कदम घराण्याचा इतिहास

कदम घराण्याचा इतिहास
             कदंब घराणे सूर्यवंशी ब्रम्हशाखेत येते. त्याच्या वसाहती

 १) बनवासी
 २) गोपत्तन (गोवे, गोपपूरी गोपकपट्टण) पत्नाशिका, हल्सी (हनगळी) या ठिकाणी झाल्या इ. स. ११० पूर्वी कदंब राज्याच्या सत्तेखाली गोमंतकांत नांदत असल्याची माहिती तांब्रपटातून मिळते. कदंबकडून शाळीवाहनाकडे, त्यांच्याकडून चाळुक्याकडे व पुढे त्यांच्याकडून कदंब वंशी जयकेशीने परत राज्य मिळविले.

 १०५३-८० व गोपकपट्टण येथे आपली राजधानी करुन स्वतंत्र राज्यकारभार करु लागला. पुढे पाच पिढ्या राज्य केले. वीरजकेशीच्या वेळी सत्पकोटीष देवस्थान भरभराटीस आले. १९९३ इ.स. कदंबावर यादवंशी बल्लाळांशी स्वारी करुन त्यांचे कडून खंडणी घेऊ लागले. पुढे देवागिरीच्या राज्याचे प्राबल्य होऊन कदंब त्यांचे मंडलीक झाले.


पुढे १४ व्या शतकात (१३४५) अल्लाऊद्दीन खीलजीने देवगीरीवर स्वारी केली व त्यांना पादाक्रांत केले. तेव्हा त्यांचे सेनानी गोव्यात घुसले असता. कदंबानी शौर्याची पराकाष्ठा केली. पण यश आले नाही.

 पुढे १३९७ इ.स.मध्ये विजयनगरच्या हरिहर राजाने आपला शुर सेनानी माधव यास गोमांतकात प्रचंड सैन्यासह पाठवीला व यवनी सत्तेपासून मुक्तता केली. त्याचे नावाने तेथे माधवती तिर्थ व ब्रम्हपुरी ची स्थापना केली आहे. तेव्हा गुलबग्र्याचे महामदास (बहामनी राज्यास) ते खपले नाही. पुढे फिरोजशहा बहमनीने मोठे सैन्य पाठवून इ.स. १४६८ मध्ये तह केला. व इ. स. १४९७ मध्ये गोमांतक विजापूरचे आदीलशाहीत समाविष्ठ झाला. इ. स. १५१० चे दरम्यान पोर्तुगीजांनी गोवे शहर हस्तगत केले.

सर्वप्रथम या सूर्यवंशी राजाचे नगर केदार (कंधहार) येथे पहिले स्थापन केले होते. कदंब घराण्याचा वंश स्थापक पहिला वंशधर राजा मयुरवर्मा याचे अंगणात कदंबाचे एक विस्तीर्ण झाड होते व त्याचे दैवत होते. तो नित्यादिनी त्याची पूजाअर्चा करीत असे. तो अति पराक्रमी व सार्वभोम राजा होता. तेथपासून त्याचे वंशजास कदंब असे नाव पडले. त्या वंशजापैकी कदंब (हरीवर्मा पांचवे) शतकाचे वेळी राज्य करीत होता. त्यावेळी सेंद्रक जयकेशीराजा होता.

आजही एखाद्या कर्तृत्ववान पुरषाचे नावाने ते घराणे ओळखण्याचा प्रधात आहे. त्याचे ४ थे पीढीत सातवे शतकात कर्नाटकांत राज्य स्थापन झाले. ते वेळी मृगेशवर्मा याची राजधानी वनवाशी येथे होती. ङ्खदेङ्ग गाव येथील एका शिलालेखांत एका कदंब राजाने गोवे सर केल्याचे वर्णन आहे. तेथील पहिला राजा काळूस्त वर्मन याने आपली सत्ता व वंशविस्तार केला. याच वंशात दुसरा राजा रविवर्मा झाला. याची राजधानी बेळगांवात हसवी येथे होती. त्यांच्या पश्चात सत्ता कमकुवत बनली आणि घराणे जिकडे तिकडे गेली. बदामीचा राजा पुलकेशीत १ ला याने वातापी (विजापूर जिल्ह्यातील बदामी) येथील कदंब राजाचे उच्चाटन करुन ती आपली राजधानी केली. ती बलाढ्य होऊन कर्नाटकचा उत्तर भाग त्याने घेतला (सेंद्रक उर्फ़ शिंदे घराण्यापैकी) नागवंशी होता. रत्नागिरीस खारे पाटण येथे शिंदे घराण्याची वस्ती होती.)



 त्यामुळे १० वे शतकांत कदंब घराणे जिकडे तिकडे झाले. (अंर्पराजाचा पराभव करुन गोव्याच्या कदंब घराण्यात दुसरा जयकेशी इ.स.११०४ ते ४८ पर्यंत होता. धारवाड येथे नरेंद्र गावांत एक शिलालेख सापडला आहे.) यावेळी काही घराणी धारवाड जिल्ह्यात उत्तर कानडा कर्नाटकात गरगी (गिरवी) गांवी केली. पाच घराण्यापैकीr कदमराव हे वेळे जांबरुख गिरवी मुक्कामी जावळी प्रांती आले. वतनदार झाले.



 दुसरे गोव्यात १३ वे शतकात गोपच्चन येथे राज्य कर लागले. तिसरे शतकांत ४ ते शतकांत हैद्रबाद येथे मुंगी पैठण येथेंही राज्य वसाहत करुन राहीली. ४ थे शतकांत चंद्रपूरचा राजा देवराज याचा तांब्रपट सापडला आहे त्यानंतर इ.स.११२६ मध्ये अपेराकाने पुन: जयकेशिच्या कदंबांचा पराभव बाहुबळाने केला. गुजरातच्या तालूक्याचे शूरराणी दक्षिणेतील गोपपत्तन येथील कदंब वशांतली होती. कर्ण गुर जरातच्या रजपूत राज्यातील कदंब वशांतली होती. पहिला वंशधर शिंदे (सेंद्रक) यांचे लग्न कदंब राज्यकन्येशी झाले होते. नंतर वनवासी येथे असतांनाही शिंदे-कदंबाचे संबंध पूर्ववत चालत होते. सूर्य व नाग या चिन्हाचा बोध दर्शविते. कारण शिंदे-कदम हे दोन्ही सूर्यवंशी व शेष आणि ब्रह्म शाखेतील आहेत.

कदंबांची एकूण तीन घराणी झाली त्यांत सर्वांत जुने घरणे कर्नाटकातील वैजयंती (वनवासी) यानंतरची घराणी हनगल व गोमांतक. जयसिंह व रणराग चालूक्य हे वनवासीचे कदंबाकडे चाकरीस होते. पहिला चालुक्य राज पुलकेशीने कदंबास मंडलीक केले इ. स. ६१० व इ. स. ९४५-७० मध्ये शिलाहार भिमराजाचे चंद्रपूरच्या कला राज्यावर स्वारी केली. व्हूराज भिलाहराचे चंद्रपूरच्या कला राज्यावर स्वारी केली. रहूराज भिलाहराचे वेळी इ. स. ९९५ मध्ये वैलप तालुक्यांस मदत केल्यामुळे शष्ठदेव कदम यांस महामंडेश्वराचा दर्जा दिधला व राजाने मंडलिकत्व पत्करले. पुढे शष्ठदेवाने शिलाहाराची शक्ति क्षीण होताच त्यांचेवर हल्ला केला व संबंध कोकण हस्तगत करुन घेतला.
कदम (कदम्ब) घराणे हे कर्नाटक चे प्रमुख राजघराणे आहे.

 प्रामुख्याने हे आडनाव उस्मानाबाद, नांदेड, सातारा, कोल्हापुर व बेळगांव या जिल्हात आढळते. तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हात प्रमुख आडनाव म्हणून या आडनावाकडे बघितले जाते.

तसेच कदम हे आडनाव मराठ्यांच्या सुर्यवंशम-तप्त कुळातील आहे.


कदम कुळाचा इतिहास
प्रा. डॉ. सतीश कदम 9422650044

 कदंब घराण्याने सुमारे एक हजार वर्षे कर्नाटक, गोवा आणि ओरिसा याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहासात दुर्लक्षित राहिले.

त्रिलोचनला कदम घराण्याचा मूळ पुरूष मानला जातो.


 त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदंब वृक्षाशी लावला जातो.

 त्यामुळे कदंब कुळ म्हटले जाते.

 कदंबांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये मयुरवर्माने कर्नाटकातील उत्तर कनाडा जिल्ह्यातील बनवासी या ठिकाणी स्थापन केलेल्या राजधानीपासून होते.

पल्लव दरबारात अपमान झाल्यानंतर कदंबाचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, मयूरवर्मानंतर पुढे कंगवर्मा, भगीरथ, रघू, काकुस्थवर्मा, शांतीवर्मा, कृष्णवर्मा, कुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे होऊन गेले.

या राजांनी पुढे हळशी, उच्छंगी या स्वतंत्र राजधान्यातून बेळगांव, खानापूर, संपगाव, सिरसी, सावनूर, शिमोगा, हुबळी या परिसरावर राज्य केले.

 या दरम्यान कदंबांनी प्रथमच कन्नडला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला.

इ. स. ५४३ मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीने कदंबाचा शेवटचा राजा कृष्णवर्मा दुसरा याचा पराभव करून राज्य जिंकले.

तरी कर्नाटकातील बनवासी, हनगल, हळशींगे, सांतलिगे येथे कदंबांची छोटी राज्ये १२ व्या शतकापर्यंत कायम होती.

कदंब घराण्याची माहिती देणारा सर्वात मोठा संदर्भ कर्नाटकातील तालगुंड येथील शिलालेख असून अशाप्रकारचे अनेक शिलालेख सापडले आहेत.

कर्नाटकप्रमाणेच गोव्यातही कदंबांनी इ.स. १००७ ते १२३७ पर्यंत साम्राज्य गाजवले.

 षष्ठीदेव हा गोव्यातील कदंब वंशाचा संस्थापक असून त्यानंतर पुढे जयकेशी, गुहल्लदेव, पेर्माडी यासारखे राजे होऊन गेले. आज गोव्यात दिसणारी ग्रामव्यवस्था ही कदंबांनी दिलेली देणगी आहे. गोव्याची ग्रामदेवता सप्तकोटेश्वराची उभारणी कदंब राजांनी केली. याचाच पुढे छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केला. गोव्याच्या कदंबांचे आरमार भक्कम असून त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी होती.

 
गोपिकापट्टण म्हणजे गोवा ही कदंबांची राजधानी असून या घराण्यात जयकेशी, पेरमाडी यांच्या उज्वल कारकिर्दीबरोबरच कमलादेवी, महादेवी, लक्ष्मीदेवी यासारख्या कतृर्त्ववान स्त्रियाही होऊन गेल्या.

 याच पेरमाडीच्या पत्नी कमलादेवींनी संपगाव तालुक्यातील देगावे (कर्नाटक) याठिकाणी इ. स. ११४७ मध्ये कमलनारायण आणि महालक्ष्मीचे सुंदर असे बांधलेले आहे.


आपल्या कार्यकाळात कदंबांनी गोव्यामध्ये गद्याना, होन्नू, बेले, व्हाईज, हगा यासारखी आपल्या नावानी नाणी पाडली होती. ज्यावर कमळ आणि सिंहाचे चित्र असून कदंबांनी सोन्याची नाणी पाडली होती हे विशेष आहे.

 गोव्याच्या अनेक भागात कदंबांचे शिलालेख, ताम्रपट सापडतात. गोव्याला वैभव प्राप्त करून देण्याचे काम कदंब राजांनी केल्यामुळेच तेथील बस वाहतुकीला कदंबा ट्रान्सपोर्ट हे नाव देऊन सरकारने या घराण्याचा गौरव केला आहे.


कर्नाटक आणि गोव्यानंतर कदंब घराण्याने ओरिसा राज्यातही प्राचीन काळापासून आपली सत्ता प्रस्थापित केली.

त्यानुसार धर्मखेडी, प्रतापदेव यासारख्या राजांनी ओरिसात कदंबांची सत्ता निर्माण केली. त्यानुसार पुढे पुरी, अंगूल, अथम्लीक, मांडपा या परिसरात कदंबांची सत्ता होती.

इंग्रजांच्या काळात ओरिसात कदंब जमीनदार म्हणून छोट्या छोट्या संस्थानात विभागला होता. या संस्थानांना तेथे १९ तोफांची सलामीचा मान होता. आजही तेथे कदंबांची मोठी जमीनदार घराणी आहेत.

खर तर कदंब म्हणजे कदम असून ते मूळचे सुर्यवंशीय, मानव्य गोत्री, सिंह हे त्यांचे लांच्छन, लाल रंगाचे निशाण, झेंड्यावर अर्जुनाप्रमाणे वानर होते.

कर्नाटक, गोव्यानंतर कदम सर्वत्र विखुरले गेले त्यावेळी प्रसंगानुरूप त्यांना भिसे, भोग, कोकाटे, राजगुरू, नुसपुते, महाले, डोके, कोरडे, बोबडे, सातपुते, धुमाळ इत्यादी आडनावे मिळाली.

मध्ययुगीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तामध्ये आपले नाव राखले.

बहामनी कालखंडात (१४२१) फक्रुद्दीन निजामी यांनी 'कदमराव पदमराव' नावाचे काव्य लिहून पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे.

 तर गोव्यांमध्ये कदंबाच्या अगोदर बहामनी सत्तेचे मुख्य सेनापती म्हणून खूप कदम हे मुख्य सेनापती होते.

 तर विजापूरच्या आदिलशाहीत बंकापूरच्या पर्वतराव कदमांनी आदिलशाही विरोधात केलेले बंड मोठे गाजलेले.
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अनेक कदमांनी स्वराज्याची सेवा केली.

राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेत तामिळनाडूचा बलगंडापूरमचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची किल्लेदारी शहाजी कदम यांच्याकडे दिली होती.

 पुढे शिवरायांच्या निधनासमयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी राजगडावर राजांसोबत जी जाणकार मंडळी उपस्थित होती त्यात बाजी कदमांचा समावेश होता. याची बाजीने पुढे छत्रपती राजारामांना सावलीप्रमाणे सोबत राहून मोठी मदत केली.

स्वराज्यात दोन-तीन बाजी कदम होऊन गेले. पैकी इ. स. १७२० च्या संदर्भानुसार मोगलांच्यावतीने रावरंभा निंबाळकरांची जहागिरी सांभाळतांना पुणे आणि बारामतीची आठ वर्षे जहागिरी ही बाजी कदमांकडे होती. 

छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीला सुरूवात होताना अमृतराव कदमबांडे यांची फार मोठी मदत झाली होती. त्यामुळे शाहुंनी या घराण्याला विशेष सन्मान देत अमृतरावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपली कन्या गजराबाईसोबत केला होता. कदमबांडे घराण्यात अमृतरावासोबत संताजी, रघूजी, कंठाजी, गोजानी यांनी मोठी कामगिरी केली. कंठाजी कदमांची गुजरात प्रांतात मोठी दहशत होती. 
या त्रिंबकरावांची मुलगी बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव गायकवाडांना दिली होती. कदमबांडे घराण्याकडे नंदूरबार, रनाळा, तोरखेड, कोपर्ली, ठाणे, धुळे या ठिकाणची जहागिरी होती. याचसोबत अहमदनगर जवळील आळकुटी याठिकाणीही कदमबांडेची मोठी गढी आहे.

छत्रपती शाहूंच्या काळात सापचे इंद्रोजी कदमांची कारकिर्द खूप गाजली. तुळजाभवानीचे मुख्य पुजारी म्हणून कदम कार्यरत असून याच घराण्यातील आनंदरावांची मुलगी महादजी शिंदेंना दिलेली होती. ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचा कारभार याच कदमांनी चालविला. आजही तेथे डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम यांच्या नावाने बाजार आहेत.


बुवाजी कदम हे गोपालदुर्गचे किल्लेदार होते. तर पानिपतात भगवंतराव व पर्वतराव कदम यांनी मोठी कामगिरी केली. फलटणजवळील गिरवीचे कदमांचे बडोद्याच्या गायकवाडाशी सोयरिक असून यादवराव तुकाजी कदमांना सयाजी गायकवाडांची मुलगी रडूबाई दिली होती तर बाळासाहेब कदम यांच्या मुलीचा विवाह बडोद्याच्या शिवाजीराव गायकवाडांसोबत झाला होता.
एकंदर प्राचीन कालखंडापासून कदम घराण्याचा इतिहास उज्वल असून या घराण्यातील एखाद्याने कुठेही गद्दारी केल्याचे इतिहासात नमूद नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कदम विखुरलेले असून कर्नाटक, गोवा, ओरिसा या राज्यामध्ये कदम कुलाचा अभ्यास शिकविला जातो. मात्र चालुक्य, पल्लव, वाकाटक यांना अभयदान देणाऱ्या कदंबांचा इतिहास महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात नाही. मल्हारराव होळकरांच्या झेंड्यातील लालरंग त्यांनी कदमाप्रती आदरभाव म्हणून ठेवला होता. कर्नाटक सरकार बनवासी येथे दरवर्षी करोडो रूपये खर्चुन कदंब महोत्सव भरविते. २००५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसेनिक तळाचे नाव आय.एन.एस कदंबा ठेवले आहे. उडिया भाषेतील कदंब गाथा, तेलगूतील कदंबकुल, कन्नडमधील कावेरी महात्म्य यासारख्या ग्रंथात या घराण्याचा इतिहास पहायला मिळतो. जॉर्ज मोरिससारख्या इंग्रजाने कदमकुळावर संशोधनात्मक लिखाण केलेल आहे. एक हजार वर्षे सत्तेत राहिलेल्या कदंब घराण्याचा इतिहास महाराष्ट्राला अनभिज्ञ असावा हे आश्चर्यकारक आहे.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...