दीपमाळ ही प्रत्येक गावांमध्ये मंदिरा समोर पाहायला मिळतेच? याच दीपमाळे विषयी जाणून घेऊ.
दिपमाळी म्हणजे मंदिराच्या ,गावाच्या वैभवाचे प्रतीकच
दिपमाळ वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे ,उंचीचे दिपमाळी आनेक ठिकाणी मंदिरच्या परिसरात महाराष्ट्रभर पहायला मिळतीलच.
हीं जाणाई देवीचं मुळ मंदिर असणारे निवखन येथील मंदिर परिसरातील आहे.
अगदी लहान पणा पासून दीप माळ आमचा आकर्षनाचा विषय परंतु आज वर डिटेल मध्ये माहिती शोधली नव्हती.
पाहू या काय असतीय दीप माळेत.
👉दीप माळबांधकाम कस असते?
हे बांधकाम बहुदा दगड व चुन्याचा वापर करून केलेले असते.खाली चौथरा, त्यावर गोलाकार स्तंभ असून तो पायर्या-पायर्यांनी वर निमुळता होत गेलेला असतो.
तरी सुद्धा समजलं नाही तर वरील फोटो आहेच की..
पायर्यावर तेलाचे दिवे ठेवण्यासाठी खड्डे असतात. सर्वात वर खोलगट भाग असून त्या भागात उद, गुगुळ असे ज्वालाग्राही पदार्थ टाकून पेटवितात. त्यामुळे उंचावरून प्रकाश दूरवर पसरतो.
👉दीपमाळ चे उल्लेख पहिले कधी आढळून आलेत?
उत्सव प्रसंगी शहरात दीपवृक्ष पाजळत असल्याचे उल्लेख रामायणासारख्या ग्रंथात आलेले आहेत.
👉मराठ वाडयातील लोक दीप माळेला विशिष्ट शब्दने उल्लेख करतात
मराठवाड्यात ग्रामीण भागात दीपमाळला डीकमळ असे म्हणतात.
अजूनअनेक ठिकाणी स्थानिक शब्द वेगवेगळे असू शकतात.
देवळासमोर दिपमाळ उभारण्याची प्रथा रुढ आहे .
👉दीपमाळ व त्यावर कोरलेली चिन्ह पाहू.
दिपमाळेवर गणपती ,शरभ ,मोर व इत्यादी शुभचिन्हे कोरलेली आढळतात.
एकाच ठिकाणी आनेक प्रकारच्या दिपमाळी आपल्याला पाहायला मिळतात किंवा मिळू शकतील.
👉काही दीप माळे वर शिलालेख असतात.
दीपमाळच वय शिलालेखाच्या आधारे मंदिर संर्दभात किवा आनेक घराण्यांचा उल्लेख किवा संदर्भ सापडू शकत.
जेणेकरून गावाचा, घरण्याचा, मंदिराचा इतिहास समजायला सोपे जाते.बराचवेळा दिपमाळी ह्या नवसपुर्तीतूनही केल्या जातात...त्यामुळे एका मंदिरासमोर अनेक दीपमाळा असू शकतात.
लेखक :-नितीन घाडगे
दीपमाळ विषयी अजून काही माहिती असेल तर कमेंट मध्ये सुचवू शकता. लेखनामध्ये काही चूक आढळल्यास कमेंट मध्ये सांगू शकता. त्वरित बदल करण्यात येईल. धन्यवाद. ब्लॉग आवडला असल्यास जरूर शेअर करावा.
Comments
Post a Comment