शिखर शिंगणापूर
शिखर शिंगणापूर
शिखर शिंगणापूर हे नाव कसं पडलं?
👉देवगिरीच्या यादव घराण्यातील सिण्धन (१२१०-१२४२) शिंगणापूर नाव पडले असावे कोल्हापूरच्या भोज राजाशी युद्ध करत असताना त्याचा येथे तळ पडला होता .
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर मंदिर जीर्णोद्धार व शिखर शिंगणापूरचा तळ बांधूले असे उल्लेख मिळतात.
👉मालोजीराजे भोसल्यांनी लोकांची व यात्रेकरूंची तहान भागवण्यासाठी येथे एक मोठे तले खोदले.
डोंगरावर गोदड स्वामी नावाचे एक थोर शिवभक्त राहत होते. जमीन आकाश आणि देह वस्त्रहीन म्हणून मालोजींनी त्यांना एक बांधून दिला या खेरीज मालोजींनी कमीत कमी ५ जनाकरता अन्न छत्र केले.
👉 छत्रपती शाहू महाराजांशी संबंधित बिरुबाई हिने येथे दीपमाळ बांधली बसंतराव कासुर्डे यांनी शाहू महाराजांच्या सांगण्यावरून बारामातीहून आणून देवळाचा जीर्णोद्धार केला.
अहिल्याबाई होळकर यांनी १७३५ ते १७९५ च्या दरम्यान पुष्कळ विहिरी बांधल्या छत्रपति व पेशवे येथे वारंवार दर्शनास येत असे उल्लेख आहेत.
👉शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी १६३० साली देवळाचा जीर्णोद्धार केला आणि पुढे मलवडी चे घाटगे नावाच्या एका सरदारांनी शहाजीराजांना कायमचे इनाम म्हणून दिले. असे उल्लेख मिळतात.घराणे येथील देवाचे भक्त होते. बजाजी निम्बाल्करांची शुद्धी येथे जीजामातेनी केला . १८१७च्या जानेवारीत त्रिम्बकजि डेंगळे ठाण्याच्या तुरुंगातून पळून येथे आले. व सैन्य जमवून पुंडावा आरंभला १८१८च्या एप्रिल मध्ये सेनापती स्मिथने त्यांना येथून पळवून लावले
👉छत्रपती शिवाजी महाराजांनीं येथे वेस प्रांगण व देऊळ बांधले येथील देऊळ कमानी,वेशी, दीपमाला व इतर शिल्पकाम प्रेक्षणीय आहे. ते समक्ष पाहणेच उत्तम.
👉१७२० हा सन असलेल्या कोकणातील एकाद्या चर्च मधून आणलेल्या दोन घंटा आहेत.
येथे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे , स्वराज्य निर्माते शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरच्या हिराबाई यांची स्मृती स्थळे आहेत.
👉 बळी मंदिर?
बळी महादेव महादेव उर्फ अमृतेश्वर , खडकेश्वर महादेव यांची देवळे आहेत खडकेश्वर महादेव देवळाजवळ वेस नाझर गावाच्या धनगराने बांधली आहे. मंग समाजाचा देव मंगोबा एका कोनाड्यात आहे.
Comments
Post a Comment