आरत्यांचे विविध प्रकार*या दोन ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ, आत्मिक संवाद आणि भक्ती प्रगट होते. म्हणून आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक. आरती म्हणजे तबकात अथवा ताम्हणात निरांजनातील दीप प्रज्वलीत करून देवाला ओवाळणे.

आरत्यांचे विविध प्रकार
*या दोन ओळीतून देवाप्रती असलेली तळमळ, आत्मिक संवाद आणि भक्ती प्रगट होते. म्हणून आर्ततेने म्हटली जाते, तिला आरती असे म्हणतात. आरती म्हणजे, देवाला मनापासून मारलेली हाक. आरती म्हणजे तबकात अथवा ताम्हणात निरांजनातील दीप प्रज्वलीत करून देवाला ओवाळणे. ही ओवाळणी काव्यपदातून  एका विशिष्ट चालीने म्हटली जाते. या पदामध्ये साधक ईश्वराच्या रूपाचे, पराक्रमाचे, कर्तृत्वाचे वर्णन करीत असतो. विशेषत: यात देवाची स्तुती असते. आरतीमुळे उपासकांना कृतार्थतेची जाणीव होते. तो देहभान विसरून परमेश्वराला शरण येतो.*
यासाठी साधकांनी आरत्यांचे आत्मविष्कार साधण्यासाठी विविध प्रकार केले आहेत ते असे- काकड आरती, धुपारती, दीपारती, पंचारती, शेजारती
*१) काकड आरती -*
 साधक दिवसाच्या प्रारंभी पहाटेच्या वेळी परमेश्वराची आळवणी करतो, त्याला काकड आरती म्हणतात. या उपचारातून साधकाची ईश्वराविषयीची निष्ठा आणि श्रद्धा व्यक्त होत असते. तसेच जीवनाची नित्यकर्मे तो ईश्वराला अर्पण करतो. अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमापर्यंत मंदिरातून काकड आरती केली जाते. आरतीनंतर विविध भजने, अन्य आरती, स्तोत्रे म्हटली जातात. संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास, संत एकनाथ आदि संतांनी केलेल्या रचना काकड आरतीनंतर गायल्या जातात.

*२) धुपारती -* 
धुपाने मंदिरात तसेच घरातील देव्हाऱ्यात देवाला ओवाळले जाते, त्या आरतीला धुपारती असे म्हणतात. सत्व, रज, तम हे त्रिगुण नाहीसे होऊन मनुष्याने गुणातीत व्हावे ही भावना या आरतीमागे असते. शिवाय धुपाचा वास सर्वत्र दरवळल्यामुळे त्या वासातून देवाचे अस्तित्व भासू लागते. 

*३) दीपारती -* 
साधक निरांजनाने देवाला ओवाळतो त्या निरांजनातील दिव्याचे तेज तो आपल्या डोळ्यात साठवत असतो. तेज हे देवाचे प्रतिक असल्यामुळे ही आरती केली असता साधकाच्या मनोकामना पूर्ण होतात.

*४) पंचारती -* 
पाच वातीचे एक उपकरण असते. त्यात फुलवाती लावल्या जातात. त्यानेच साधक आपले पंचप्राण ओतून देवाला ओवाळीत असतो किंबहुनाआपले प्राण देवाला समर्पण करण्याची तयारी असते विशेष म्हणजे या आरतीमुळे साधक ज्योतीस्वरूपाने देवाच्या शुद्ध प्रेमाची अनुभुति घेतो. 

*५) शेजारती -* 
हा दिवसातील शेवटचा उपचार असून तो रात्री केला जातो. तसे पाहता देव हा सदैव जागृत असताना शेजारती करण्याचे कारण देव हा आनंदरूपी शेजेवर आहे, याचा अनुभव आपल्याला यावा हा भाव यात असतो. द्वैत स्थिती संपून अद्वैत स्थिती प्राप्त व्हावी म्हणजेच देव व भक्त यांचे मीलन व्हावे यासाठी या आरतीचे प्रयोजन केले जाते. अशा रीतीने सकाळ संध्याकाळ व रात्रौ देवाची आरती केल्यानंतर देवाभोवती प्रदक्षिणा घालणे अगत्याचे आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४