राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब

शिंदखेड च्या पराक्रमी जाधव घराण्याचा वारसा घेऊन जन्मलेल्या जिजाऊ मासाहेब, तितक्याच तोलामोलाचा भोसले घराण्यात शहाजी राजे यांच्या राणीसाहेब म्हणून आल्या आणि आपल्या दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, आलेले अनेक दुःखद अनुभव, जिद्द अशा गुणांच्या बळावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी महाराज यांना बालपणापासून आवश्यक ते शिक्षण दिले. महाराजांचे गुरुपद हे मातोश्री जिजाऊ यांनाच दिले जाते.

👉जिजाऊंचा करारी स्वभाव –

जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांत एका प्रसंगावरून वैर निर्माण झाले होते.


या अशा अवघड प्रसंगानंतर, जिजाऊंनी आपल्या माहेरचे संबंध तोडले. सर्व नात्यांना बाजूला सारत कर्तव्य हाच आपला धर्म समजून शिवाजी राजांना योग्य प्रकारे वाढवण्यास सहयोग दिला.

हा असा प्रसंग कुठल्याही स्त्रीसाठी जीवन हेलावून ठेवणारा ठरला असता परंतु जिजाऊंनी आपल्या करारी आणि एकनिष्ठ स्वभावाने त्यावर मात केली.


👉कौटुंबिक कर्तव्ये आणि राज्यकारभार –

शिवाजी राजांना कसे घडवायचे याचे संपूर्ण ज्ञान जिजाऊंना होते. रामायण आणि महाभारतातील कथा जिजाऊ बाल शिवाजीला सांगत असत. महाभारतातील अनेक योद्ध्यांचे महात्म्य व त त्यांचे पराक्रम राजमाता जिजाऊ उत्तमरीत्या छत्रपती शिवाजींना समजावून सांगत.

राज्यकारभार आणि पुण्याची जहागीर सांभाळताना येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात हे गुण राजमाता जिजाऊंचा पुरस्कार करतात. काळाप्रमाणे नवनवीन संकल्प, राजकारण, डावपेच, सहकार या सर्व गोष्टी जिजाऊ पद्धतशीर हाताळत होत्या. या सर्व गुणांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्यात देखील पाहायला मिळतात.

राज्य करीत असताना सामान्य लोक, दीन – दुबळे यांचा आधार फक्त राजाच असतो. जात-पात आणि धर्म हा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याचा राजाच्या निर्णयात समावेश नसला पाहिजे.

सर्वधर्मसमभाव, रयतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे राजाचे प्रथम कर्तव्य असते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे अधिकारी आणि सगेसोयरे हे लालसेने जर भांबावले तर खेळावे लागणारे राजकारण आणि कूटनीती हेदेखील राजासाठी किती महत्त्वाचे आहे असे बाळकडू राजमाता जिजाऊंनी राजे शिवाजी यांना लहानपणीच दिले.


👉जीवन कार्य:-

शहाजीराजे वेगवेगळ्या मोहिमेत आणि कर्तव्यात व्यस्त असत. शिवाजी महाराज देखील राज्यव्याप्ती मोहिमेवर जात असत. अशा वेळी जिजाऊ यांनी आपल्या सूना आणि त्यांची मुले यांची जबाबदारी घेतली.

शहाजीराजांची सुटका, तोरणागड आक्रमण, अफजलखानाचा वध, आग्रा येथून सुटका अशा अनेक जीवघेण्या प्रसंगात राजमाता जिजाऊ यांचे मार्गदर्शन किती मोलाचे ठरले होते, हा इतिहास सर्वांना माहीतच आहे. छत्रपती शिवाजी स्वतः वेगवेगळ्या मोहीमेवर असताना स्वतः राजमाता जिजाऊ यांनी राज्यकारभार उत्तमरित्या सांभाळला होता.

👉राजमाता :-

शिवाजी राजांचा राज्याभिषेक” हा विलक्षण सोहळा पाहून, महाराजांना ” छत्रपती ” बनल्याचे पाहून बारा दिवसांनी म्हणजे ज्येष्ठ कृ. ९ , शके १५९६, इ.स. १७ जून १६७४ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

स्वतंत्र स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाऊंचे निधन झाले.

राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे दोन्ही छत्रपती घडवले. स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ध्यानी मनी सतत तेवत ठेऊन ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. 

 👉यशाची प्रेरणा होती ती राजमाता जिजाऊ

स्वराज्याची निर्मिती झाली, प्रचंड विस्तार केला, सक्षम सैन्य बळ उभारले, नौदल उभारून महाराज भारतीय आरमाराचे जनक ठरले, स्वराज्याचा खजिना भरला गेला. या सर्व यशाची प्रेरणा होती ती राजमाता जिजाऊ यांची.हे सर्व यश व मूलाची कर्तबगारी त्या पहात होत्या आणि त्यांनी सल्ला दिला ली शिवबा तुम्ही राज्याभिषेक करवून घ्या, आणि 6 जून 1674 रोजी रायगडावर तो सोहळा सम्पन्न झाला. रायगडावरील तोफानी गर्जून सांगितले की शिवाजी महाराज छत्रपती झाले.
धन्य झाली माता, धन्य ते पिता आणि धन्य हा भारत देश.

इतिहासकार रानडे लिहितात, आपला पुत्र छत्रपती झाल्याचे पाहण्यासाठी परमेश्वराने त्याना भाग्य दिले आणि त्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे 17 जून 1674 रोजी राजमातांचे निधन झाले. आज तो स्मृतिदिन, पाचाडला त्यांची छत्री आहे, प्रत्येकाने एकवेळ तरी तेथे जावे, दर्शन घ्यावे.

छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब यांची आज पुण्यतिथी.
शौर्य, नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला. 


राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंती निमित्त पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४