चुण्याचा घाणा कोणत्या कालखंडात? चुण्याच्या घाणा व मध्ये कोण कोणते पदार्थ मिसळूतात? अनेक वर्षानंतर किल्ले वसंतगडयेते चुण्याचा घाणा चालू करून कार्यन्वित करून आत्ताच्या काळामध्ये सुद्धा तटबंदी शिवप्रेमींनी मजबूत केली.

चुण्याचा घाण्या विषयी थोडक्यात माहिती खालील प्रमाणे पाहू.

👉गड किल्ले बांधकाम मधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे चुना.

👉गड किल्ले संवर्धनाच्या कामांमध्ये सिमेंट ऐवजी चुन्याचा वापर केला जातो.

 ऐतिहासिक मध्ययुगीन कालखंडात जास्त बांधकामामध्ये चुन्याचा वापर केला जात होता.अगदी काही तूरळक ठिकाणी 19व्या शतका पर्यत वापरत दिसून येतो.

👉तिकोना ,रोहिडा , वसंतगड किल्ल्यावरील गाना आणि त्यात चुना दळण्यासाठी वापरण्यात आलेल्या दगडाची चाक आजही सुस्थितीत आहे.
 किल्ले वसंतगड सुस्थितीमध्ये असणाऱ्या चुण्याचा घाण्याचे काही  विडिओ मी खलील लिंक मध्ये देत आहे ते आवर्जून पहावे.

https://youtu.be/VNaqQ2bhxi4


https://youtube.com/shorts/thjydceL7OY?feature=share

👉चुण्याचा घाण्यात कोणकोणते पदार्थ मिक्स केले जातात?

घाण्याच्या चरामध्ये चुनखडी, वाळू, गुळाचे पाणी ,मेथीच्या बिया, बेलफळ यांसारखे पदार्थ एकत्र केल्यावर हे चाक त्यावेळी बैल लावून फिरवले जात होते, फिरवल्यामुळे सर्व पदार्थ एकजीव होत.आणि ते हजारो वर्ष किल्ले मजबूत ठेवत.

 किल्ले वसंतगड आव सुद्धा काही संघटनांनी, सह्याद्री प्रतिष्ठान, शिवप्रेमींनी एकत्र येऊन मिळून किल्ल्याची तटबंदी चुन्याच्या घाण्यावर तयार केलेल्या चुण्याने तटबंदी मजबूत केली असून त्यांचं शिवप्रेमी कडून कौतुक होत आहे.

👉 आपण आता चुन्याच्या घाण्याचे फोटो पाहून
पूर्वीचे बांधकाम चुन्यात होत असे, सिमेंट नव्हते, त्याकाळी गोल चारी दिसतेय त्यात गोल दगडी चाक (1 ते दीड मीटर व्यास) व रिम वर चपटे चाक यातून फिरत असे, त्या चारीत वाळू चुना व गरजेनुसार पाणी घालून चारीत रगडले जायचे, विशिष्ट पातळीवर रगडून झाल्यावर मिश्रण बाहेर काढले जाई, त्याची गरज म्हणून शेजारी पाण्याचा हौद, त्या मोठ्या दगडी चाकाला मध्यात भोक असे, त्यातून लाकडी अक्ष वर्तुळाच्या केंद्राला जोडलेला असे, चारीच्या बाहेरून त्या लाकडी अक्षाला बैल जुंपून ओढले जात असे, उसाच्या लाकडी चरख्याप्रमाणे

चुन्याचा घाणा याचा उपयोग किल्ल्याचा वाडे, बुरुज, तटबंदी यामध्ये चुन्याचा वापर केला जात असे.

 दुसरी कडून चुना मागवण्यापेक्षा गडावरच चुना कसा तयार होईल यासाठी हा घाणा तयार केला जाई.




चुना बारीक करण्यासाठी बैल किंवा रेडा यांचा वापर केला जात असे.


दूर वरून चुना मागवण्यापेक्षा आपत्कालीन परिस्थिती मध्ये बांधकामासाठी अनेक किल्ल्यावर घाणा तयार केला जात असे. शिवकाळात विसापूर च्या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात चुना तयार केला जात असे





 मध्ययुगीन कालखंडामध्ये जास्तीत जास्त जुन्या च्या साह्याने बांधकाम दिसून येते. विसाव्या शतकाच्या अखेरीस पर्यंत व किचित ठिकाणी 19व्या शतकात वाराला गेला आहे या स्थापत्यशैलीत होत होता.
आज ही किल्ले वसंतगड वर चुण्याचा घाणा चालू करून तट बंदि बजबूत केली जात आहे... या संघटना व समस्त शिव प्रेमी साठी आनंदाची बाब आहे

 शेकडो गडकोट किल्ले उभारणीसाठी प्रतक्ष्य साक्षीदार म्हणजे चुन्याचा घाना,,

गडाच्या बांधकामासाठी प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असत .

यासाठी चुना दळण्यासाठी मळण्यासाठी घाण्याचा वापर केला जात असे. घाण्याचा साहाय्याने चुना मिश्रित करून गडावरच बनवला जात असे.

यामध्ये चुना ,गूळ, बेलफळ,भाताचे तूस, पाणी इत्यादी पदार्थांचे मिश्रण दगडी जात्याने बैलमार्फत फिरवले जात असे. असे घाणे आज बऱ्याच किल्यावर दिसून येतात.

 या ऐतिहासिक वास्तूचे जतन आपण करायला हवे.









Comments

  1. खुप उपयुक्त माहीती आहे..जुन्या पद्धती पुन्हा नव्याने अमलात आणल्या पाहीजेत.जसे गडाच्या तटबंदीला मजबूत करायला चुना वापरला तसेच घरेही जुन्याच पद्धतीने बांधायला हवीत.अशा घरांची लाईटही जास्त असते आणि महत्त्वाचं म्हणजे खरच कमी येतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...