#आम्ही_किरणमानेंसोबत..

राजकीय भुमिका घेतली म्हणुन कधी विक्रम गोखले, पोंक्षे, गुप्ते वगैरे वगैरे लोकांच काम जात का...??? नाही.
कारण कलाकाराला पण स्वताच मतस्वातंत्र्य आहे.
पण माने जर असेल तर मात्र कामावरुन काढल जात.
कारण मतस्वातंत्र्य हे विशिष्ट जातीसाठी असाव लागत बहुतेक. 

यालाच सांस्कृतिक दहशतवाद म्हणतात.

Kiran Mane STAR Pravah

लेखक, कलाकारांनी समाजाचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहीले पाहीजे...कारण कलाकार हा समाजाचा आरसा असतो असं आपल्याकडे पुर्वापार म्हटलं जातं..आजकाल समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांच्या उथळ आणि लाळघोट्या बजबजपूरीत किरण मानेंसारखा सच्चा माणूस  सामाजिक वेदनेचा प्रतिनिधी, समाजमनाचा आरसा म्हणून पुढे येतो, तेव्हा प्रतिगामी जातवर्चस्ववादींना सहन होत नाही...


किरण माने कलाकार आहे, त्याने राजकीय भुमिका घेऊ नये, कलाकाराने फक्त कामच करावं, राजकारणात लक्ष घालू नये ,असं वाटणारे शरद पोंक्षे, आरोह वेलणकर, कंगणा राणावत यांना, आणि अशाच घटकंचुकीच्या पेठीय अवलादींना हेतूपरस्पर नजरेआड करतात...



लाचाराला वाकवणं सोपं असतंय...तुकडा टाकला की शेपटी हालवतंय ते..
पण इरसलबाजाला वाकवणं कुणाच्या बापाला जमलं नाय...


“किरण माने यांना विरोध करणारे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला, तुकाराम महाराजांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तीचे”, किरण मानेंची तटस्थ भूमिका आहे.


मानेंनी एक तुकाराम महाराजांच्या वाक्याचा विडीओ सोशल मिडीयामधुन शेअर केला होता तो असा होता.
अभक्त ब्राम्हण जळो तयाचे तोंड ! काय त्यासी रांड प्रसवली !!१!!
वैष्णव चांभार धन्य त्याची माता ! शुद्ध उभयता कुळ याती !!धृ!!
विद्रोही तुकाराम
आम्ही वारसदार ....
या पोस्टमूळे  पित्त खवळले आनी किरन माने यांना टार्गेट करन्यात आले. 



कंगना राणावत, परेश रावल, विक्रम गोखले, आरोह वेलणकर, शरद पोंक्षे हे लोक उघड उघड भाजपच्या समर्थनार्थ भूमिका घेतात. त्यांना कधी चित्रपट, नाटक, मालिकेतून काढून टाकले जात नाही. पण दिल्लीतील शेतकरी आंदोलन किंवा इतर सामाजिक राजकीय विषयांवर व्यक्त झाले किंवा भाजपच्या विरोधात बोलले की मराठी चित्रपट सृष्टीत आपल्या अनुभवाने लाखोंची मनं जिंकणार्‍या किरण माने यांच्यासारख्या कलाकाराला जो की मालिकेचा एक मुख्य भाग आहे त्यांना मालिकेतून काढून टाकले जाते. त्यांची रोजी-रोटी हिसकावून घेतली जाते. या प्रवृत्तीला कडाडून विरोध झाला पाहिजे व किरण मानेंच्या पाठीशी सर्वांनी उभे राहिले पाहिजे. 

कामं काय, एक गेलं तर हजार मिळतील, पण एकदा झुकलं की पुन्हा कणाटा ताठ व्हणार नाय...
त्यामुळं ...
शरद पोंक्षे
योगेश सोमण
विक्रम गोखले
सगळे एकानेच मोडीत काढले ...नाव ध्यानात ठेवायचं.
इलास पाटील.


प्राॅडक्शन हाऊसने रचलेल्या मोठ्या कारस्थानाचा किरण मानेंनी आधीच केला भांडाफोड; 


अशात किरण माने यांनी या प्रकरणी एक फेसबूक पोस्ट लिहीली आहे. आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रोडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू.. आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे…
करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच
पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी !
तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!! – किरण माने.

शेवटी 'सत्य' बाहेर येतं !
सत्य 'शेवटी' बाहेर येतं !!
...कारण कितीही रस्ता अडवला तरी ते लपून राहू शकत नाही !!!
अशी पोस्ट करत.. अनेक अनेक अभिनेत्रीची पोस्ट शेअर किरण माने यांनी शेअर केली आहे

 शेवटी सत्य बाहेर येताच.!
 सुप्रसिद्ध किरण माने याचे महिला सह कलाकार यांनी सुद्धा किरण माने यांचा समर्थनार्थ. अनेक पोस्ट केले आहेत. त्यामध्ये  अभिनेत्री प्राजक्ता केळकर, अभिनेत्री गौरी सोनार, अभिनेत्री श्रुती भास्कर, अभिनेत्री शीतल गीते, अभिनेत्री श्वेता अंबेकर, अभिनेत्री अनिता दाते अशा अनेक महिला सहकलाकारांनी किरण माने यांची वर्तणूक चांगली आहे. म्हणून समर्थन दिले आहे.

#support_kiranmane 
#banstarpravah

#लढ_बाप्पू...

#सातारी_वाघ...

#आम्ही_किरण_मानेंसोबत..

Comments

  1. जय शिवराय
    किरण माने यांना आमचे समर्थन आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४