रांजणगाव, मोरगाव, थेऊर या अष्टविनायक गणपती मंदिरांमुळे महत्व अधिक आहे. या अष्टविनायक गणपतीप्रमाणेच असंख्य गणेशभक्तांचं श्रद्धास्थान आहे ते चिंचवडमधील मोरया गणपतीचं. पवना नदीच्या तीरावर असलेलं हे मंदिर म्हणजे गणेश भक्तीची साक्ष देणारं स्थान.

पुणे जिल्ह्याचं आध्यात्मिक महत्व  रांजणगाव, मोरगाव, थेऊर या अष्टविनायक गणपती मंदिरांमुळे अधिक आहे.

👉या अष्टविनायक गणपतीप्रमाणेच असंख्य गणेशभक्तांचं श्रद्धास्थान आहे ते चिंचवडमधील मोरया गणपतीचं मंदिर.

 👉पवना नदीच्या तीरावर असलेलं हे मंदिर म्हणजे गणेश भक्तीची साक्ष देणारं स्थान.

थोर गणेशभक्त संत मोरया गोसावी यांची समाधी ही याच ठिकाणी आहे. ही उजव्या सोंडेची गणेशमूर्ती आहे.


👉मोरया गोसावी यांनी या गणेशाची स्थापना केली. इ.स. 1655 मध्ये गोसावी यांनी जिवंत समाधी घेतली.

👉 त्यानंतर 1659 मध्ये त्यांच्या चिरंजीवांनी हे मंदिर उभारलं.

Tou tube :-
https://youtu.be/H-mWpUsAVUw


मंदिराची बांधणी साधी दगडाची आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर एक सभामंडप लागतो. या प्रशस्त सभामंडपापासून आत गेल्यावर श्रीमोरया गोसावींची सजीवन समाधी आहे.
समाधीवरची मूर्ती द्विभुज गणपती सिद्धी बुद्धीसहित चिंतामणी महाराजांनी बसवलेली आहे. शेंदूर लेपून ही मूर्ती फार मोठी झाली होती.अशी दंतकथा सांगितली जाते.1956 साली मूर्तीची खोळ पडली. आत काळ्या पाषाणाची घडवलेली अत्यंत सुबक मूर्ती निघाली.

 बाहेरच्या गाभाऱ्यात अर्जुनेश्वराची प्रचंड शाळुंका आहे. मोरया गोसावींच्या समाधीकडे जाण्याचा रस्ता तिथूनंच आहे, असं सांगितलं जातं. समर्थ रामदास, श्रीसंत तुकाराम महाराज हेही या स्थानाचे भक्त होते.

गेल्या अनेक दशकांपासून भाद्रपद आणि माघ महिन्यात मंगलमूर्तीची यात्रा निघते. यामध्ये मोरयांची पालखी अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावच्या मोरेश्वर गणपतीच्या मंदिरात पायी जाते. येथे मार्गशीर्ष महिन्यात संजीवन समाधी सोहळा होतो, तसंच प्रत्येक चतुर्थीला अथर्वशीर्षाचं पठण केलं जातं. चतुर्थी दिवशी चंद्रोदयानंतर महाप्रसादाचं वाटप होतं. याव्यतिरिक्त अन्य छोटेखानी कार्यक्रमही येथे नेहमी होत असतात.

 ट्रस्टद्वारा वेद पाठशाळा चालवली जाते. या सर्व कार्यक्रमांचा खर्च संस्थानाकडून केला जातो.


मोरया गणपती हे जागृत देवस्थान असल्यानं दूरवरून अबाल-वृद्ध याठिकाणी दर्शनाला येतात.

त्यामुळे प्रत्येक चतुर्थीला इथल्या परिसराला जणू यात्रेचं स्वरूप येतं. हे बाप्पा नवसाला पावणारे असल्याची भावना सर्व गणेश भक्तांची आहे. त्यामुळं अनेक भक्त बाप्पाला वेगवेगळे नवस करतात. तसंच नवस पूर्ण झाल्याचंही दर्शनाला येणारे भाविक सांगतात.

अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावच्या मोरेश्वरांच्या भेटीला मोरया गणपती हे वर्षातून दोनदा जातात.

 त्यामुळं मोरया बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर अष्टविनायक गणपतींपैकी एकाचे दर्शन झाल्याची भावना गणेश भक्त व्यक्त करतात.

मंदिराचा पवना नदीकाठचा परिसर आणि बांधणी यामुळं इथं प्रसन्न वातावरण असतं.

 बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर मनातील क्लेश, त्रास आणि थकवा नाहीसा होत असल्यानं वृद्ध भक्त ही मोठी गर्दी करतात.

रोज येऊन दर्शन घेणाऱ्यांसोबत एकादशी आणि विनायकीला देखील इथं भक्त मोठी गर्दी करतात.

अष्टविनायक गणपतींपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक या तीन मंदिरांच व्यवस्थापन चिंचवड देवस्थानकडून पाहिलं जात. त्यामुळं या अष्टविनायकांचं जेवढं महत्व आहे तेवढंच महत्त्व मोरया गणपतीला आहे

You tube 
https://youtu.be/H-mWpUsAVUw

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४