भांडवलशाही,सीमाचळवळीचे जेष्ठ नेते सीमाभागाचे भीष्मपितामह प्रा. भाई एन. डी. पाटील .!महाराष्ट्रच नव्हे तर देशातील अनेक सामाजिक चळवळींचा बुलंद आवाज आणि चळवळीतील हिमालयपर्वाचा अस्त..!

 चळवळीचा आधार स्तंभ गेला
 जनसंघर्षाचा नेता गेला
महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार व जनसामान्य यांच्या हिताचे रक्षण करणारे धीरोदात्त व्यक्तिमत्व. स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूमी मुक्ती आंदोलन, एनरॉन विरोधी आंदोलन, सेझ विरोधी आंदोलन अशी सुमारे 70 वर्षाची संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व आज शांत झाले.

👉ढवळी ता. वाळवा जि.सांगली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये एन डी पाटील यांचा जन्म झाला.

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील
जन्म : १५ जुलै १९२९ – ढवळी (नागाव), जि.सांगली मृत्यू : १७ जानेवारी २०२२ कोल्हापूर 
शिक्षण : एम.ए. (अर्थशास्त्र), पुणे विद्यापीठ,१९५५; एल.एल.बी.(१९६२) पुणे विद्यापीठ 
काॅम्रेड प्रा. डाॅ. एन. डी. पाटील 
 👉अगदी लहान वयापासूनच त्यांच्यावर सत्यशोधक विचाराचे संस्कार लाभले होते.

   पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी ते नोकरीच्या निमित्ताने संपर्क मध्ये आले. पुढे काही वर्षे त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये. प्राध्यापक म्हणून काम पाहिले.

 परंतु कामगार शेतकरी कष्टकरी मजूर यांच्या हितासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केली परंतु नोकरीमुळे ते अशक्य होते.

   पुढे त्यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतकरी कामगार  व जनसामान्यांसाठी आंदोलन करण्यासाठी पुढे त्यांनी शेतकरी कामगार पक्ष या पक्षामध्ये प्रवेश करून  काम चालू केले. पुढे त्या पक्षाचे ते कट्टर कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध पावले.

 शेतकरी मजूर कष्टकऱ्यांची बाजू घेऊन शेतकरी कामगार पक्षाचे विचार तळागाळात मध्ये पोचवण्यासाठी त्यांनी भरपूर काम केले.

 अल्पावधीत काळात ते शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आले.

 विधान परिषदेच्या माध्यमातून उपेक्षित लोकांच्या कष्टकरी मजूर प्रश्नांची सभागृहात अभ्यासपूर्ण भाषणांनी  मांडणी करण्यात ते यशस्वी झाले. अनेक प्रश्न मार्गी लावले.

 थोडे 17 18 वर्षे त्यांनी विधानपरिषदेवर काम पाहिले. 1978 साली आलेल्या पोलाद सरकारमध्ये त्यांना सहकार मंत्री म्हणून निवडण्यात आलं.

  सहकार मंत्री म्हणून काम करत असताना त्यांचा अभ्यास पूर्ण व नियोजन बद्द  कामगिरी बद्दल त्यांनी आदर्श घालून दिला.

 एन डी पाटील आमदार झाल्यापासून आजपर्यंत ते त्यांना मिळणाऱ्या मानधनातून रक्कम गरीब व गरजू कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खर्च केलेला आहे.
 
            वयाची ९२ वर्षे पुर्ण केल्यावरसुद्धा विश्रांती घ्यावी अस त्यांना कधी वाटल नाही.

 सत्तेत जाण्याची संधी मिळाली त्यावेळी सुद्धा  त्यांनी कधी आपला साधे पणा सोडतला नाही.

 आज कालचे राजकारणी रस्त्यावर साधं डांबर जरी टाकले तर दोन-तीन वेळा नारळ फोडतात. परंतु त्यांनी  अंतरी असतानासुद्धा कधीच कोणत्याही भूमिपूजनाला न जाण्याचा निर्णय घेतला. तो पुढे कायम अमलात आणला.

           कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याची ठरलेली कापूस एकाधिकार योजना त्यांनीच सुरू केली.
त्यांच्या संघर्षातूनच रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, समान पाणी वाटपाचा आग्रह याने समाज हिताच्या योजना उभ्या राहिल्या. 
 
 एन डी पाटील यांच्यासमोर  महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील  यांचा आदर्श होता.

 शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते, सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाविरोधात लढा देणारे, कष्टकरी वर्गासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे संघर्षयात्री एन डी पाटील सरांना विनम्र अभिवादन,भावपुर्ण श्रद्धांजली 
💐💐   🙏🙏💐💐
लेखन
नितीन घाडगे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...