती पद हे स्वामीनिष्ठा पाहून, त्याग पाहुण, आफाट पराक्रम, शौर्य पाहून  दिलं जातं होत.तेव्हा कूट सरसेनापती पदाची अवघड जबादारी मिळते..  हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं वाई मधील शेवटचे युद्ध या युद्धामध्ये त्यांना त्याचा गोळा लागतो आणि हिंदवी साम्राज्याचा बुलंद बुरज कोसळतो. या युद्धामध्ये खुर्द सेनापती धारातीर्थी पडले. कधीही भरून न निघणारा नुकसान आता स्वराज्य झाला होत.  रिक्त झालेल्या सेनापती पदासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासारखेच पराक्रमी अनुभवी स्वामीनिष्ठ, शौर्य, आणि महापराक्रमी असणारे सरदार घोरपडे घराण्यातील म्हाळोजी घोरपडे यांची  निवड केली.  छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हाळोजी यांना सारंजमी देऊन मुखत्यारी सांगून त्याना सरनोबतीची वस्त्रे देऊन नियुक्ती केली. आणि स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून म्हाळोजी घोरपडे सरनोबत पदावर रुजू झाले.  म्हाळोजी घोरपडे हे स्वराज्य प्रेरणास्थान  शहाजी महाराज यांच्या सोबत  आदिलशाहीत सरदार होते. त्याना वतन व मान पान आदिलशहाकडून मिळाली होते.  छत्रपती शिवाजी महाराजांनी

मौजे नेर्ले प्रांत कराड येथील साळोंखे पाटील यांच्या पाटीलकीच्या वादासंदर्भातील हे पत्र

Image
मौजे नेर्ले प्रांत कराड येथील साळोंखे पाटील यांच्या पाटीलकीच्या वादासंदर्भातील हे पत्र.यामध्ये नेर्लेच्या साळोंखे पाटलांना त्यांचे आप्त-सोयरे श्रीमंत महादजी शिंदे यांच्याकडुन न्याय मिळवून देण्यात आला. साभार :-इतिहासाचे अभ्यासक प्रसाद शिंदे 

छत्रपती_शाहू_ महाराजांच्या_सैन्याशी_लढणे_म्हणजे_सबंध_#हिंदुस्तानला_लढाईचे_आव्हान_देण्यासारखे_आहे...

Image
#अपरिचित_शाहू_छत्रपती_महाराज  #छत्रपती_शाहू_महाराजांच्या_सैन्याशी_लढणे_म्हणजे_सबंध_ #हिंदुस्तानला_लढाईचे_आव्हान_देण्यासारखे_आहे... आज पासून बरोबर ३०० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांवर मोहीम हाती घेतली होती. खालील पत्र गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सीस्कु झुजे सांपायु इ कास्रु यानं पोर्तुगालच्या राजाला पाठवलय आणि यात पोर्तुगीजांचाच कसा बोजवारा उडाला याचा वृत्तांत आला आहे. कान्होजी आंग्रे यांच्या बरोबर लढण्यासाठी पोर्तुगीजांनी इंग्रजांची सोबत घेतली. हे दोघं एकत्र आल्यावर कान्होजी आंग्रे यांच्या मदतीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी सहा हजार स्वार पेशवा बाजीराव बल्लाळ यांच्या दिमतीला देऊन कान्होजी आंग्रे यांच्या कुमकेला पाठवले त्यामुळे पोर्तुगीज व इंग्रज यांच्यावर मराठ्यांचे सैन्य भारी पडले.  सदर पत्रात व्हाईसरॉय चं एक मोठे विलक्षण वाक्य आहे आणि ते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या सैन्याशी लढणं म्हणजे सबंध हिंदुस्थानला लढाईचे आव्हान देण्यासारखे आहे. तसेच पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पोर्तुगीजांवर झालेल्या मोहिमेचा उल्लेख पण या व्हाईसरॉय नं केला आहे.

मराठेशाहीतील काही प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरे

Image
आज जागतिक हस्ताक्षर दिन. त्या निमित्ताने मराठेशाहीतील काही प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरे(पत्रांचा फोटो) खाली देत आहे. १)पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज २)महाराणी ताराबाई ३)फत्तेसिंग भोसले ४)समशेर बहादूर ५)नाना फडणवीस ६)मल्हारजी होळकर ७)नारायणराव बल्लाळ ८)महादजी शिंदे ९)रामशास्त्री प्रभुणे १०)सवाई माधवराव १)पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज २)महाराणी ताराबाई ३)फत्तेसिंग भोसले ४)समशेर बहादूर ५)नाना फडणवीस ६)मल्हारजी होळकर ७)नारायणराव बल्लाळ ८)महादजी शिंदे ९)रामशास्त्री प्रभुणे १०)सवाई माधवराव पत्र साभार:- मराठेकालीन प्रसिद्ध व्यक्तींची हस्ताक्षरयुक्त पत्रे #हस्ताक्षर #जागतिक_हस्ताक्षर_दिन साभार :- सदर पोस्ट प्रथमेश खामकर पाटील यांनी फेसबुक शेअर केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी ! 💐💐💐

Image
अनेक वर्ष झाली काही खुळचट लोक गांधींच नाव संपवण्याचा प्रयत्न आहेत कारण ते कधी मरतच नाहीत. गांधी अमर आहेत. गांधींना संपवता येत नाही कारण ती व्यक्ती नाही. एक विचार आहे, एक जीवनशैली आहे आणि एक अभ्यास आहे. त्यांना हरवायचं असेल तरी आधी त्यांना समजून घ्या. शिव्या-शाप,भाकडकथा आणि दुष्प्रचारानी संपण्याइतके तकलादू नाहीत ते. गांधीजी होते, आहेत आणि कायम राहतील सत्य, अहिंसा आणि सहिष्णुतेचा संदेश देत. बापू आजही आहेत कारण महात्मा गांधी हा एक विचार आहे!            राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे विचार आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींचा वसा जपत आज भारत वाटचाल करत आहे.            महात्मा गांधी ना त्यांच्या पुण्यतिथी बद्दल विनम्र अभिवादन !!! 💐💐💐

दीपमाळ ही प्रत्येक गावांमध्ये मंदिरा समोर पाहायला मिळतेच? याच दीपमाळे विषयी जाणून घेऊ.

Image
 दिपमाळी म्हणजे मंदिराच्या ,गावाच्या वैभवाचे प्रतीकच  हीं  फोटोत दिसणारी दीपमाळ औध ता खटाव येथील यमाई मंदिराच्या समोरची आहे  दिपमाळ  वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे ,उंचीचे दिपमाळी आनेक ठिकाणी मंदिरच्या परिसरात महाराष्ट्रभर पहायला मिळतीलच. हीं जाणाई देवीचं मुळ मंदिर असणारे निवखन येथील मंदिर परिसरातील आहे. अगदी लहान पणा पासून दीप माळ आमचा आकर्षनाचा विषय परंतु आज वर डिटेल मध्ये माहिती शोधली नव्हती. पाहू या काय असतीय दीप माळेत. मंदिर परिसरातील रात्री प्रकाशासाठी केलेले एक प्रकारचे स्तंभसदृष्य बांधकाम असते. 👉दीप माळबांधकाम कस असते? हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायर्‍या-पायर्‍यांनी वर निमुळता होत गेलेला असतो. तरी सुद्धा समजलं नाही तर वरील फोटो आहेच की..  पायर्‍यावर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात उद, गुगुळ असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो. 👉दीपमाळ चे उल्लेख पहिले कधी आढळून आलेत? उत्सव प्रसंगी शहरात दीपवृक्ष पाजळत असल्य

२७ जानेवारी इ.स.१६८०

*शिवकालीन ऐतिहासिक शिवदिनविशेष* ********************************** *२७ जानेवारी इ.स.१६५८* छत्रपती शिवरायांनी "माहुलीचा किल्ला उर्फ भंडारगड"  जिंकून स्वराज्यात आणला.          ठाणे जिल्ह्यात आसनगावजवळ एक गडाचे त्रिकुट आहे (माहुली, पळसगड आणि भंडारगड). १४८५ च्या सुमारास हे ठिकाण नगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्याकडे आले. नंतर शहाजी राजे निजामशाहीचे संचालक झाल्यावर मुघल सेना आणि आदिलशाही संयुक्तपणे निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न करत होत्या. १६३५ च्या सुमारास शहाजीराजेंनी कठीण परिस्थितीत बळकट आश्रयस्थान म्हणून शिवनेरी, जुन्नर-पुणेहून जिजाबाई राणी आणि बाल शिवबासह माहुलीला मुक्काम हलवला. खानजमानने त्यावेळी माहुलीला वेढा दिला. शहाजीराजेंनी पोर्तुगीजांकडे मदत मागितली पण त्यांनी नकार दिला. त्यावेळी शहाजीराजेंनी शरणागती पत्करली. शिवाजी महाराजांनी हा किल्ला २७ जानेवारी१६५८ ला मोघलाकडून परत मिळवला. *२७ जानेवारी इ.स.१६६७* छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल २७ जानेवारी १६६७ च्या एका पत्रात पोर्तुगीज व्हॉइसरॉय लिहतो : "धुर्तपणा, चातुर्य, पराक्रम, चपलता आणि लष्करी बुध्दी ह्या बाबतीत शि

नुयार्क टाइम्स ने धोंडाजी वाघ याचा केलेला उल्लेख

Image
नुयार्क टाइम्स ने धोंडाजी वाघ याचा केलेला उल्लेख 

एकविरा आई मंदिर आणि मंदिराच्या बाजूला असलेल्या कार्ले लेणी

Image

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील मुख्य फरक काय ते आपण खाली समजून घेऊ 🇮🇳

Image
🇮🇳 *15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील  मुख्य फरक काय ते आपण खाली समजून घेऊ ...* 🇮🇳                                15 ऑगस्ट ला *पंतप्रधान* झेंडा     *फडकवतात*  तर ...   26 जानेवारीला *राष्ट्रपती* *ध्वजारोहण* करतात.  कारण देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेंव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आलेलं नव्हतं.                                                                                            15 ऑगस्टला झेंडा     उघडलेल्या अवस्थेत दोरीने  वर चढवला जातो. त्याला *ध्वजारोहण (flag hoisting)*  म्हणतात तर...    26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा *फडकवला*  जातो. त्याला *(flag unfurling)*  म्हणतात.    15 ऑगस्ट 1947 ला     इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला. म्हणून त्याला *ध्वजारोहण* म्हणतात.         तर... 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या नंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून

युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराज !!जय जिजाऊ जय शिवराय!!

Image
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जन्म 19 फेब्रुवारी1630ला किल्ले शिवनेरी येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे त्या काळातील मातब्बर सरदार सेनानी होते.शहाजीराजे हे गनिमी युद्धाच्या सुरुवातीच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. त्यांनी भोसले कुटुंबाला वेगळेपण दिले. तंजावर, कोल्हापूर, सातारा ही मूळ राज्येही भोसले घराण्याची देणगी आहेत. मातोश्री राजमाता जिजाऊ या मूळच्या शिंदखेडा येथील जाधव घराण्यातील होत्या.छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब शौर्य, नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी शिवाजी महाराजाना दिला. त्यांचे वडील राजेलखुजी जाधव हे त्या काळातील मातब्बर सरदार पराक्रमी होते. छत्रपती शिवाजी शहाजी भोसले. (महाराज)1630ते 1680 हे एक महान भारतीय राजे होते. त्यांनी महाराष्ट्र मध्ये रयतेचे राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याचा पाया घातला. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मिती मध्ये अनेक बलाढ्य सत्तांशी सामना करावा लागला. त्यामध्ये विजापूरचा आदिलशहा, इंग्रज, पोर्तुगीज, मोगल साम्राज्याचा बादशहा औरंगजेब तसेच तर स्थानिक अनेक विविध सत्तांचा

राष्ट्रीय मतदान दीनाच्या शुभेच्छा. तुमचा अधिकार तुमचं मत.वाया जाऊ देऊ नका.

Image
 कोणत्याही भूल थापांना बळी न पडता, कोणत्याही विकृत दहशतीला बळी न पडता, पैशाच्या मोहाला बळी न पडता. *मटनाचा तुकड्याला दारूच्या घोटाळा" बळी न पडता. सर्वगुणसंपन्न  उत्तम असा,लोकांना आपला वाटणारा लोक प्रतिनिधी उमेदवार निवडून देण ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी अन हक्क आहे.  सर्वच पक्ष चागली विचारधारा घेऊन पुढे येत असतात.  परंतु त्या पक्षातील उमेदवार पात्रतेचे आहेत का नाही. हे तपासन हे प्रत्येक भारतीयच नागरिक या नात्याने तपासणे कर्तव्य आहे. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमुल्य आहे.  भारताचा राजकीय इतिहासात या आधी 1-1 च्या मताने सरकार बनले आणि कोसळल सुद्धा आहेत. अशी उदारणे भरपूर आहेत.मी या ठिकाणी माडनार नाही म्हणून, प्रत्येकाने निःपक्षपातीपणे मतदान केले पाहिजे, आणि राष्ट्रनिर्मितीत त्यांचा सहभाग घेतला पाहिजे,  तसेच देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे जेणेकरून आपला देश सतत प्रगतीच्या नव्या उंचावर येऊ शकेल.या मध्ये प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची.  प्रत्येक भारतीयांनी मतदान करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, तेव्हाच लोकशाही

लक्ष्मी नारायण मंदिर, मांडवगण, ता. श्रीगोंदा, अहमदनगर

Image
लक्ष्मी नारायण मंदिर, मांडवगण, ता. श्रीगोंदा, अहमदनगर सरस्वती नदीच्या तटावर वसलेले श्रीपुरनगर अर्थात श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण गाव नगर शहरापासून ३० किमी अंतरावर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका हा साधुसंतांची भूमी असलेला आणि दक्षिण काशी म्हणून ओळखला जातो, याच तालुक्यातील मांडवगण या गावात मांडव्य ऋषी ची तपोभूमी आणि संजीवन समाधी आहे म्हणून या गावाला मांडवगण असे नाव पडले. पौराणिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या गावातील लक्ष्मीनारायण मंदिर पुरातत्त्व विभागाने राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. मांडवगण गावातून कटाक्ष आणि वटाक्ष या दोन नद्या एकत्र येऊन संगम पावतात याच नदीच्या काठावर सिद्धेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, होळकरांचा वाडा आणि हे पुरातन लक्ष्मीनारायण मंदिर आहे. श्रीगोंदा तालुक्यात अनेक लक्ष्मी मंदिर आहेत त्यापैकी एक शहरांमध्ये शिंपी गल्ली मध्ये अगदी दुरावस्थेत असलेले यादवकालीन लक्ष्मी मंदिर, तसेच पांडे पेडगाव भुईकोट किल्ल्यातील म्हणजेच आजच्या धर्मवीर गडावरील लक्ष्मीनारायण मंदिर आणि हे मांडवगण येथील लक्ष्मीनारायण मंदिर, याच मं

राजमाता माँ जिजाऊ साहेबांचे पिताश्री, लखुजीराव जाधवराव यांची, मुले व नातवासह निजामाने कपटाने देवगिरी च्या किल्यावर बेसावध अवस्थेत हत्या केली होती. त्यांची व राजपरिवातील सदस्यांच्या समाधी शिंदखेडराजा

Image
देवगिरी च्या यादवराजेंचे वंशज (पुढे यादव चे जाधव झालेले) महापराक्रमी, स्वतःच एक सल्तनत असलेले शिंदखेड चे राजे, राजमाता माँ जिजाऊ साहेबांचे पिताश्री, लखुजीराव जाधवराव यांची, मुले व नातवासह  निजामाने कपटाने देवगिरी च्या किल्यावर बेसावध अवस्थेत हत्या केली होती. त्यांची व राजपरिवातील सदस्यांच्या समाधी शिंदखेडराजा