सरसेनापती म्हाळोजी घोरपडे याचा अपरिचित इतिहास ..!!!!
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती पद हे स्वामीनिष्ठा पाहून, त्याग पाहुण, आफाट पराक्रम, शौर्य पाहून दिलं जातं होत.तेव्हा कूट सरसेनापती पदाची अवघड जबादारी मिळते..
हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं वाई मधील शेवटचे युद्ध या युद्धामध्ये त्यांना त्याचा गोळा लागतो आणि हिंदवी साम्राज्याचा बुलंद बुरज कोसळतो. या युद्धामध्ये खुर्द सेनापती धारातीर्थी पडले. कधीही भरून न निघणारा नुकसान आता स्वराज्य झाला होत.
रिक्त झालेल्या सेनापती पदासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासारखेच पराक्रमी अनुभवी स्वामीनिष्ठ, शौर्य, आणि महापराक्रमी असणारे सरदार घोरपडे घराण्यातील म्हाळोजी घोरपडे यांची निवड केली.
छत्रपती संभाजी महाराज यांनी म्हाळोजी यांना सारंजमी देऊन मुखत्यारी सांगून त्याना सरनोबतीची वस्त्रे देऊन नियुक्ती केली. आणि स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हणून म्हाळोजी घोरपडे सरनोबत पदावर रुजू झाले.
म्हाळोजी घोरपडे हे स्वराज्य प्रेरणास्थान शहाजी महाराज यांच्या सोबत आदिलशाहीत सरदार होते. त्याना वतन व मान पान आदिलशहाकडून मिळाली होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हाळोजी घोरपडे यांच्यामध्ये एक विचार होऊन बेल भंडारा हाती घेऊन तह झाला.पाचशे मावळे सोबत घेऊन म्हाळोजी घोरपडे स्वराज्य सेवेत दाखल झाले.
सरदार घोरपडे याच्या कडे आदिलशाहींत असताना त्या काळच्या वाई परगण्यातील विटे भाळवणी,भांगी इत्यादी ठिकाणच्या वतने देशमुखी होत्या. हे सर्व वातने त्यांच्याकडे वंशपरंपरागत आलेली होती.
म्हाळोजी घोरपडे यांच्या वास्तव्य भाळवणी गावात होते. असे संदर्भ आहेत. विटा इस्लामपूर मार्गावर भाळवणी हे गाव आहे. आजही त्या गावांमध्ये घोरपडे यांचा वाडा असून त्या वाड्याची स्थिती भग्नावस्थेतील आहे. याच गावाच्या पश्चिमेला नदी आहे.
येरळा नदीच्या एका बाजूस वांगी हे गाव आहे दुसऱ्या बाजूस व्हावी हे गाव आहे. या दोन्ही गावांमध्ये घोरपड यांचे वाडे भग्नावस्थेत पाहायला आजही मिळतील. या दोन्ही वाड्यापेक्षा भाळवणी चा विस्तारित व मोठा आहे.
शिव काळामुळे पन्हाळगडाची तटसरनोबत म्हूणन म्हाळोजी घोरपडे काम पाहत होते. छत्रपती शिवाजी महाराज याची अंत्यत विश्वासू मंडळी मध्ये म्हाळोजी घोरपडे यांचे नाव अग्रस्थानी आहे.
म्हाळोजी घोरपडे सरसेनापती म्हूणन कारकीर्द अतिशय नावीन्यपूर्ण कौशल्याने, शौर्याने, पराक्रमाने, निष्ठेने पार पाडली. अखंड स्वराज्याचे रक्षण केलं.
१ फेब्रुवारी इ.स. १६८९ मराठा साम्राज्याच्या इतिहासातील काळा दिवस .सरसेनापती म्हाळोजी घोरपडे यांना वीर मरण आले. धारातीर्थी पडले. आणि महाराजांच्या रक्षणार्थ म्हाळोजी बाबा गेले.आणि छत्रपती शंभूराजेंना संगमेश्वर येथे कैद झाली .
राज..... नावडी जवळ करा गनिम आल... राज...लाख मेल तरी चालल पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे राज......निघा...राजं...निघा...मी यास्नी रोखून घरतो...
अशी गर्जना करत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी राजे यांचा जीव वाचवण्यासाठी आपल्या अंगावर वार झेलत प्राणांची आहुती देणाऱ्या स्वराज्याचे पाचवे सरसेनापती म्हालोजीबाबा घोरपडे यांच्या पवित्र पावन स्मृतीस विनम्र अभिवादन...!!!!
लेखक
नितीन घाडगे
संदर्भ पुस्तके :-मराठा रियासत-सरदेसाई
मुधोळ च्या घोरपडे घरण्याचा इतिहास
शिवपुत्र संभाजी-कमल गोखले.
संभाजी -विश्वास पाटील
वा. सी. बेंद्रे- महाराष्ट्र इतिहासाची साधने.
Comments
Post a Comment