नाशिकमधील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आल्याची दुःखद घटना समोर आली आहे. 💐त्याना भावपूर्ण श्रद्धांजली.

बिहारमधील नेपाळ सीमेलगत बिरपूर येथे शुक्रवारी सशस्त्र सीमा बलाच्या 45 व्या बटालियनच्या कॅम्पमध्ये प्रशिक्षणार्थी सैनिकांचे प्रशिक्षण सुरु होते. यावेळी 11 केव्ही उच्चदाब प्रवाहाच्या तारेचा धक्का लागल्याने तिघा जवानांचा मृत्यू झाला.


नाशिकमधील जवानाला नेपाळ सीमेवर वीरमरण आल्याची दुःखद घटना समोर आली आहे.

या घटनेत एकूण दहा जण जखमी झाले. त्यांना बिरपूरच्या ललित नारायण उपविभागीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघा गंभीर जवानांना दरभंगा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. यामध्ये नाशिकच्या अमोल हिंमतराव पाटील जवानाला वीरमरण आले आहे. अमोल यांच्या मृत्यूची बातमी समजताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यावर शोककळा पसरली.


अमोल यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांच्यावर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अमोल हिंमतराव पाटील हे नाशिक जिल्ह्यातील नांदगांव तालुक्यातील रहिवासी होते.


दरम्यान, उच्चदाब प्रवाहाच्या तारांकडे दुर्लक्ष प्रशिक्षण मैदानावरील उच्चदाब प्रवाहाच्या तारा आणि खांब काढण्यासाठी सीमा सुरक्षा बलाने संबंधित वीज विभागाला अनेकदा पत्रे लिहिली होती. मात्र वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच योग्य ती दखल न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे.


सशस्त्र सीमाबलाच्या बिहार-नेपाळ येथील सुपौलच्या बिरपूर सीमेवर कार्यरत असलेले अमोल पाटील सहकाऱ्यांसोबत सीमेवर तैनात होते. तसेच अलीकडेच मुलगी झाल्याचा आनंदही त्यांनी गावात साजरा केला होता. जाताना आई, पत्नी आणि आपल्या चिमुकलीला तो सोबत घेऊन गेला होता. मात्र आता अमोल यांच्या निधनाने संपूर्ण नाशिक जिल्हयावर तसेच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४