छत्रपती_शाहू_ महाराजांच्या_सैन्याशी_लढणे_म्हणजे_सबंध_#हिंदुस्तानला_लढाईचे_आव्हान_देण्यासारखे_आहे...
#अपरिचित_शाहू_छत्रपती_महाराज
#छत्रपती_शाहू_महाराजांच्या_सैन्याशी_लढणे_म्हणजे_सबंध_
#हिंदुस्तानला_लढाईचे_आव्हान_देण्यासारखे_आहे...
आज पासून बरोबर ३०० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांवर मोहीम हाती घेतली होती. खालील पत्र गोव्याचा व्हाईसरॉय फ्रान्सीस्कु झुजे सांपायु इ कास्रु यानं पोर्तुगालच्या राजाला पाठवलय आणि यात पोर्तुगीजांचाच कसा बोजवारा उडाला याचा वृत्तांत आला आहे. कान्होजी आंग्रे यांच्या बरोबर लढण्यासाठी पोर्तुगीजांनी इंग्रजांची सोबत घेतली. हे दोघं एकत्र आल्यावर कान्होजी आंग्रे यांच्या मदतीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी सहा हजार स्वार पेशवा बाजीराव बल्लाळ यांच्या दिमतीला देऊन कान्होजी आंग्रे यांच्या कुमकेला पाठवले त्यामुळे पोर्तुगीज व इंग्रज यांच्यावर मराठ्यांचे सैन्य भारी पडले.
सदर पत्रात व्हाईसरॉय चं एक मोठे विलक्षण वाक्य आहे आणि ते म्हणजे छत्रपती शाहू महाराजांच्या सैन्याशी लढणं म्हणजे सबंध हिंदुस्थानला लढाईचे आव्हान देण्यासारखे आहे. तसेच पूर्वी छत्रपती संभाजी महाराजांच्या पोर्तुगीजांवर झालेल्या मोहिमेचा उल्लेख पण या व्हाईसरॉय नं केला आहे.
पत्रासाठी संदर्भ - पोर्तुगीज - मराठे संबंध (डॉ स शं देसाई)
Comments
Post a Comment